तोडून पाश बालपणीचे
सोडते घर ती माहेरचे,
स्विकारण्या नवी नाती
ओलांडते माप सासरचे.
सोडते घर ती माहेरचे,
स्विकारण्या नवी नाती
ओलांडते माप सासरचे.
अनोळखी लोक वाटे जरी
समजून त्यांना आपले करते,
विसरुन माहेरचे जग सारे
सासरीच ती एकरुप होते.
समजून त्यांना आपले करते,
विसरुन माहेरचे जग सारे
सासरीच ती एकरुप होते.
बनून घरची लक्ष्मी जणू
घरादाराला नीट सावरते,
सान थोरांची सर्वच कामे
आपुलकीने तीच आवरते.
घरादाराला नीट सावरते,
सान थोरांची सर्वच कामे
आपुलकीने तीच आवरते.
नऊ महिने नऊ दिवस
पोटात गर्भास वाढविते,
असह्य वेदनेच्या कळाने
गोंडस पिलास जन्म देते.
पोटात गर्भास वाढविते,
असह्य वेदनेच्या कळाने
गोंडस पिलास जन्म देते.
सांभाळते कष्टात कौतुकाने
आई होऊन संगोपन करते,
स्वत: उपाशीपोटी राहूनही
पोटच्या लेकरांना भरविते.
आई होऊन संगोपन करते,
स्वत: उपाशीपोटी राहूनही
पोटच्या लेकरांना भरविते.
कुटुंबाच्या सुखासाठी ती
स्वप्न अन् दु:खाला विसरते,
तरीही विचारलेच जाते की
आई कुठे काय करते?
--------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©️
मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे
स्वप्न अन् दु:खाला विसरते,
तरीही विचारलेच जाते की
आई कुठे काय करते?
--------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©️
मु.पो.गडद,ता.खेड,जि.पुणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा