Login

आईचा पदर

आई बाबा आपल्याला रागावतात. शिस्त पण लावतात. त्यांचे आपण ऐकले पाहिजे.
आईचा पदर

चिंचगावात छोटा गोलू नावाचा ससा राहत होता. त्याचं लहानसं घर आणि त्याची आई — एवढंच त्याचं विश्व होतं. गोलू खूप चंचल, खेळकर, पण थोडा हट्टीही होता. त्याला आईच्या बरच्यांच गोष्टी आवडायचा नाही. त्याला राग यायचा.

रोज सकाळी आई त्याला लवकर उठवायची, आंघोळ घालायची, आवरून तयार करायची आणि शाळेत पाठवायची. डब्यात त्याला आवडणारं गाजर पराठा, फळं आणि लाडू द्यायची. पण गोलूला वाटायचं की आई फक्त ओरडते, मला रोज शाळेत पाठवते. मला शाळेत जाईला नाही आवडत. टीचर रागावते . गोलू मनात म्हणतो.

"गोलू, दात घास! गोलू, बूट नीट घाल!"
त्याला खेळायला वेळच मिळत नाही, असं त्याचं गोड बाळकटी मन म्हणायचं.

तो आईवर चिडायचा आणि म्हणायचा, “आई, तू रोज ओरडतेस, अभ्यास कर म्हणतेस, खेळायला वेळ नाहीदेत, मला मोकळं राहायचंय आहे !”

एक दिवस तर तो इतका रागावला की घराबाहेर निघून गेला.
“मी जंगलात एकटाच राहीन! मला कुणाची गरज नाही!” असं ओरडत तो झुडपात हरवून गेला.

सुरुवातीला मस्त वाटलं — उड्या मारल्या, झाडावर चढला, पानं फाडली. पण हळूहळू अंधार पडू लागला. पक्ष्यांचे आवाज, झाडांची सावली, गडगडणारा ढग आणि पावसाच्या सरी…
गोलू थरथरू लागला. पावसाचा वेग वाढला.
एका झाडाच्या खोडामागे बसून तो रडू लागला,
"आई... आई... मला घरी जायचंय..." मी आईला सोडून कुठेच जाणार नाही. मला आई हवी आहे. गोलू रडत होता. बोलत पण होता.

तेवढ्यात त्याच्या अंगावर एक मऊसा, ओलसर पदर पडला.
आईला समजले गोलू जंगलात गेला आहे. तशी आई धावतच आली होती!
ती म्हणाली, “गोलू, तू कुठं गेलास रे? माझं सर्वस्व तूच आहेस.”
गोलू आईच्या कुशीत शिरला आणि रडत म्हणाला, “आई, आता मी कधीच हट्ट करणार नाही. तू म्हणशील तसं सगळं ऐकेन!”

आईने त्याला घट्ट मिठी मारली.
पावसात तो पदर म्हणजे गोलूसाठी जगातली सर्वात उबदार जागा झाली होती. आई आणी तो घरी निघून गेले.



तात्पर्य:

पालक आपल्या लेकरांवर रागावतात, शिस्त लावतात, पण त्यांच्या प्रेमाला काही तोल नाही.
आई-बाबांचं प्रेम हे झाडाच्या सावलीसारखं असतं — आपल्याला कळतही नाही आणि ते सतत आपल्या मागे असतं… आपलं रक्षण करत असतात.