Login

आईचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी कोणाची... भाग 3 अंतिम

आशा गावाला राहून आली, आता व्यवस्थित चालला आहे त्यांचं, मुलं प्रेमाने वागता आहेत, ती आणि रमेश सकाळचा चहा तरी एकत्र घेतात


आईचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी कोणाची... भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
..............

सौरभ आणि सारिकाला आवरता आवरता पुरेवाट झाली....

संध्याकाळी रमेश ने खिचडी केली त्यांनाही आजीने खूप रागावले,....." तु ज्या पद्धतीने काम करतो ना त्यावरून असं वाटत आहे की तु घरात कधीच कुठल्या कामासाठी मदत केलेली दिसत नाहीये, बरोबर आहे म्हणा तु कामावर जाणारा, घरची कामं करणे, घरच्यांबरोबर वेळ घालवण हे तुला कमीपणाचं वाटतं",...

"काय झाल आई, अस का बोलतेस",.... रमेश

"आशाला का गरज वाटली मैत्रिणींबरोबर बाहेर जायची कारण तुम्ही घरचे लोकं तिला वेळ देत नाही वर्षानुवर्षे ती घरातच असते तुमच्या लोकांचा स्वयंपाक करत, त्याबदल्यात तुम्ही लोकं काय देतात तिला? तू जेव आमच्यासोबत अस सुद्धा म्हणत नाही, ती आजारी आहे हे माहिती आहे का तुला"?,...... आजी

रमेश बघत राहिला....." काय झाल आई आशा ला, ती काही बोलली नाही ",...

" तिला डिप्रेशन चे औषध सुरू आहेत",...... आजी

" आता बघितलं स्वयंपाक करणं किती अवघड आहे, रोज एवढे छान छान पदार्थ करून ती तुम्हा सगळ्यांना देते, छान झाला आहे स्वयंपाक अस सुद्धा तुम्ही तिला म्हणत नाही, ती माझी सून आहे पण एका बाईचं त्रास काय असतो ते मला बरोबर माहिती आहे, यापुढे तुम्ही लोक पण तिच्याशी नीट वागाल अशी आशा करते",..... आजी

सौरभ सारिका, रमेश एकमेकांन कडे बघत होते......

" आशा ट्रीप हून आली की मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईल थोडे दिवस गावी, तिला छान राहू द्या माझ्या सोबत, राहा तुम्ही तिघे एकटे इथे",....... आजी

" आजी मम्मीला घेऊन जाऊ नकोस हे असं मम्मी शिवाय जगणं कठीण आहे आम्ही तिला गृहितच धरलं होतं असं काही नाही की आमचं प्रेम आहे नाहीये तिच्यावर पण एवढेच की तिच्याकडे लक्ष देत नव्हतो",..... मूल

" माझ पण चुकलंच आहे जरा, मी आता वेळ देत जाईन आशाला, तिला मदत करत जाईल ",...... रमेश

आशा ट्रीप हून आली आल्या आल्या सारिका आणि सौरभ गळ्यात पडले,....." मम्मी तू नव्हती तर अजिबात करमत नाही आम्हाला प्लीज यापुढे आम्हाला सोडून जात नको जाऊस",

आशाने सगळ्यांसाठी गिफ्ट आणले होते तिकडे काय काय एन्जॉय केल ती भरभरून बोलत होती

" मम्मी तुझी भाषा किती समृध्द आहे , तू लिखाण का करत नाहीस, मी मदत करेन तुला, तू सुरू कर लिखाण",....... सारिका

रमेश ही आशा घरी आल्यामुळे खुश दिसत होते, संध्याकाळी आशाने स्वयंपाक करायला घेतला, सौरभ आणि सारिका मदतीला आले सगळ्यांनी हास्यविनोद करत जेवण केलं

"मी उद्या निघते गावाकडे जायला",...... आजी

" थांबा ना थोडे दिवस आई तू",.... रमेश

आशा येणार आहेस माझ्यासोबत घेवून जाते 8-10 दिवस

रमेश सौरभ सारिका एकमेकांकडे बघायला लागले,

"आशा येईल माझ्यासोबत नंतर रमेश तु तिला घ्यायला ये",..... आजी

"चालेल जाऊन ये आशा ",.... रमेश

आशा गावाला राहून आली, आता व्यवस्थित चालला आहे त्यांचं, मुलं प्रेमाने वागता आहेत, ती आणि रमेश सकाळचा चहा तरी एकत्र घेतात आशाच्या तब्येतीत बराच फरक पडला आहे, ती आता स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते, थोड लिखाण सुरू केल आहे तिने,.....

मानसिक आधार गरजेचा आहे प्रत्येक व्यक्ति ला, जास्त अपेक्षा नाही पण जेवढा वेळ मिळेल तेवढ् तरी एकमेकांशी चांगल बोलायला हव वागायला हव, एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा आधार बनायला हवा एकमेकांचा , समजून घ्यायला हव, शारीरिक आजारा पेक्षा मानसिक आजार घातक असतो, घरातील स्त्रियांना समजून घ्या, त्यांना ही प्रेमाची गरज असते, दिवसातून थोडा वेळ त्यांना द्या.....