आठवणीं–साठवणीं
राजू दादा चा फोन, आईच वर्ष श्राद्ध येत्या आठ तारखेला आहे तू येते ना? आम्ही पोहोचलो आहोत आणि वाट पाहतोय."
दादा चा मुलगा नितीन शहरात राहणारा त्यांच्या कडे च दादा वहिनी आता रहात होते.
दादा चा मुलगा नितीन शहरात राहणारा त्यांच्या कडे च दादा वहिनी आता रहात होते.
रात्री जेवतांना सुमा सासूबाई जवळ जाण्याविषयी बोलली. मुलांना सुट्या नाही.
' अग तू नक्की जा दोन-चार दिवसाचा तर प्रश्न आहे मी संभाळेन.'
'हो आई--आता काही आम्ही लहान नाही आजीला त्रास नाही देणार रिचा आणि ऋषभ दोघांनी प्रॉमिस केले.
' अग तू नक्की जा दोन-चार दिवसाचा तर प्रश्न आहे मी संभाळेन.'
'हो आई--आता काही आम्ही लहान नाही आजीला त्रास नाही देणार रिचा आणि ऋषभ दोघांनी प्रॉमिस केले.
आशिष ने तिचे रिझर्वेशन करून दिले, सकाळीच ती गाडीत बसली. चार-पाच तासांचा प्रवास होता पण मन मात्र केव्हाच गावी पोहोचले होते.
मागच्या वर्षीच तर ती आईला बरे
नव्हते म्हणून गेली होती गावी. तेव्हा दादा व वहिनी तिचेच रहात असत.
अग मी ठीक आहे सुमा , सुमा ला पाहून आई उठून बसली. बाबा गेल्या पासून आई ची तब्येत नरम गरम असायची.
मागच्या वर्षीच तर ती आईला बरे
नव्हते म्हणून गेली होती गावी. तेव्हा दादा व वहिनी तिचेच रहात असत.
अग मी ठीक आहे सुमा , सुमा ला पाहून आई उठून बसली. बाबा गेल्या पासून आई ची तब्येत नरम गरम असायची.
आईने जरी ठीक आहे म्हटले तरी तिचा चेहरा पाहून लक्षात येत होते की आईला खूप त्रास आहे पण ते ती सहन करते आहे. आजारच तसा होता कॅन्सर लास्ट स्टेज चा. डॉक्टरांनी पण सांगितले जितके दिवस काढतील तेवढे दिवस तुमच्या.
आई जणू सुमा च्या भेटी साठीच थांबली होती.
दोन दिवस सुमा आईच्या जवळ होती शेवटी दादा व सुमाला जवळ घेऊन आईने प्राण सोडले.
आई जणू सुमा च्या भेटी साठीच थांबली होती.
दोन दिवस सुमा आईच्या जवळ होती शेवटी दादा व सुमाला जवळ घेऊन आईने प्राण सोडले.
आई गेली नी संपला माहेरचा प्रेमाचाझरा असे सुमाला वाटले. दिवस वार होताच ती घरी परत आली आणि बघता बघता एक वर्ष ही झाले.
स्टेशनवर दादा आला होता घ्यायला. घरी वहिनी वाट पाहत होती आईचे माहेरचं आता कोणीच नव्हतं, बाबा तर खूप वर्ष आधीच गेले होते.
तो पूर्ण दिवस क्रियाकर्मा तच गेला .
फुलांचा हार घातलेला आईचा हसरा चेहरा पाहून सुमाला भडभडून आले. कितीतरी वेळ मुक्तपणे अश्रू गाळत बसली राहिली.
संध्याकाळी दिवा लावून झाल्यावर दादा वहिनी व ती बसले होते , नितीन ला सुट्टी नसल्याने तो व सुनबाई लगेचच परत गेले.
बोलता बोलता दादा म्हणाला
." सुमा आता हे घर विकायला काढायचे म्हणतोय. तसा एकाशी सौदा झालाय पण त्याआधी तुझ्याशी बोलायचं होतं.
." सुमा आता हे घर विकायला काढायचे म्हणतोय. तसा एकाशी सौदा झालाय पण त्याआधी तुझ्याशी बोलायचं होतं.
"म्हणजे वन्स तुम्हाला काही--?"वहिनी ने विचारले.
" नाही मला काहीच हरकत नाही."
" काय आहे ना,आम्ही आता इथे राहत नाही मग घरभाड्याने देणे, ते भाडे वसुली, परत तुटफूट झाली तर हेलपाटे, हे सगळं आता मला झेपणार नाही. वेळ कोणाला आहे?
आणिआता आम्ही म्शहरात रहाणार,तेव्हा".
आणिआता आम्ही म्शहरात रहाणार,तेव्हा".
‘बरोबर आहे रे तुझे दादा मला पटतय तुझं बोलणे. " विकून टाक माझी काहीच हरकत नाही.’
“तुला अर्धा वाटा देणार आहे."
" नाही नको मला काही, लग्नात दिल आहे रे पुष्कळ बाबांनी."
“सुमा तुला काय हवं ते निःसंकोचपणे माग तुझा हक्कच आहे" असे म्हणत दादांनी तिच्या पाठीवर हात ठेवला.
चला आता झोपूया प्रवासाच्या थकव्याने तुलाही झोप आली असेल असे म्हणत वहिनी नी दिवा मालवला....
सकाळी लवकर जाग आली सुमा अंगणात आली. अंगणात तुळस, मोगरा सुरंगी फुलांनी डवरली होती फुलं काढता काढता सुमा ला निमा -तिची बाल मैत्रीण आठवली. दोघींमध्ये अगदी चढा ओढ असायची. कोण जास्त फुले काढून हार बनवत आणि तळ्याच्या गणपतीला वाहत.
. दोघी अगदी धावून धावून फुल काढायच्या आणि परकराच्या ओच्यात घेऊन अंगणात बसायच्या .
एक दिवस आजी म्हणाली अगं सुमा, निमा झाडावर एकही फुल नाही ठेवलं असं करू नये. फुल ही झाडांची बाळ ,सर्व असे ओरबाडून नाही घेऊ ग .देवाला काय एक फुलही पुरत.
. आजीची शिकवण सुमाने खूण गाठ म्हणून मनाशी बांधली. सुमाला वधू वेषात न पाहताच आजी गेली. सुमाने आजीची आठवण म्हणून हक्काने आजीची गोधडी मागून घेतली होती.

सुमा चलतेस ना तळ्याच्या गणपतीचे दर्शन घेऊन येऊ, दादाचा आवाज ऐकून सुमा भानावर आली.थोडी फुल व दुर्वा घेऊन दोघं बोलत बोलत देवळात पोहोचले.
देवदर्शन करून तळ्याकाठी निवांत बसली सुमाचे लक्ष तळ्याकाठच्या चिंचेच्या झाडाकडे गेले, सुमा निमा दोघी भातुकलीच्या जेवणात या झाडाच्या फुलांच्या कोवळ्या पानांची वाटून चटणी करत. थोडे दिवसांनी छोटी छोटी चिंचेचे बुटुक येत ते गोळा करून घरी घेऊन येत चिंचा फोडून चिंचोके घेऊन खेळायला बसत.
झाड तसेच होते ,नव्हता तो खायचा उत्साह आणि ते बालपण. सुमाने मोबाईल फोन घेऊन तळ्याचे व झाडाचे फोटो काढले….
झाड तसेच होते ,नव्हता तो खायचा उत्साह आणि ते बालपण. सुमाने मोबाईल फोन घेऊन तळ्याचे व झाडाचे फोटो काढले….
घरी येता येता वाटेत शाळेच्या गेटपाशी जाऊनही फोटो घेतले, शाळेतील प्रार्थना कानांत घुमत होती
"दयाघना, दयाघना शांती दे आमच्या मना." गुणगुणत ती घरी परतताना पाठक बाईंचा अशोक भेटला "काय म्हणते सुमा अजून राग आहे का नाकावर? "
"दयाघना, दयाघना शांती दे आमच्या मना." गुणगुणत ती घरी परतताना पाठक बाईंचा अशोक भेटला "काय म्हणते सुमा अजून राग आहे का नाकावर? "
"काय रे तू पण-- सुमाने हसून म्हटले ."
पाठक बाईंच्या बागेत झोक्यावर ती आणि निमा झोके घेत असत. कोणाचा झोका उंच जातो ह्याची चढाओढ असायची.
एकदा अशोकने जोरात झोका दिला,सुमा पडली होती कपाळावर खोक पडली म्हणून त्याचा राग म्हणून ती अशोकशी बोलत नसे. कपाळावरचा व्रण अजून तसाच आहे.
त्या आठवणींनी तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. झोक्यावर बसून तिने अशोक बरोबर एक सेल्फी घेतली,
रहाणार आहे कां ग सुमा कि --
आहे एक दिवस अजून
आई ला भेटायला ये जमलं तर अशोक ने निमंत्रण दिले.
पहाते जमलं तर,बाई ना नमस्कार सांग माझा…

पूर्वी शाळेत असताना या वाटेनी येताना अनेक झाडे, पक्षी दिसत त्यांची पिस गोळा करून वही त दाबून ठेवायची म्हणजे ती वाढतात अशी बालमनाची समजूत असायची, वाटेत ला एखादा दगड पायाने ढकलत ढकलत घरा पर्यंत आणायचा.
ते सर्व आठवून तिला हसू आले. आता झाडे कमी झाली आणि दुकाने जास्त.. निमा ला भेटून ही किती तरी वर्ष झाली .
ते सर्व आठवून तिला हसू आले. आता झाडे कमी झाली आणि दुकाने जास्त.. निमा ला भेटून ही किती तरी वर्ष झाली .
निमा आणि ती अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी आठवी पास झाली आणि निमा च्या बाबांची बदली झाली .त्या नंतर कधीतरी पत्राने भेट व्हायची पण मग हळूहळू ते कमी होत बंद पडले.कुठे असेल निमा? तिला माझी आठवण येत असेल कां?
काय कुठे कुठे फेरफटका झाला कोण कोण भेटलं वहिनीने जेवता जेवता विचारलं??
आता फारसं कोण आहे जुन्या लोकांमधले ?
आणि नवीन आलेले आपल्याला कसे ओळखणारे?
'हो ते ही आहेच!'
दिवस भरात सुमा नी घराच्या प्रत्येक खोलीत जाऊन एक एक फोटो घेतला.
आई बाबांचा एकत्र फोटो , सुमा ने आपल्या सुटकेस मधे ठेवून घेतला.
आई बाबांचा एकत्र फोटो , सुमा ने आपल्या सुटकेस मधे ठेवून घेतला.
तेवढ्यात दादाने जुना अल्बम काढला.
लहानपणचे किती तरी फोटो होते, आईच्या मांडीवर बसलेली सुमा, दादा च्या मुंजीतली कडेवर आईच्या. असे अनेक ब्लँक एंड व्हाईट फोटो मोबाईल फोन वर सेव्ह केले..
लहानपणचे किती तरी फोटो होते, आईच्या मांडीवर बसलेली सुमा, दादा च्या मुंजीतली कडेवर आईच्या. असे अनेक ब्लँक एंड व्हाईट फोटो मोबाईल फोन वर सेव्ह केले..
एक दोन फोटो दादा वहिनी बरोबर काढले.
बागेचा ही एक फोटो घेतला.
किती फोटो काढले तरी मनाला समाधान वाटत नव्हते.
निघताना किती जरी मनाला आवरायचं ठरवल तरी डोळ्यांनी चुगली केलीच मग सुमा ने त्यांना मनसोक्त वाहू दिले.
बागेचा ही एक फोटो घेतला.
किती फोटो काढले तरी मनाला समाधान वाटत नव्हते.
निघताना किती जरी मनाला आवरायचं ठरवल तरी डोळ्यांनी चुगली केलीच मग सुमा ने त्यांना मनसोक्त वाहू दिले.
बरं सुमा तुझं काय म्हणणं आहे घर विकून झाले कि पाठवेन मी पैसे ,अजुन काय हव ते निःसंकोचपणे सांग.
दिल रे पुष्कळ तुम्ही मला, आणि खरच सांगते पैसा अडका काही नकोय .
घेतलं रे मी मला जे हवंय ते सर्व मनात साठवून ठेवले आहे आणी याच्यात फोन कडे बोट दाखवत सुमा हसुन म्हणाली "आठवणींचा कोलाज "केला आहे. बाकी आता काही नकोय"म्हणत सुमा दादा च्या गळ्यात पडली.
-------------------------------------------
समाप्त..

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा