।। स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी।।
ये तो सच है कि भगवान है
है मगर फिर भी अंजान है
धरती पे रूप मां-बाप का
इस विधाता की पहिचान है
है मगर फिर भी अंजान है
धरती पे रूप मां-बाप का
इस विधाता की पहिचान है
हे खरे आहे, आई-वडिल हे देवाचे प्रतिक आहे. देवाला प्रत्येक ठिकाणी राहता येत नाही, म्हणून त्यांनी आपल्याला आई-वडिल दिले. आई-वडिलांची किंमत हे दुसरे कुणीही भरू शकत नाही. त्यांच्या शिवाय महत्वाचे व्यक्ती दुसरे कुणीही असू शकत नाही.
एकदा अशीच पृथ्वी प्रदक्षिणा साठी शर्यत लागते गणपती आणि कार्तिकेय मध्ये, कि जो सर्वात आधी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येणार तो शर्यत जिंकेल. कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी धावला. पण गणपती मात्र तिथेच थांबले होते. गणपतीने पार्वती आणि शंकर यांच्या तीन परिक्रमा घालतो. त्यानंतर कार्तिकेय पृथ्वीची प्रदक्षिणा करून परत येतो. पण तेवढ्यात गणपती हे शर्यत जिंकलेला असतो. गणपती म्हणतात कि माझ्यासाठी आई-वडिल म्हणजेच माझ्यासाठी सर्वस्व आहेत, माझे विश्व आहेत. म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या सारखे आहे. म्हणून मी त्यांचीच तीन परिक्रमा घेतलेत.
श्रावणबाळ हा आपल्या आई-वडिलांना खांद्यावर घेऊन जात असे आणि तो त्यांची सेवा करिता असे. श्रावणबाळाचे आई-वडिल शांतनू आणि ज्ञानवंती होते. ते दोघेही आंधळे होते. श्रावण आपल्या वृद्ध आणि आंधळ्या आई-वडिलांची खूप सेवा करतो. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करत होता. श्रावणबाळ आपल्या आई-वडिलांना खूप प्रेम करत होता आणि त्यांची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
श्रावणबाळाची कथा आपल्या जीवनात प्रेम, सेवा आणि निष्ठा या मूल्यांचा अर्थ शिकवते.
वृद्ध आईवडीलांनी काशी यात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर श्रावणबाळाने लगेच त्यांना कावडीत (काठीला तराजू सारख्या दोन टोपल्या लावून त्यात ) बसवले आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो काशी यात्रेला पायी जायला निघाला.
भक्त पुंडलिक आपल्या पालकांची अत्यंत काळजीने सेवा करत असे. त्याच्या सेवेने प्रसन्न होऊन पांडुरंग देव त्यांच्या घरासमोर प्रकट झाले आणि त्याला बोलावले. पुंडलिक आपल्या पालकांची सेवा करण्यात खूप मग्न असल्याने त्याने ऐकले नाही. पांडुरंगानी त्याला पुन्हा बोलावले आणि यावेळी पुंडलिकाला हे कळले नाही की पाहुणे पांडुरंग देव आहेत म्हणून त्याने एक विटा फेकली आणि त्याला वाट पाहण्यास सांगितले. सेवा संपल्यानंतर जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तो पांडुरंग देव विटेवर उभे असलेले पाहून आश्चर्यचकित झाला, त्याच्या कंबरेवर हात ठेवून. त्याने देवांना वाट पाहण्यास भाग पाडल्याबद्दल माफी मागितली. तर देव पांडुरंग म्हणाले की त्याने त्याच्या पालकांची सेवा केलेल्या भक्तीने तो प्रसन्न झाला आणि तेव्हापासून पुंडलिकाचे नाव प्रसिद्ध झाले एक भक्त म्हणून.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा