Login

आदिरा....भाग ३

भाग ३

भाग - ३


खर तर तुम्हा सर्व वाचकांचे मनापासून आभार मला माझ्या कथेला हा प्रतिसाद खरच अनपेक्षित होता यामुळे मला ही कथा लिहायला अजूनच हुरूप आला. काही जणांच्या प्रतिक्रियेची दखल घ्यायला जमल नसेल तर क्षमस्व

And our story continues.........

राधाने कोल्हापूरला पोहोचल्यावर ईशाला फोन केला. ईशाचा बाबा तिला घ्यायला बस स्टँड वरुन घरी घेऊन आले. ईशाच्या आई बाबांच्या पाया पडून तिने ईशाला hug केल. दोघीही खूप भावनिक झाल्या होत्या. कितीतरी दिवसांनी भेटत होत्या त्या..... राधा होस्टेलला असल्यामुळे त्यांची क्वचितच भेट होत असे. पण फोन वरून बोलण चालू असायचय.

ईशाची आई - "बर राधा फ्रेश हो, आणि चहा प्यायला ये. नाश्ता करतेस का थोडा?" राधा - "नको काकू चहा घेईल मी. "

ईशाचा आई -" ईशा तिला तुझ्या खोलीत घेऊन जा आणि जरा आराम करा थोडा वेळ मी चहा घेऊन आलेच ५ मिनीटात. " ईशा - 'हो आई चल राधा. '

राधा रुम मध्ये गेल्यावर फ्रेश व्हायला निघून जाते. ईशा बेडवर आराम करते राधा फ्रेश होऊन आल्यावर.....

ईशा - "राधु फोन कुठे आहे तुझा? काकूंचा फोन येऊन गेलाय किती वेळ. त्यांना फोन करून पोहोचलीस अस सांग."
राधा - " अग हो विसरले होते थांब सांगते फोन करून राधा आईला फोन लावते

राधाची आई - "अग बाळा ईशाच्या घरी पोहोचली की एक फोन करायचा नं आम्हाला उगाच काळजी वाटते. "

राधा - "हो ग आई सॉरी लक्षात नाही राहिल पोहोचले मी. राधाची आई - बर ठीक आहे. ईशा बरोबर बोलायचं आहे मला फोन दे बर तिच्याकडे." राधा ईशाला फोन देते ईशा - "हा काकू कशा आहात तुम्ही?"

राधाची आई - "मी छान आहे गं आमच्या नवरीबाई कशा आहेत आणि जावई बापू

कसे आहेत

ईशा (लाजत)" काय काकू तुम्ही पण... मी ठीक आहे आणि हे पण. राधाची आई - "अग बाई हो का चांगलय मग. ईशु खरंतर आम्हाला सगळ्यांना यायच होत लग्नाला पण नेमक राधाच्या बाबांना सुट्टी नाही आणि अध्यायच्या परीक्षा आहेत."

ईशा - "ठीक आहे काकू राधा आहे नं सोबत आणि लग्न झाल्यानंतर आम्ही येवू तुम्हाला

भेटायला."

राधाची आई - "हो बाळा नक्की... बर आवरा तुम्ही मी ठेवते फोन आता." ईशा - "हो काकू बाय. " "राधा - "आई ना बरोबर बोलते तुझयाबददल." ईशा - "काय बोलतात काकू?",

राधा - "हेच की तुझ्यासोबत असले की माझ्या काही लक्षात राहत नाही." ईशा - "खरच आहे ते"

वाचकहो आता तुम्हाला ईशा आणि राधा खऱ्या अर्थाने कळतीलएएएए राधा - "काय ग माकडे तुझ्याशी लग्न करायला कोण बिचारा तयार झाला? नाही म्हणजे ही म्हैस कस काय पसंत पडली !!!!! अवघड आहे पुढे बिचाऱ्याच." आंधळा नाही ना तो.....

ईशा - "अग नालायक गाढव चांगला धडधाकट आहे तो कळल का आणि काय मी माकड हा मी म्हैस ईशा आणि राधाची पकडापकडी आणि ईशा - "मी माकड का थांब बघते तुझ्याकडे. " मारामारी सुरू होते आणि अजून काय म्हैस. राधा - "सॉरी सॉरी तुला म्हैस म्हणण म्हणजे म्हशीचा अपमान आहे हा. तु हडळ

या दोघींची अशी मारामारी सुरू असताना अचानक ईशाची आई येते, आणि ईशाला ओरडते-"ईशा काय चाललंय तुझ अस मारतात का राधू ला आपली पाहुणी आहे ना ती. लग्न आहे तुझ आता जरा नीट वागायला शिक आता. एवढी मोठी झाली तरी बालिशपणा गेला नाही तुझा."

ईशा -"अग पण आई माझी काहीच चूक नव्हती." राधा - "नका बोलू तिला काही. खर बोललं असाच की राग येतो तिला. माझी बहुतेक २-३ हाड मोडली काकूTHETIC लय मारलं मला काकू नका करू ओ हिच लग्न उगाच त्या बिचाऱ्याच वाटोळं."

ईशाची आई - "हो गं मला पण कळतयं ग पण आम्ही तरी किती वर्ष सहन करणार."

राधा आणि ईशाची आई दोघीही हसत होत्या रडकुंडीला आली होती ईशा मात्र शेवटी दोघी पण तिला बोलल्या" अग ईशु आम्ही गंमत करत होतो तुझी सॉरी ........

ईशाची आई - " अग ईशु आम्ही गंमत करत होतो तुझी उलट राजेश किती भाग्यवान आहे त्याला तुझ्यासारखी समजूतदार बायको भेटणार त्याला." राधा ईशा - " तु गप हा "समजूतदार" नाहीतर लय मार खाशील माझा आई हिला सांग ना ग किती त्रास देतीय मला ही हिला कोणी बोलवलय लग्नाला? "

ईशाची आई - "तुच बर ऐका चहा घ्या तुम्ही दोघी आता, पुरे झाली मस्करी आणि आवरायला घ्या आता संध्याकाळी पाहुणे येतील.", चहा चे कप देत ईशाच्या आईने सांगितल.
राधा आणि ईशा - "हो."

ईशाच्या आई रूममधून निघून जातात.

राधा - "अग ए भुता फोटो तरी दाखव जीजूंचा. मी तर खरच खुप excited आहे त्यांना भेटायला. "ত হতে হতে

ईशा -" फोटो कशाला थोड्यासाठी ? त्यापेक्षा भेटलयावरच बघ हा त्यांना आणि तुला खूप घाई झालीय त्यांना भेटायची ??"

राधा - "बर राहील, आणि काय गं नाही भेटायच त्यांना हा??"

ईशा - "गप आता उगाच मला पिडू नकोस, आवरते मी." ती लाजत आवरायला घेते."

राधा - "ओयहोय काय लाजताय मॅडम." त्या दोघी मेहंदीच्या कार्यक्रमासाठी तयारी करतात. "

तर To all my readers....... पुढील भागात मेहंदी आणि संगीत आहे 1. मला पण तयारी करायची आहे ईशु च्या मेहंदीची तरी तुम्ही या भागाला उत्कृष्ट प्रतिसाद द्या. कथा, त्यातील पात्र याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते ही सांगा. काही बदल अपेक्षित असतील तर comment करून सांगा. पुढील भागात finally आपल्या कथेचे नायक आणि नायिका भेटणार आहे