आई वडील...

...
आई

एके दिवशी दोन मित्र बऱ्याच वर्षानंतर एकमेकांना भेटले. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्याला सहजच विचारले "आई कशी आहे?" थोड वेळ शांत राहून दुसरा मित्र म्हणाला, "चांगली आहे, दोन वर्षापासून वृद्धाश्रमात राहत आहे. परवाच वाढदिवस झाला तिचा, तेव्हा भेटून आलो तीला." त्यानंतर तो पहिल्या मित्राला म्हणाला "तुझी आई तुझ्याकडेच राहते ना?" त्यानंतर पहिल्या मित्राने मनाला भावेल, असे उत्तर दिले. तो म्हणाला "मी इतका मोठा नाही झालो की माझी आई माझ्याकडे राहील, मीच आईकडे राहतो माझ्या जन्मापासून! आई-वडीलांना वृद्धाश्रमात ठेवणे, खरंच योग्य आहे का? याबद्दल तुमचं मत नक्की सांगा....

🎭 Series Post

View all