भाग १
"राधा ऊठ अग ८ वाजलेत बघ. किती हा उशीर परत ईशाच्या लग्नाला घेळेवर पोहोचायला उशीर होईल." आई राधाला झोपेतून उठवत म्हणाली.
"राधा. आपल्या कथेची नायिका थोडीशी सार्धी निरागस पुण्याला गरवारे कॉलेजमध्ये शिकणारी पण अजूनही आयुष्यात काय करायचं हे न ठरलेली..... आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी. मस्तीखोर पण तितकीच हळवी....
राधा.. राधा देशमुख तिचे बाबा विजय देशमुख हे एका महाविद्यालयात शिकवलीत. ति तिचे बाबा आणि लहान भाऊ अध्याय अस तिचे चौकोनी कुटुंब आणि काही खास मित्रमैत्रिणी एवढस तिच जम. २-३ दिवसात तिच्या खास मैत्रीणीच म्हणजे ईशाच लग्न होत. लग्न हे कोल्हापूर ला होत. त्यामुळे ती आज तिच्या गावावरून कोल्हापूरला निघणार होती.
आईने आँबाज दिल्यानंतर तिनें आवरायला घेतल. एका तासात तिच आवरून ती कोल्हापूरला निघाली. तिच गाव तस कोल्हापूरच्या जवळ असल्याने तिला पोहोचायला १-१:३० तास लागणार होता. आई बाबांच्या पाया पडून ती बसमध्ये बसली आणि तिने ईशाला फोन लावला.
ईशा - "ओ ताई कुठे आहात तुम्ही? तु येर्णार आहेस की नाही माझ्या लग्नाला ? २ दिवसांनी लग्न आहे माझ कधी पोहचणार आहेस इथे? निघालीस का तु ?"' राधा - "अग हो हो जरा श्वास तर घे. निघालेय मी बस मध्ये हे आता आणि काय गं अचानक लग्न ठरलय अस सांगत का कुणी मला तर नीट तयारी करायला वेळ पण नाही मिळाला."
ईशा -" हो ग राणी. पण सगळ कस अचानक ठरल बघ.। पण आता सगळे एवढे खुश आहेत ना मला खूप छान वाटतयं."
ईशा -" हो ग राणी. पण सगळ कस अचानक ठरल बघ.। पण आता सगळे एवढे खुश आहेत ना मला खूप छान वाटतयं."
राधा - "हा ते पण आहे. बर चल मी झोपते थोडावेळ सगळ्या गप्पा फोनवर मारायच्या आहेत का? भेटून बोलू आता बाकीच बाय."
ईशा -" हो बाय आणि पोहोचलीस की फोन कर." राधा -" हो."
ईशाचा फोन झाल्यानंतर तिने मस्त हेडफोन कानात टाकून गाणे ऐकत बसली आणि तिच्या मनात ईशाच्या लग्नाबददल विचार सुरू होते.
नमस्कार वाचकहो कथा लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न ... काही चुकल तर मोठ्या मनाने माफ करा आणि चुका झाल्या असतील तर नक्की सांगा
भेटू पुढील भागात......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा