लघूकथा
विषय - आईचं काळीज
सुचित्रा - नोकरी वरून घरी येताना माझ्या सचिन बाळाला भरीत आवडत म्हणून वांगी, कोथिंबीर घेऊन आली.
सुधाकर - (सुचित्रा चे यजमान)आली .... मी माझ्या कामांनी बाहेर चाललो आहे . रात्री उशिर होईल.
सुचित्रा - थोड फ्रेश होवून वांगी भाजायला ठेवून पोळ्या करायला लागते.
सचिन - नोकरी वरून येतो. आई भूक लागली
आई - हात ,पाय,तोंड धुवून घ्यावेत तोपर्यंत होते आहे.
सचिन - अएका आयटी कंपनीत नोकरीला लागला. दमून गेलो खूपच भूक लागली.
सुचित्रा - कपडे बदलून घे झालं आहे. आईची लगबग, सचिनला ताजे, गरम, आवडीच वांग्याचे भरीत चालू होते.
सचिन - न जाणो आई तू काय घालते वासाने या सुगंधाने अजूनच भूक लागली. फ्रेश होवून कपडे बदलून आला. तसा. आई जवळ आला.
सुचित्रा - भरीत तयार.. गरमच पोळी. करायला घेतली आणि मिनीटभरात हातात गरम, वाढलेले आयते ताट, आवडीच वांग्याचे भरीत आईने दिले.
सचिन आहाहा .. तोंडात घास घेत... वा वा.... मस्त मस्तच झाले... आई..
सुचित्रा - मनात भरून पावली.आपल्या मुलांना खाऊ घालणं आणि त्यांना आवडण त्यांनी आनंदाने,पोटभर खाणे याशिवाय आईला काय हवं....म्हणाली
सचिन - थोड्याच वेळात बापरे बाप आई खूपच पोट भरले..
सचिन - अचानक फोन वाजला आई फोन दे ना
आईने फोन दिला
सचिन - येस.. हो सर.. बोलतो आहे. काय .. हो आहे. हो सर.. ओके सर.. हो सर.. फोन वर बोलत हो सर ओके... थॅंंक्यू सर ओके...
फोन ठेवताच ..
सचिन - आई ..... येस.... मला अमेरिकेत त्या ब्रांच मध्ये जाँईन करायला सांगितले 5 दिवसात.
सचिन - माझ्या मेहनतीचे फळ आहे हे आई.. सचिनच्या डोळ्यात आनंद आश्रु तरळले.....
सुचित्रा - आईच्या काळजात धसस् झाले.. आपला एकुलता एक मुलगा आता लांब जाणार.. त्याचे कसे होणार एकटा परक्या देशात, जेवणाचे काय, आपल्या डोळ्यासमोर नसेल याची सवय नाही. आपले कसे होईल. एक ना अनेक प्रश्न.
सचिन - त्याच्या डोक्यात पद, प्रतिष्ठा, पगार, करिअर, पैसा, काम, लक्ष्य एवढे दिसायला लागले. या यादीत आईं आणि आईचा विचार नव्हता.
सुचित्रा - आईच काळीजच सचिन होता. आईसाठी आपले बाळ म्हणजे तिचे जग असते. सचिन आता लांब जाणार म्हणल्या वर सगळं डोळ्यासमोर येत होते.. आईने डोळ्यातील पाणी पुसल आणि सचिनच्या आवडी चे बेसनाचे लाडू करायला घेतले त्याच्या सोबत द्यायला..
सुचित्राच्या मनात मुलगा पुढे जावा त्याची प्रगती व्हावी अशी इच्छा असते. पण मुलगा जवळ नाही या दुःखाचे काय तिला कळत नव्हत. मोह, माया पाशात आईचे काळीज अडकले
सचिन - आईं 4-5 दिवसात मी जाणार.. तुझ्या सचूची उंच भरारी बघ आता.. तुझा आशिर्वाद असा राहू दे.. सचिन आनंदी होता. आईच्या दुःख त्याला कळत नव्हत.
सुचित्रा - आपले दुःख बाजूला ठेवत.. बेसनाचे लाडू करत होती सचिनसाठी..
शेजारच्या काकू - सचिनची आई ..... साखर द्या वाटीभर .. अगबाई काय वास सुटला आहे बेसनाच्या लाडवाचा.काय विशेष
सुचित्रा - सरळपणे. सचिन अमेरीकेत जाणार सोबत देते थोडे.. हे घ्या साखर....
शेजारच्या काकू - वा छान.. सचिन..पण अरेरे काकू तुमचे कसे होईल एकुलता एक मुलगा लांब जाणार.. पोर नुसते आई बाबाची शिडी सारखा उपयोग करतात. गरज सरो वैद्य मरो.एकदा का अमेरीकेत गेले की परत येत नाही. आता कोण करेल तुमचं.याला अमेरीकेत पैसा, पद, प्रतिष्ठा दिसणार.तुमची आठवण येत नाही आता फोन करायला वेळ नसेल त्याला.
सुचित्रा - असो त्याची प्रगती, करिअर, पैसा, काम, लक्ष्य होईल ना..यातच समाधान आहे.हेच आईच काळीज असते.
- ©® सौ. भाग्यश्री चाटी सांबरे