शीर्षक:- आई रिटायर होते...भाग २
विषय:- थोरलेपण
©® सौ.हेमा पाटील.
आईंनी रोजच्या सारखे आज लवकर उठून डबे का बनवले नाहीत या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी विधी बेचैन आहे. आता पुढे वाचा.
'या मस्त माॅर्निंग वाॅकला गेल्या होत्या. आज आम्हाला विना डबा यावे लागले. बरं, मग आधी कल्पना तरी द्यायची होती यार.'
"आई, सांगायचे तरी ना. आज सगळ्यांना विना डबा जावे लागले." विधीने लिहिले.
"मी रात्री विकीला सांगितले होते. आपण बाहेरुन आलो की, तू लगेच रुममध्ये शिरलीस, ते परत बाहेर आलीच नाहीस." हा मेसेज झळकला आणि तिने विकीला मेसेज केला,
"तुला रात्री आईंनी काही सांगितले होते का?"
"हो, अगं, आजपासून आई जाॅगिंगला जाणार आहे, त्यामुळे विधीला सकाळी डबे बनवायला सांग, असे तिने सांगितले होते. मी रुममध्ये आलो तोपर्यंत तुझी झोप लागली होती, त्यामुळे सांगायचे राहून गेले."
यावर विधीला हसावे की रडावे समजेना.
यावर विधीला हसावे की रडावे समजेना.
रोज दिवसभर कंपनीत काम करुन थकून भागून घरी गेलं की, मुलांकडे लक्ष द्यावे लागते. त्यासोबतच किचनचा ताबा घ्यावा लागतो. सकाळी आई सगळ्यांचे डबे, नाश्ता बनवत, म्हणून झोप तरी मिळायची. आता पहाटे उठून डबे बनवावे लागणार, असा विचार तिच्या मनात आला आणि तिची चिडचिड वाढली.
रात्री घरी गेल्यावर तिने विकीला विचारले,
" आई दिसत नाहीत, कुठे गेल्या आहेत?" विकीने सांगितले,
"आई, बागेत गेली आहे."
तिने संध्याकाळचा स्वयंपाक बनवला व सकाळच्या भाजीसाठी घेवड्याच्या शेंगा निवडून ठेवल्या. रात्री जेवण झाल्यावर सगळे दिवाणखान्यात बसलेले असताना तिने विषय काढला,
"आई, तुम्ही रोज सकाळी जाॅगिंगला जाणार आहात का?"
"म्हणजे काय? जाॅगिंग एक दिवस करतात का? आता रोजच सकाळी मी जाणार आहे."
"जरा उशिरा डबे करुन झाल्यावर गेलात तर बरे होईल. मला एकटीला सगळी कामे लोड होतील. आज तर फक्त संज्योतचा डबा मी कसातरी बनवला. आम्ही सगळे तर बिना डब्याचेच गेलो." हे ऐकून राजेंद्ररावांनी
मान हलवली.
मान हलवली.
"विधी बरोबर बोलतेय. सकाळी जरा उशिरा जा माॅर्निंग वाॅकला. म्हणजे तिची एकटीची तारांबळ उडायची नाही."
"इतकी वर्षे मी एकटीच सगळे करत आलेय, तेव्हा बरी बायकोची काळजी वाटली नाही!" वनिता ताई म्हणाल्या.
"त्यात काळजी करण्यासारखे काय आहे? तिला ऑफीसला जायचे असते. घरी यायला उशीर होतो, म्हणून सांगतोय." राजेंद्रराव म्हणाले.
"मी परवा अठ्ठावन्न वर्षांची झाले. शाळेतून मला रिटायरमेंट मिळाली. याचा अर्थ आता मी कामे करण्यास लायक नाही. त्यामुळे आता मी घरातील कामांपासून सुद्धा फारकत घेणार आहे." वनिता ताई म्हणाल्या.
"असं कुठं असतं का? नोकरीत ठरलेले असते वय, घरात कुठे तोच नियम लावताय तुम्ही आई?" विधी कुरकुरली.
विकी मात्र जे काही चालले आहे ते शांतपणे फक्त ऐकत होता.
विकी मात्र जे काही चालले आहे ते शांतपणे फक्त ऐकत होता.
"नाही तर काय? हिचे आपले जगावेगळेच असते. अशी घरातून कुठे निवृत्ती असते का? नोकरीची गोष्ट वेगळी आहे." राजेंद्रराव म्हणाले.
"तुम्ही निवृत्त होऊन किती वर्षे झाली? चार ना? या चार वर्षांत तुम्ही घरात किती मदत केलीत मला? तुम्हाला तर ऑफीसला जायचे नव्हते. सकाळी माझी गडबड चालू असताना तुम्ही मात्र घोरत पडायचात. आता मी निवृत्त झाले आहे, तर मला मात्र वेगळा नियम का? मीही आयुष्यभर नोकरी करुन संसाराला हातभार लावला आहे." वनिता ताई म्हणाल्या.
यावर काय बोलावे हे विधीला कळेना, कारण सासुबाई जे काही बोलत होत्या, त्यावर अपील नव्हते. विकी तर आधीच गप्प बसला होता.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होते पुढे? वनिता ताई आपला हेका सोडतात का? की आणखी वाद होतात? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा