Login

81) आई तुझं लेकरू येड ग.... कोकरू

....
सवय तर... मला लावावीचं लागेल आज तू.. मला रूम बाहेर काढलं उद्या राग आला तर घरातून काढशील त्यापेक्षा मी माझ्या मातीच्या  घरात बरी आहे.

राधा आई काय? बोलतेस तू मी तूला रूम बाहेर काढलं पण कधी,

अरे वा लक्षात नाही का? चांगलं आहे.ज्या गोष्टी लक्षात ठेऊन बाळाला त्रास होणार आहे त्या, गोष्टीचा तूला विचार करायचा आहे.आणि मला रूम बाहेर काढून फक्त काही तास झाले हे लक्षात नाही.बरं आहे असंच असूदे विसरून जा...

राधा आई अग मी केलं असेलं आठवत नाही. पण खरचं माफ कर पण या अवस्थेत तू मला एकटीला टाकून नको जाऊस.प्राजू  डोळ्यात पाणी आणतं म्हणाली.

रडू नको या अवस्थेत रडणं चांगलं नाही बा़ळा,

मग तू जाऊ नको ना...

बर नाही जात  पण तू  रडायचं थांबं,तसे तीने तीचे डोळे पुसले आणि काही तरी आठवत....

राधा आ़ई आठवलं मला मगाशी दुध घेऊन आलीस तेव्हा मी म्हणाले  तूला बाहेर जा ...म्हणून पण तेव्हा तू माझ्या समोर होतीस हे नव्हतं ग माहित भानावर नव्हंते ग ...भानावर असते तर ....मी ,माझ्या राधा आईला अस बोलले असते का?आणि राधा आई तूझ आणि माझं दोघींच पण आयुष्यात कोण? नाही ग ...पण मी तूला माझ्या पासून कधी दुर जाऊ देणारं नाही.एकदा बाळ झालं की तूझं पण मन रमेल.

पण प्राजु तुला जर वाटत असेल. कि, मी....तूझ्या सोबत राहावं तर....माझी एक अट आहे.

कोणती? अट

मी सांगेन तेव्हा तेव्हा तूला खावं लागेल. सर्व विचार सोडून फक्त तू तूझ्या बाळाचा विचार करशील.

बरं राधा आई यापुढे फक्त आपल्या तिघींचा विचार करेन. आणि स्वत;ची काळजी घेईन तू ,जे ....सांगशील तेच करेन पण तूझा हा मायेचा हात काही झालं तरी डोक्यावरून काढू नको.

बरं आता इथे बस शांत हो ,मी गरम गरम दुध आणते ते, पी आणि थोडावेळ आराम कर...म्हणतं राधा आई दुध आणायला निघून गेली. प्राजू हळूच सोप्यांवर बसली.

थोड्यावेळाने राधा आई गरम दुध घेऊन आली. आणि थोड कोमटं झाल्यावर चेतनाला ते संपवायला सांगुन तीला झोपायला पाठवलं.

थोडावेळ असाचं आराम झाल्यावर राधा आईने प्राजुला बघावं म्हणून रूम मध्ये एक चक्कर मारायचा विचार करत तीच्या रूमच्या दिशेने गेली.

तर प्राजू शांत झोपली होती. तशी राधा आई परत येऊन बाहेरच्या रूममध्ये बसली .शिवा आणि किसनच्या गोड आठवणीत मग्न झाली.

थोड्या वेळाने प्राजू झोपेतून उ़ठत राधा आई कुठे?आहेस आवाज देत होती. पण तीला काही राधाने आवाज दिला नाही. म्हणून मग प्राजू बाहे आली. तर ती तीला समोरच्या भिंतीवर असलेल्या फोटो कडे बघण्यात मग्न असलेली दिसली.

राधा आई...बाहेर येताच प्राजू ने तीला परत आवाज दिला.

.उठलीस बाळा ती  प्राजू कडे बघत म्हणाली.

हो राधा आई पण हे काय? रोज फोटो कडे बघण्यात एवढी मग्न

असतेस की,मी मागे येऊन उभी असते तरी कळत नाही तूला हे चुकीचे आहे हा राधा आई....

अग मी एकदा तूला बघून आले पण तू शांत झोपली होतीस म्हणून मग इथे बसले.तर आठवणीत रमले.

मला सांगतेस विचार नको करू आणि तू ...मात्र स्वत;अशी विचार करत बसते.

प्राजू मी काही वाईट किवा त्रास देणारा विचार करत नाही.दोघांसोबत खुप गोड आठवणी आहेत माझ्या त्या आठवल्या कि मनाला समाधान वाटत कि ,ती व्यक्ती मला सोडून गेली तरी त्याच्या आठवणी मी कायम ताज्या करत राहाणार आहे

हो ते आहेचं  म्हणां

हो तू सुद्धा कार्तिक सोबतच्या गोड आठवणीत रमलीस की जास्त त्रास नाही होणार.  राधा आईने कार्तिकच  विषय काढला आणि प्राजू अस्वस्थ झाली

.पण स्वत:ला सावरत राधा आई मी काय? म्हणते बाकी नंतर बोलू पण आता जेवण करुया मला भूक लागलीयकाय? आज अचानक भूक कशी लागलीभूक नाही पण राधा आईलवकर जेवण झालं तरमग जरा फेर्या  मारायला भेटतील विषय बदलत
म्हणाली

प्राजू बाळा मला माहित आहे मी कार्तिक नाव काढून तूझ्या जथमेवरची खपली काढली  म्हणून तू विषय बदलला.
राधा आई मनात मनात म्हणाली .तसं प्राजू ने ,पुन्हा राधा आईकडे बघत....

अगं चल ना काय? विचार करते. राधा आईचा हात पकडून तीला डायनिंग टेबल कडे घेऊन गेली.

ताई .... भूक लागलीयं तूझं झालं असेल तर जेवण वा़ढशील
स्वयंपाकाला असणाऱ्या ताईला आवाज देत जेवण लावायला सांगितलं. तसं काही मिनिटांत जेवण लागलं. आणि दोघींनची जेवण झाली.

ताई तूझं जेवण झालं नाही ना.... प्राजू त्या ताईकडे बघत म्हणाली.

नाही ताईसाहेब,

अग.... तुला कितीवेळा सांगायचं वेळेवर जेवण करत जा....आणि तूला कुठे फुकट खायाचं आहे. स्वत: कमवलेलं खायाला काही अडचण नाही...ते काही नाही आताच्या आता जेवण गरम आहे कि जेवण करून घे....आणि उद्यानात तू....आमच्या सोबत जेवणार आहेस.प्राजू ने प्रेमळ धमकी
दिली तशी ताईने हसुन मान हलवली.

तू ...फक्त मान नको हलवूस जा .....आता तू तूझं जेवून घे....आणि तूझं झालं कि आठवणीने मला एक ग्लास दुध आणून देशील.

हो ताईसाहेब आणते म्हणतं ती निघून गेली.

हा राधा आई जेवण जरा जास्तच झालं .आता फेर्या माराव्या लागतील .ती ताई गेली तशी प्राजू राधा आईकडे व बघत म्हणाली .आणि खुर्चीवरून हळूच उठतं तिकडच्या तिकडे हाँल मध्ये दहा फेर्या मारल्या आणि मग राधा आईला घेऊन रूममध्ये आली.

आणि उशीरा ठोकून बेडवर बसली. पण झोप काही येईना तिने एक नजर राधा आईकडे बघितलं. तर... राधा आई झोपली होती.

अरे... राधा आई झोपली पण पण मला का? झोप येत नाही काय करू विचार करत ती बुक शेल्प जवळ गेली.आणि तीच्या आवडीचं एक पुस्तक उचलं आणि पुन्हा बेडवर येऊन बसली.
आणि पुस्तक वाचण्यांत  मग्न झाली कि, जेवणानंतर ची औषध घेणं विसरली. ते पुस्तक वाचताना  तिचा डोळा लागला

थोड्या वेळाने ती ताई सांगितल्या प्रमाणे दुध घेऊन आली.

अरे मला उशीर झाला का? ताईसाहेब तर झोपल्या पण मग हे दुध उठवावं तर लागेल प्राजूला झोपलेलं बघून ती ताई मनात म्हणाली. आणि प्राजूला आवाज दिला.

तीच्या आवाजाने प्राजू उठत अरे आलीस तू.... कसा डोळा लागला काही समजलं  ना ग्लास तिच्या हातातून घेत म्हणाली तशी ती ताई जाण्यांस निघाली . तशी ती थांबली आणि प्राजू कडे पुन्हा वळल...

ताईसाहेब.....

काय? ग....

म्हणजे? तुम्ही ते जेवणानंतर ची गोळी घेतली का?


अरे देवा विसरले बघ,

ताईसाहेब अश्या गोळ्या चूकवू नका

हो काळजी नको करू आता घेते.

नक्की ना...

हो.. ग.... तूझी काळजी आवडली मला एक काम कर ती गोळी आणि तो पाण्याचा ग्लास दे....तूझ्या समोर गोळी घेते. प्राजू च्या बोलण्यांवर ती ताई बघत बसली.

अग अशी बघू नको दे लवकर प्राजू म्हणाली. आणि तीने लगेच तीच्या हातात गोळी आणि पाणी देऊन टाकलं.

आाणि प्राजू ने औषध घेतली.

बरं ताईसाहेब मग आता मी निघू प्राजूची औषध घेऊन होताच ती म्हणाली. आणि निघून गेली.

ग्लासमधलं दुध थोड कोमट झालं तसा तीने तो ग्लास उचलला आाणि तोंडाला लावला आाणि दुध संपताच ग्लास टेबल वर ठेऊन दिला. आणि मग तीला सुद्धा झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सवयी प्रमाणे राधा आई लवकर उठली तीने एक नजर झोपलेल्या प्राजू कडे बघत गुणाची पोर होती तरे...कार्तिक काय? अवदसा सुचली तूला आणि संसाराची वाट लावलीस.  मनात म्हणाली आाणि प्रेमाने तीच्या कपाळावर हात फिरवला.