आई पणाची सावली
भाग १
भाग १
"समीर, प्लीज... फक्त पाच मिनिटं बाळाला बघशील का ? मला नीट आंघोळ तरी करू दे. चार दिवस झाले डोक्यावरून पाणी घेतलं नाहीये मी." अमृताने अत्यंत थकलेल्या सुरात विनवणी केली.
समीर लॅपटॉपवर नजर खिळवून म्हणाला,
" अगं अमृता, बघतोयस ना क्लायंटची मीटिंग आहे. आणि त्यात हे काय तुझं रोजचं ? आईने सांगितलं होतं ना, बाळ झाल्यावर थोडं अंगावर घ्यावं लागतं. तू तर साध्या साध्या गोष्टींचा डोंगर करतेस."
" अगं अमृता, बघतोयस ना क्लायंटची मीटिंग आहे. आणि त्यात हे काय तुझं रोजचं ? आईने सांगितलं होतं ना, बाळ झाल्यावर थोडं अंगावर घ्यावं लागतं. तू तर साध्या साध्या गोष्टींचा डोंगर करतेस."
अमृता काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं. तिने रडणाऱ्या चिमुकल्या अद्वैतला जवळ घेतलं आणि बाथरुमचा विचार सोडून पुन्हा सोफ्यावर बसली. संवाद तिथेच संपला होता, पण मनातलं द्वंद्व सुरू झालं होतं.
बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत अमृताचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं.
बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांत अमृताचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं.
गरोदरपणात जो समीर तिचे प्रचंड लाड करायचा, आपलं बाळ म्हणून स्वप्न रंगवायचा, तोच आता बाळाच्या जबाबदारीपासून लांब पळत होता. त्याला वाटायचं की ऑफिसला जाऊन पैसे कमवणं ही त्याची जबाबदारी आहे आणि घर-बाळ सांभाळणं हे अमृताचं नैसर्गिक कर्तव्य. पण हे कर्तव्य पार पाडताना अमृताचं अस्तित्व हळूहळू पुसले जात होतं.
सकाळचे नऊ वाजले होते. अद्वैत सकाळपासून सारखा रडत होता. त्याला पोटदुखी होती की काय, हे अमृताला समजत नव्हतं. तिने त्याला थोपटलं, अंगाई गायली, पण त्याचं रडणं थांबेना. समीर ऑफिसला जायच्या तयारीत होता.
" अमृता, डबा झालाय का ? उशीर होतोय मला." समीरने आरशात बघत विचारलं.
" नाही समीर, अद्वैत शांतच होत नाहीये. मला स्वयंपाकघरात पाऊलही टाकता आलं नाही. तू आज बाहेर जेवलास तर चालेल का ?." अमृताने घाबरतच विचारलं.
समीरचा चेहरा कपाळावर आठ्या आणत बदलला.
" बाहेरचं खाऊन माझं पोट बिघडतं हे तुला माहीत आहे ना ? नीट मॅनेज का करत नाहीस तू.? आईच्या वेळी तर जॉईंट फॅमिली होती, तरी तिने सगळं निभावलं. तू तर घरात एकटीच आहेस, तरी तुला जमत नाहीये."
हे शब्द अमृताच्या काळजाला आरपार टोचले. ' तुला जमत नाहीये ? '
हा शिक्का तिला रोज सहन करावा लागत होता. समीर घराबाहेर पडला आणि अमृता मटकन खाली बसली. अद्वैत आता शांत होऊन झोपला होता, पण अमृताच्या मनातील वादळ शांत होत नव्हतं.
हा शिक्का तिला रोज सहन करावा लागत होता. समीर घराबाहेर पडला आणि अमृता मटकन खाली बसली. अद्वैत आता शांत होऊन झोपला होता, पण अमृताच्या मनातील वादळ शांत होत नव्हतं.
तिने आरशात स्वतःला पाहिलं. विस्कटलेले केस, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं, अंगावरचे साधे सुती कपडे ज्यावर बाळाच्या दुधाचे डाग पडले होते. ही तीच अमृता होती का, जी दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या कंपनीत टीम लीडर होती? जिचा आत्मविश्वास पाहून लोक तिचं कौतुक करायचे ?
आज तिला स्वतःचीच ओळख पटत नव्हती.
दिवसभर ती यंत्रासारखी कामं करत राहिली. डोकं भणभणत होतं. तिला सतत असं वाटायचं की आपण एक वाईट आई आहोत.
दिवसभर ती यंत्रासारखी कामं करत राहिली. डोकं भणभणत होतं. तिला सतत असं वाटायचं की आपण एक वाईट आई आहोत.
जर आपण बाळाला नीट सांभाळू शकत नाही, तर आपल्याला आई होण्याचा अधिकार होता का? हे विचार तिला खोल गर्तेत खेचत होते. यालाच वैद्यकीय भाषेत पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणतात, पण अमृतासाठी हे फक्त एक न संपणारं दु:ख होतं.
दुपारी आईचा फोन आला.
" काय ग अमृता, कशी आहेस ? बाळ कसं आहे ? "
आईचा आवाज ऐकताच अमृताला हुंदका अनावर झाला. पण तिने स्वतःला सावरलं.
" काय ग अमृता, कशी आहेस ? बाळ कसं आहे ? "
आईचा आवाज ऐकताच अमृताला हुंदका अनावर झाला. पण तिने स्वतःला सावरलं.
" ठीक आहे आई. सगळं व्यवस्थित आहे."
तिला आईला त्रास द्यायचा नव्हता आणि समीरबद्दल तक्रार करून नात्यात कटुता आणायची नव्हती.
तिला आईला त्रास द्यायचा नव्हता आणि समीरबद्दल तक्रार करून नात्यात कटुता आणायची नव्हती.
" सावध राहा ग, बाळंतपणानंतर मन खूप हळवं होतं. समीरला सांगत जा मदतीला. " आईने मायेने सांगितलं.
संध्याकाळ झाली. बाहेर अंधार दाटून आला होता तसाच अमृताच्या मनातही अंधार दाटत होता. तिला कोणाशीच बोलावसं वाटत नव्हतं. भूक मेली होती. रात्री जेव्हा समीर घरी आला, तेव्हा त्याने पाहिलं की घर अस्ताव्यस्त पडलं होतं. सिंक मध्ये भांडी होती आणि अमृता अंधारात बाळाला घेऊन एकटक खिडकीबाहेर बघत बसली होती.
" अमृता, लाईट का नाही लावलास ? आणि हे काय घर करून ठेवलंयस ? जेवायचं काय ? " समीरने चिडून विचारलं.
अमृताने हळूच मान वळवली. तिचे डोळे कोरडे होते, पण त्यात एक वेगळीच शून्यता होती. ती शांत स्वरात म्हणाली,
"समीर, मला वाटतंय मी हरवले आहे. मला मदत हवी आहे."
"समीर, मला वाटतंय मी हरवले आहे. मला मदत हवी आहे."
समीरने उपरोधिकपणे हसून विचारलं,
" मदत ? कशासाठी ? घर सांभाळायला की बाळ? तुला काय वाटतं, मी बाहेर काय पिकनिकला जातो ? मी थकलोय अमृता, मला शांतता हवी आहे."
" मदत ? कशासाठी ? घर सांभाळायला की बाळ? तुला काय वाटतं, मी बाहेर काय पिकनिकला जातो ? मी थकलोय अमृता, मला शांतता हवी आहे."
तो रागात दुसऱ्या खोलीत निघून गेला आणि दरवाजा जोरात बंद केला. त्या आवाजाने अद्वैत दचकून उठला आणि मोठ्याने रडू लागला. अमृताने त्याला उचललं नाही. ती तशीच बसून राहिली. तिच्या मनात विचार आला,
'जर मी इथे नसले, तर कदाचित सगळं शांत होईल.'
'जर मी इथे नसले, तर कदाचित सगळं शांत होईल.'
हे अत्यंत धोकादायक वळण होतं. तिचं नैराश्य आता पराकोटीला गेलं होतं. तिला कोणाची तरी साथ हवी होती, कोणीतरी तिचं ऐकून घेणारं हवं होतं. पण ज्या व्यक्तीकडून अपेक्षा होती, तोच तिला क्षमता नसलेली ठरवत होता.
त्या रात्री अमृताने एक निर्णय घेतला. पण तो निर्णय तिचं आयुष्य संपवण्याचा होता की नवीन संघर्षाची सुरुवात, हे येणारा काळच सांगणार होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा