आई दमलीस का?
( पावसाळी कथा स्पर्धा)
````````````````````````````````````````````````````````
रिया एका मध्यम वर्गीय कुटुंबातील सुशिक्षित मुलगी. रियाच कुटूंब तस म्हणायला लहान होत. रियाचे बाबा सचिन पुण्यात कामाला होते. त्यांच गावही पुण्याजवळलच एक खेड गाव होत. सचिनने शिक्षणासाठी गाव सोडल ते सचिन लग्न झाल्यावर शहरातच स्थायिक त्याचे आई बाबा कधी कधी यायचे त्याच्या कडे. रियाची आई माधवी दहावी उत्तीर्ण झालेली. दहावी होताच हात पिवळे झाले ते हातावर मेहंदी चे डाग पुसट होत नाहीत तोच मनावर अपमानाचे, शरीरावर माराचे ,जेवण बनवताना लागलेल्या चटक्या चे डाग लपवत हसतमुख एका कठपुतळी सारखी सासरच्या प्रत्येक गोष्टीत समाधानी व सहनशीलता कायम ठेवत जगण्याची सवय जडलेली. ज्या घरात ती आली ते कधीच तिचे झाले नाही. होय म्हणायला जे घर होते त्यांची परिस्थिती च नसल्याने माधवी नें कधीच मागे वळून पाहिले नाही की ब्र शब्द तक्रारीचा नाही कधीच नाही. रियाला दोन भावंड प्रथम (थोरला ) प्रितम ( धाकटा) . प्रथमच रिवा सोबत लग्न झाल होत. दोघांची जोडी अगदी गोड. रिवाही मनाने , स्वभावाने छान, सुंदर, समजदार. रिया च लग्न झालेल्या २ वर्षातच प्रथमच लग्न झाल होत. रिया दिल्या घरी सुखी होती. तिचा नवरा योगेश ही चांगला होता. त्याचा स्वतःचा बिझनेस होता. त्यांना एक मुलगा होता.रिया सासरी असली तरी तिथले वातावरण फार चांगले होते. अगदी काहीच लादले जात नव्हते. त्यात रियाचा स्वभाव असा की कोणी तिला काही बोलत नव्हते. ती रागीट , चिडकी अशी नव्हती फक्त जे पटल नाही किंवा न जमल्यास सरळ बोलणारी होती. तिच्या माहेरी मात्र चित्र उलट होत. काही बोलण्याची सवड नाही. तरी रिया शांत बसेल तर शपथ. माहेरी आजी , आत्या यांच किती आई करते हे ती पाहात होती. पुढे सून येण्याने काही फारसा फरक पडला नाही. माधवी वर यायचा तेवढा व्याप येतच होता.
रियाचे बाबा सचिन आपल्या पत्नी ला म्हणजेच माधवीला चारचौघात घालून पाडून बोलायचे. रिया ला वाटल हे चित्र सून आल्यावर तरी बदलेल तशी तिने समजूत ही घातली होती बाबांची. पण नाही , हे चित्र उलट सुरु होत म्हणजे काय तर सूने समोर ही तिची लायकी काढली जायची. सून ती सून च शेवटी बघता बघता तिने संपूर्ण घराची कुंडली ओळखली. थोड्या दिवसात सूनेने देखील सासूच्या बोलण्याला दूर्लक्ष करू लागली. सासूच्या एखाद्या बोलण्यावर तिचा हसा करू लागली. प्रथम देखील अधून मधून आईला अक्कल शिकवू लागला होता. शहाणपणाच्या बाता तो ही घरातील वडिलधाऱ्या सारख बोलू लागला. सचिनला हे सर्व माहीत असताना देखील काय मजल ? त्याच्या पुरुषत्वाची की तो बायकोच्या बाजूने उभा राहील. रिया हे सर्व बालपणापासून पाहात होती . यामुळेच तिचा स्वभाव बंडखोर झाला होता. आई सोबत तिचं तितकस पटत नव्हतं पण लग्नानंतर तिला आईची काळजी वाटू लागली. रोज तीच पाचवीला पुजलेली काम करून तिची आई दमत होती. रियाच्या माहेरचे सर्व जण गावी स्थायिक होती. गावी शेती असल्याने ती काम वेगळी. माधवी शहरातील असल्याने ही सर्व काम तिला पटकन हाती घेता आली नाही. तरीदेखील कामावर हातखंडा होता माधवीचा. नुसती घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी. रियाला राग यायचा पण करणार काय? ती सासरी बसून. रियाची आई कधी कधी रडायची तिच्या समोर. माहेर ही नव्हत कि जाईल दोन- एक दिवस तिथे म्हणायला. यात माधवीला हाय बिपी चा त्रास सुरु झाला. असही मरायचच म्हणून माधवी कधी आठवण येईल तेव्हा गोळ्या खात.
रियाला आता आईच्या स्वभावाची व सवयीचे राग व किव येऊ लागली. रियाने रोजच्या सारख आईला विडियो कॉल केला होता. आईचे भाव ती चेहर्यावरून ओळखत होती. तिला आई दमल्या सारखी वाटली. तस ती दुसऱ्या दिवशी येणार आहे हे सांगण्यासाठी कॉल केला होता. विचारपूस करून ती फोन ठेवते. रियाचा नवरा योगेश ४ दिवस बिझनेस ट्रेनिंग साठी बाहेर जाणार होता याच निमित्ताने रियाने दोन दिवस गावी जाण्याच ठरवल. माधवी रिया सोबत बोलून फोन ठेवते. रात्र झालीच होती मग ती निजते. रियाने आईला मेसेज केला होता. ' आई दमली असशील तर झोपत जा ग. बोलण गरजेच नाहीये. तब्येत सांभाळ. व्हॉट्स ॲप तेवढा चेक कर मेसेज केला आहे काळजी पूर्वक वाच आणि अंमलबजावणी झालीच पाहिजे माझी ऑर्डर आहे ही! बाय .'
रिया व्हॉट्सअप वर आईला मेसेज करते.
' आई हे उद्या येत आहे मी. सहजच येतेय. राहणार आहे मी. तू काय जास्त व्याप घेऊन काहीच बनवत नको बसू. रोजच बनव भाजी चपाती चालेल मला. मी आल्यावर जरा बाबांवर ओरडणार आहे आता मग तू लगेच सावित्री होण्याची गरज नाहीये कळतय ना तुला ? रिवा तशी चांगली आहे पण म्हणून काय तिला बसवून ठेवायची गरज नाही. तस बसत नाही ती हे पाहिलय मी पण तू तुझा व्याप कमी कर प्लीज. धुणी भांडी साठी बाई लाव. उद्या यासाठीच येतेय मी. कोणाची बोलणी गिळायची काही एक गरज नाहीये. आपल्याहून लहानांची तर मुळीच नाही. उगीच अलका कुबल नको होऊ देऊ स्वतःची. तस तिला रडण्याचे पैसे मिळतात तुझ्या तर कामाची कदर नाही कुणाला. काळजी घे.'
एवढा मेसेज करून रिया झोपते. आई मेसेज वाचत नाही कारण गाढ झोप लागते तिला.
दुसऱ्या दिवशी रिया गावी जाण्यास निघते. पाऊस मुसळधार लागतो. ट्रेन सगळ्या ठप्प होतात. मग ती बस किंवा कारने जायच ठरवते. बसने जायच ठरत. मुलाला घेऊन ती निघते. बस गावाच्या जवळ जवळ पोहचणार त्या वेळेत पावसामुळे रस्ते तुंबतात. गाव तस जवळच होत पुण्याहून ती पुण्याहून गावी जाण्यास दुसरे लोकल गाडीवाले पाहते. इतक्यात एक बाई तिला आवाज देते. पाहते तर तिची आईच. अग आई तू इथे अशी ? कोण आलय सोबत. आई उत्तरते : " एकटीच आले आहे अग. बर ही छत्री घे"
रिया " आई तू भिजशील ग. माझ रेनकोट त्या बस मध्येच विसरले मी" म्हणत डोक्यावर मारते स्वतःच्या. माधवी असू दे म्हणत छत्री देते व एका गाडीजवळ नेऊन घरी जाण्यास निघते व म्हणते "बाळा खरचं दमलेय बघ आता विश्रांती घेते ". रिया आईला सोबत घेऊन त्या गाडीतून गावी पोहोचते. या वेळेत रियाचा फोन बंद पडलेला असतो. योगेश, प्रथम किंवा तिच्या बाबांचा कॉल मेसेज काहीच तिला मिळत नाही. गावच्या वेशीत प्रवेश करताच तिला विचित्र अस वाटत सगळ्यांच्या नजरा तिच्यावर ती गाडीतून उतरते बघते तर आई नव्हती सोबत. ती शोधते ड्राइव्हर म्हणतो "ताई तुम्ही एकट्याच होत्या प्रवासात. एक बाई तुम्हाला बसवून ती गेली बसलीच नाही गाडीत."
रियाला घाम फुटतो ती घाबरते तशीच एक गावातील ओळखीची बाई तिला धरून घरी नेते. घरी माधवी जी रात्री झोपली तिला मेजर अटॅक आल्याने जागीच जाते. कायमच आराम करायला जस माधवी स्वतः म्हणायची. " एकदाच आराम मिळेल मला".
घरात इतक्या निश्चिंतपणे निजलेली आई रियाने पहिल्यांदाच पाहिली होती. हे पाहून रिया एकच वाक्य उद्गारते " आई दमलीस का गं?" व धाडकन जमिनीवर कोसळते.
------------------------
समाप्त
( समस्त आईंना समर्पित ज्या रात्र दिवस कामात व्यस्त असतात. काळजी घ्या स्वतःची तुमच्या मागे तुमची आई- बाप झालेली मुलं मायेला पोरकी होतील . )
=================
लेखिका : सौ. शगुफ्ता ईनामदार- मुल्ला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा