आई तू हवी होती ग...(भाग ३ अंतिम भाग)

कथामालिका
आई आज तू हवी होती ग.

"विश्वास काय झाल? आज असं का वागत आहेस?"

त्याचे रडणे बघून शिल्पा, विशाखा आणि वसंतराव सुध्दा रडायला लागले. घरातील वातावरण अतिशय गंभीर झाले होते. त्यांच्या आवाजाने मोठे काका, काकू, आत्या सगळेच तिथे आले.

"विश्वास , वसंतराव सांभाळा स्वतः ला. अस रडून कसं जमेल." विजयाताई बोलल्या.

"आत्या माझ्या आईचं स्वप्न पुर्ण होता होता राहिलं ग. किती संघर्ष केला आणि हे घर घेण्यासाठी तिनेच मला तर मला पैसे दिले होते. "

"काय बोलतोस विश्वास?"

"हो काका. "

"आमची आई आयुष्यभर आमच्यासाठी झटली. पै पैसा जमवून तिनेच मला तीन लाख रुपये दिले. म्हणूनच तर हे घर बुक करू शकलो मी."

"ग्रेट आहे तुझे आई बाबा विश्वास आणि तुम्हा दोघा बहीण भावाचे विशेष कौतुक. किती संघर्ष करून तुम्ही इथपर्यंत पोहोचले. डोक्यावरच छप्पर नसतांनाही आज तू यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला. शिल्पा तुझही विशेष कौतुक. तू या घरातील सर्वांना आपलेसे केले आणि व्यवस्थिपणे सांभाळून घेतले आणि यापुढेही सांभाळशील. असा मला विश्वास आहे. एक गोष्ट मात्र लक्षात कायमची लक्षात ठेव. माझ्या मित्राला सांभाळून घे."वसंतरावाचा मित्र बोलला.

"काका, काय बोलता तुम्ही? बाबा आहेत म्हणजे आमच घर आहे, कुटुंब आहे. त्यांना दुखवून मी कधीच सुखी राहणार नाही. तुम्ही काळजी करू नका."

"राजेश तू नसता तर हे कदाचित कधीच शक्य झाले नसते. यामुळेच आपलं कोण परक कोण याची जाणीव झाली." वसंतराव

"वसंता वहिनींनी जे केलं त्याची कधीच किँमत करता येत नाही ते अनमोल आहे."

"हो राजेश, आज विश्वास आणि विशाखाने सिध्द करून दाखवले आहे. फक्त खंत एकच हे तिच्या स्वप्नांचं घरकुल तिला बघताच आले नाही. घर बुक केले आणि तिला दाखवण्यासाठी आणणारच की त्याआधीच तिची तब्येत बिघडली आणि जी झोपली ते कायमची."

हे ऐकताच विजया आणि मोठ्या भावाची मान शरमेने खाली गेली. त्यांनी एवढा त्रास देऊनही वसंतरावांनी सगळ्यांना वास्तूशांतीला बोलावले होते.

"बर चला एक फॅमिली फोटो काढू या."

विजयाताई आणि मोठे काका काकू लगेच तयार झाले.

"आत्या काका काकू तुम्ही नंतरच्या फोटोत या. राजेश काका आणि काकू आमच्यासाठी आमचे कुटुंब आहे. त्यांचे उपकार आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. तेव्हा आधी आमचा फोटो."

झालेला अपमान गिळून रात्रीच्या गाडीने सगळे पाहुणे परत निघाले.

©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all