Login

आई आणि मावशी

Mother

आई आणि मावशी 

  आई म्हणजे माझा जन्म..!

  मावशी म्हणजे 'मी' झाल्याचा आनंद..!!

 आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात..!  

 मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट..!!

 आई म्हणजे शब्द..!

  मावशी म्हणजे कविता..!!

 आई म्हणजे गोधडीतील उब..!         

मावशी म्हणजे गुलाबी थंडगार हवा..!!

 आई म्हणजे उत्साह ..!

 मावशी म्हणजे नुसतीच मज्जा..!!

 आई म्हणजे लाड..!

  मावशी म्हणजे हट्ट..!!

  आई म्हणजे discussion..!

  मावशी म्हणजे suggestion..!!

 आई म्हणजे Birthday..!

 मावशी म्हणजे celebration..!!

 आई म्हणजे balance..!

 मावशी म्हणजे phone..!!

 आई म्हणजे कधीकधी ओरडणे..!

 मावशी म्हणजे फक्त मिठीत घेणे..!!

 आई म्हणजे विठ्ठल..!

 मावशी म्हणजे रखुमाई..!!

 आई म्हणजे माझा विश्वास..!    

मावशी म्हणजे माझा आशीर्वाद..!!

 आई म्हणजे हृदय ..!

 मावशी म्हणजे शरीर..!!

आई म्हणजे माझ सुंदर आयुष्य..!

 मावशी म्हणजे त्या आयुष्याचा सुंदर चित्रकार..!!

0