Login

आईचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी कोणाची... भाग 1.. रीपोस्ट

सगळे आठ वाजेपर्यंत घरी यायचे, घरी आले की त्या तिघांच्या गप्पा चालायच्या, आशा आपली गरम पोळ्या वाढ


आईचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी कोणाची... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
..............

पहाटे सहाचा गजर झाला, नेहमीप्रमाणे आशा दचकून उठली, सगळ्यांना जायचं असतं बाहेर, उगीच उशीर नको व्हायला माझ्यामुळे...

नवरा रमेशला ऑफिसला जायच असत , मुल मोठे झाले, मुलगा सौरभ-मुलगी सारिका दोघं नोकरीला, सगळे बिझी, घरात आशा एकटी पडली होती,....

आशालाच काही काम नसतं म्हणून सगळ घर काम तिला कराव लागायच , आशा ग्रॅज्युएट होती, पूर्वी केला होता तिने जॉब, मुलांमुळे गॅप पडला, वाचन लेखन उत्तम होत तीच....

सध्या सगळ्यांनी गृहीत धरले होत तिला, घरात जरा इकडे तिकडे झालेल चालायच नाही कोणाला, सगळ्यांनी आशाला धारेवर धरल होत, आशाला सकाळी सहाला उठावं लागायच, सगळ्यांचे डबे नाष्टा चहा रेडी ठेवायचं, आंघोळीसाठी सगळ्यांचे हिटर ऑन करून ठेवायचे, त्यांचे रोजचे घालायचे कपडे व्यवस्थित ठेवायचे,...

सगळ्यात आधी नवरा रमेश ऑफिसला जाणार, आठ ला निघायचं असलं की साडेसातला आरामशीर उठणार ते ,

"थोड आधी उठा सोबत चहा घेवू या",...... आशाने एकदा सांगून बघितल,

"सकाळी काय बोलणार? माझा आराम होत नाही",..... त्यांनी सांगितले,

रमेश कुठलीही वस्तू हाताने घ्यायचा नाहीत, आशा माझ रुमाल कुठे? पाकीट कुठे? कारची चावी कुठे? या साठी आशा लागायची, आदल्या दिवशीचा डबा सुद्धा घासायला टाकायचे नाहीत, तोही आशालाच घासायला टाकायला लागायचा...

केलेला चहा नाष्टा कसा तरी घेणार एवढ्या सकाळी उठून केलेल्या नाश्त्याला छान झाला आहे असे एकदाही न म्हणता घाईने ऑफिसला निघणार, दोन प्रेमाचे शब्द सुद्धा आशाच्या वाटेला यायचे नाहीत..... जबाबदारी आहे ही तिची तिने करायला पाहिजे, काय विशेष त्यात,

त्यानंतर सौरभ आणि सारिका नऊ नंतर ऑफिसला जायचे, दोघंही अगदी दहा मिनिटात आवरून बाहेर यायचे वडिलां सारखाच चहा नाष्टा घेतला की निघणार, बर चहा नाष्टा कसा झाला आहे ते पण नाही सांगणार, उलट यात तेल जास्त मीठ जास्त आई हा प्रकार बदल हेच कशाला करतेस, अस ऐकवायचे फक्त, सगळ्या गोष्टीचा वीट आला होता आशाला.....

सगळे कामाला गेल्यावर घर जे काही खराब करून जायचे आवरता आवरता बारा वाजून जायचे, नंतर आशाच जेवण जरा वेळ पडणं मग संध्याकाळी ती फिरायला निघायची सात वाजता घरी आली की परत संध्याकाळचा स्वयंपाक....

सगळे आठ वाजेपर्यंत घरी यायचे, घरी आले की त्या तिघांच्या गप्पा चालायच्या, आशा आपली गरम पोळ्या वाढ, सगळ्यांच्या आवडी-निवडी जप, एकाला कमी तेलाची भाजी, एकाला तिखट भाजी हेच बघत राहायची....

ती जेवली आहे का? तीची आवड-निवड काय आहे? याकडे कोणाचंच लक्ष नसायचं, सगळे फक्त मी किती हुशार आहे आणि मला किती बाहेरच्या जगाचे किती नॉलेज आहे या गप्पांन मध्ये पुढे असायचे, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं होतं तिथे, आई म्हणजे अत्यंत कमी शिकलेली आणि व्यवहार ज्ञान शून्य असलेली एक व्यक्ती होती त्या घरातली,.....

रोजचं झालं होतं ते, आशा आता दुःखी राहू लागली, कोणाला काही कल्पना नव्हती या गोष्टीची, तिच्या सासुबाई तेवढ्या नियमित फोन करून समजूत काढायच्या तिची......

दुसऱ्यादिवशी मैत्रीण रीमा कडे किटी पार्टी होती, आशा रोज प्रमाणे आवरून बारा वाजता तिच्याकडे पोहोचली, सगळ्या मैत्रिणी आल्या मनमोकळ्या गप्पा झाल्या, यावेळी मात्र सगळ्यांनी पाच दिवसाच्या पिकनिकला जायचं असं ठरवलं, लगेच डेस्टिनेशन पण ठरवलं, जवळ एका तासावर एक हिल स्टेशन होतं तिथे जायचं ठरलं, आशा ने लगेच होकार दिला आणि पैसे पण भरून टाकले, उत्साहाने आशा संध्याकाळी घरी आली छान स्वयंपाक केला


0

🎭 Series Post

View all