आईची शिकवण भाग - १
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
संघ - वनिता शिंदे
संघ - वनिता शिंदे
"जुई, अग किती उशीर? चल उठ लवकर सात वाजून गेलेत. तुला आठ वाजता निघायचं होतं ना!"
निलिमा किचनमधून हातात लसूण सोलत सोलतच लेकीच्या बेडरूममध्ये गेली आणि तिला उठवत बोलली.
"हो ग माझी आई, उठते आता."
आईचा आवाज ऐकून जुई आळस देतच उठली.
"लवकर उठायचं आणि स्वतः च आवरून घ्यायचं. इतकी मोठी घोडी झाली तरी वेळ काळ कळत नाही. मलाच जाऊन उठवावं लागतं, ह्यांची कामं असली तरीही."
निलिमा तिच्याकडे बघत स्वतः शीच बडबड करत पुन्हा किचनमधे गेली.
"आई, अग माझा काळा कुर्ता कुठे गेला? इथेच तर ठेवला होता ना!"
जुई कपाटात तोंड घालून पाहू लागली.
जुई कपाटात तोंड घालून पाहू लागली.
"अग तिथेच आहे. कालच मी इस्त्रीचे कपडे नीट लावून ठेवले आहे बघ तिथेच."
निलिमा किचनमधूनच बोलू लागली.
निलिमा किचनमधूनच बोलू लागली.
"नाही सापडते ग! तूच शोधून दे मला लवकर, नाहीतर उशीर होईल मला निघायला."
जुई आईला आवाज देऊन पुन्हा आवरायला निघून गेली.
जुई आईला आवाज देऊन पुन्हा आवरायला निघून गेली.
"ही पोरगी पण ना! कालच मी हीचे सगळे कपाट आवरून ठेवले आणि आता लगेच हिने अस्ताव्यस्त करून टाकलं सगळं. एक कुर्ता सापडत नाही हिला, सगळीकडे पसारा करून ठेवलाय नुसता. स्वतः च कपाट सुद्धा नीट ठेवता येत नाही."
निलिमा पुन्हा तिचे कपाट लावत बोलत होती आणि अचानक किचन मधुन दूध उतू जाण्याचा आवाज आला तशी ती धावत किचनकडे वळली.
"सकाळी सकाळी काय घरातच जॉगिंग करायचं ठरवलं की काय?"
निलेश तिच्याकडे पाहून हसत हसतच म्हणाला.
निलेश तिच्याकडे पाहून हसत हसतच म्हणाला.
"तुम्ही तर काही बोलूच नका! तुमच्यामुळेच झालंय हे सगळं."
जुईवरून आता निलिमा नवऱ्याकडे रागाने बघत होती.
"अरेच्चा! आता मी काय केलं बरं? मी आपला पेपर वाचत बसलोय गपगुमान."
निलेश मुद्दाम पेपरमधे डोकं घालून बोलू लागला.
निलेश मुद्दाम पेपरमधे डोकं घालून बोलू लागला.
"सगळं कळून पण न कळल्यासारखी सोंग चांगली घेता येतात तुम्हाला. हे सगळं तुमच्यामुळेच होतंय. समजलं का?"
निलिमा पुन्हा तणतणत बोलली.
"नीलू, अग इतकी काय चिडतेस? सकाळी सकाळी मूड कसा फ्रेश असायला पाहिजे म्हणजे संपूर्ण दिवस छान जातो."
निलेश तिला समजावण्याचा सुरात बोलला.
निलेश तिला समजावण्याचा सुरात बोलला.
"राहू द्या तुमचं प्रवचन तुमच्याकडेच, मला नका सांगत बसू. ती पोरगी आवरून आली की दोघेही नाश्ता करून घ्या. इथे टेबलवर मांडून ठेवले आहे सगळे."
निलिमा कामं करता करताच बोलत होती.
"तुला सांगितले ना नीलू, तिच्यावर जास्त चिडत जाऊ नको. अग लहान आहे ती अजून. पुढे जाऊन करेन हळूहळू, जबाबदारी अंगावर पडली की शिकतात आपोआप सगळ्या मुली."
निलेश आपल्या लाडक्या लेकीची बाजू घेत बोलू लागला.
"धन्य आहात तुम्ही आणि तुमची लाडकी लेक."
नीलू इतकेच बोलून निघून जाते आणि तिकडून जुई आवरून बाहेर पप्पांजवळ येऊन बसते.
नीलू इतकेच बोलून निघून जाते आणि तिकडून जुई आवरून बाहेर पप्पांजवळ येऊन बसते.
"पप्पा, आज वातावरण जरा जास्तच तापलेय का?"
जुई हळूच तिच्या पप्पाजवळ येऊन बोलू लागते.
जुई हळूच तिच्या पप्पाजवळ येऊन बोलू लागते.
"काही नाही, नेहमीच आपलं. तू नको टेन्शन घेऊ, तू खाऊन घे पटकन म्हणजे मग मी तुला सोडून येतो कॉलेजमध्ये, नाहीतर खरचं उशीर होईल तुला."
निलेश तिच्याकडे बघून हसून टाळी देत बोलला आणि दोघांनी नाश्ता केला. पप्पा तर पप्पाच असतात, कायम लेकीची बाजू सांभाळून घेणारे.
निलेश तिच्याकडे बघून हसून टाळी देत बोलला आणि दोघांनी नाश्ता केला. पप्पा तर पप्पाच असतात, कायम लेकीची बाजू सांभाळून घेणारे.
क्रमशः
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा