आई तू हवी होती ग...(भाग२)

कथामालिका
आई तू हवी होती ग

"विश्वास आधी चहा घे बर. शिल्पा तू पण घे."

"ताई , दोन दिवसांनंतर तुम्ही पण जाणार. मग आम्हाला कोणाचा आधार..."

"शिल्पा तू आता आईची जागा घे आणि जप सगळ्यांना. आता माझा भाऊ आणि बाबा तुझी जबाबदारी आहे ग. आई गेल्यानंतर बाबांची तब्येत खालावत चालली आहे आणि मी किती दिवस तुम्हाला पुरणार."

तिघांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले.

"ताई आजी आजोबा गेले आणि ते राहत घरही आपल्याला सोडाव लागलं. मोठ्या बाबांनी आणि आत्यांनी मिळून बाबांच्या सह्या घेतल्या आणि राहत घर स्वतः च्या नावावर करून घेतलं आणि बाबांना स्वतः ची सोय करायला सांगीतली. बर शेतातल्या घरात जाऊन राहावे म्हणत होते. तर एवढासा जमीनीचा तुकडा सुध्दा बाबांच्या नावावर ठेवला नाही."

"विश्वास हळू. बाहेर ..."

"असू दे ग. मला आता फरक नाही पडत."

"हो, पण विश्वास आईने हार मानली नाही. त्या क्षणी एक उत्तम गृहिणी, पतीव्रता स्त्री, कुटुंबाची जबाबदारी म्हणून आई बाबांच्या पाठीशी उभी राहिली. तेव्हा मला वाटतं मी आठवीत होते आणि तू पाचवीला. हो ना."

"हो, स्वतः च्याच डोक्यावर छप्पर उडालेल्या माणसाची काय अवस्था होते हे मला आज चांगल्याप्रकारे समजले आहे. आईला आणि आपल्याला सोबत घेऊन ते शहरात एका मित्राकडे आले. आधीच शिक्षणाचा अभाव, त्यात हाती एकही पैसा नाही. अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. मित्राच्या मदतीने एक खोली भाड्याने घेऊन तिथे संसार उभा केला. मित्राच्या मदतीने एका कारखान्यात काम मिळाले. आईनेही काही घरची स्वयंपाकाची कामे घेतली. आपल्याला झेड.पी.च्या शाळेत टाकले. दिवस सरत होते. पण जखमेवरची खपली निघाली की जसे भळाभळा रक्त वाहते. तसे झाले होते. आज आपले सुखाचे दिवस पाहण्यासाठी आई तू हवी होती ग. आई, तुझ्या स्वप्नांचा पुर्ण चुराडा झाला होता. इतके वर्षे तू मन मारून जगली. आम्हाला तुम्ही शिकून मोठं केल आणि आज...."

"अहो, काय करता शांत व्हा बर. मला वाटतं आज आसवांचा पाऊस आणि शब्दांचा पूर आला की काय?" शिल्पा

"शिल्पा खरंतर छोटस का होईना एक आपल हक्काचं घर हव असं आईला नेहमीच वाटायच आणि आज ते पुर्ण झालेच पण ते बघायला आई नाही ग."

अचानक विश्वास उठला आणि बाबांजवळ गेला. हात धरून आईच्या फोटो जवळ घेऊन आला.
तिच्या फोटो जवळ बसून ढसाढसा रडू लागला.

"काय झाल विश्वास? मला इथे का आणल?"

"बाबा बसा ना जरा. तुमच्या मांडीवर डोकं ठेवायच आहे. बाबा मला थोपटाल का?"

"विश्वास इतका हळवा होऊन नकोस रे." विशाखा

क्रमशः

©® अश्विनी मिश्रीकोटकर



🎭 Series Post

View all