आधी वंदू तुज मोरया
विश्वासने कॅनव्हास ,रंग, पॅलेट सगळे बाजूला सारलं आणि खिडकीपाशी येऊन उभा राहिला त्याचे मन उदास झाले,
चारच दिवस उरले आहे इंटरनॅशनल पोट्रेट कॉम्पिटिशन ला. काय काढावे? काहीच मनाला पटत नाहीये.
एक दोन लँडस्केपची ट्रायल झाले पण स्पर्धेच्या लायक असे काही वाटत नव्हते मन सैरभैर झाले.
आतापर्यंत त्याचे नावं एक चांगला चित्रकार म्हणून ख्यातनाम होते त्यालाच साजेसे पोट्रेट काही घडत नव्हते. उदास मनाने विश्वास बेडवर येऊन पडला.

बराच वेळाने त्याला झोप लागली. स्वप्नात त्याला आजोळचे गाव दिसत होते. छोटा विश्वास, आजोबा व आई . एक दिवस आई आजोबांना म्हणाली
“बाबा. "यालाही तुमच्यासारखीच
चित्रकलेची आवड आहे व हातात कलाही आहे तुम्ही शिकवाल कां ?" आई ने विचारले.
“बाबा. "यालाही तुमच्यासारखीच
चित्रकलेची आवड आहे व हातात कलाही आहे तुम्ही शिकवाल कां ?" आई ने विचारले.
"शिकायचे कां रे?"आजोबांनी विचारले?
' होs मला की नाही वाघ शिकायचा आहे ..
"अरे बापरे एकदम वाघच?
“ अरे आधी कलेचा श्री गणेश तर होऊ दे" .
'म्हणजे काय आजोबा?'
" अरे --सगळ्या कलांचा अधिपती तो म्हणजे गणपती तेव्हा "आधी वंदू तुज मोरया"म्हणजेच आधी श्री लिहून दाखवतो म्हणत आजोबांनी कागदावर सुंदर असे श्री लिहिले, त्यात गणपतीचा चेहरा दिसत होता.
'अरे वा किती मस्त' .
मग विश्वास ने ही प्रयत्न केला..
जितके दिवस विश्वास आजोळी होता रोज आजोबांकडून चित्रकला शिकत होता.

सुट्ट्या संपल्या शाळा सुरू झाल्या तशी गावाहून मुंबईला परत, नंतर मोठे वर्ग ,काॅलेज खूप सा अभ्यास यात आजोळी जाणे कमी कमी झाले.
आणि नंतर आजोबाही गेले .
आणि नंतर आजोबाही गेले .
सकाळच्या भूपाळीचे स्वर."
उठा उठा हो महागणपती "विश्वासच्या कानावर आले ,नी तो जागा झाला.
मनाला प्रसन्न वाटत होते मार्ग गवसल्यासारखे जाणवले .उठूनतो स्टँड पाशी येऊन उभा राहिला डोळे मिटून गजाननाचे स्मरण करून कुंचला हातात घेतला व लपेट दार श्री काढला. कानामध्ये लहानपणी आजोबांच्या आवाजात ऐकलेले. "गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ" - -गुंजत होते.

दोन दिवसाच्या अथक परिश्रमाने त्याने गणपतीचे सुंदर असे पोट्रेट तयार केले आपल्या या कलाकृतीवर त्याचाविश्वास बसत नव्हता. कोणी करून घेतले? हे नक्कीच सर्व कलांचा अधिपती जो गणपती तोच, त्याचेच हे काम त्यानेच आपल्याकडून पोट्रेट पूर्ण करून घेतले. असे जाणवताच त्याचे दोन्ही हा त जोडून जय गणेश म्हंटले…
------------------------------------------©®सौ. प्रतिभा परांजपे
------------------------------------------©®सौ. प्रतिभा परांजपे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा