आईची शिकवण भाग - ३
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
संघ - वनिता शिंदे
संघ - वनिता शिंदे
जुई कॉलेजसाठी बाहेर गावी जाणार. आपल्यापासून तिकडे लांब राहून शिकणार; म्हणून निलिमा थोडी काळजीत होती. आनंद तर होताच पण घरापासून लांब राहायला तशी ती पहिल्यांदाच जाणार होती. याआधी तर कधी तिने तिच्या माहेरी देखील सोडले नव्हते, पण आता तिला लांब राहावेच लागणार होते. शेवटी आईच ती, एकुलती एक मुलगी आणि शिकायला लांब जाणार म्हणून थोडी बेचैन झाली होती.
'अजूनही लहान आहे जुई; त्यामुळे काळजी वाटतं होती. कशी राहणार आपली लेक तिकडे एकटी? वेळेवर जेवण खाणं, तिच्या हातात सगळ्या वस्तू द्याव्या लागतं होत्या. आता तिकडे एकटी राहिल्यावर कोण करणार तिच्यासाठी हे सगळं?'
असे म्हणून निलिमा काळजी करत बसली होती.
'अजूनही लहान आहे जुई; त्यामुळे काळजी वाटतं होती. कशी राहणार आपली लेक तिकडे एकटी? वेळेवर जेवण खाणं, तिच्या हातात सगळ्या वस्तू द्याव्या लागतं होत्या. आता तिकडे एकटी राहिल्यावर कोण करणार तिच्यासाठी हे सगळं?'
असे म्हणून निलिमा काळजी करत बसली होती.
"लेकीचा नंबर चांगल्या कॉलेजात लागलाय; त्यामुळे आपल्याला पण काही ना काही तडजोड ही करावीच लागणार ना! आणि तिने आधीच सांगून ठेवलं होत ना आपल्याला. आपल्या समोरच तर सगळीकडे फॉर्म भरले; त्यामुळे तेव्हाच मी मनाची तयारी करून ठेवली होती, की पुढे जर तिला घर सोडून बाहेर जाण्याचा योग आला तर आपण त्यात आडवा पाय घालायचा नाही. नीलू आता नाही तर कधी साथ द्यायची आपण तिला! तूच सांग आता."
निलिमाला काळजीत बघताना निलेश तिच्याजवळ आला आणि बोलू लागला. त्यालाही समजत होते सगळे काही.
"अहो, मी काय म्हणते आपण जाऊया का तिच्यासोबत काही दिवस राहायला तिकडे."
जुईच्या काळजीने निलिमा बोलत होती.
"नीलू.. आपण जाणारच आहोत ना तिकडे तिला सोडायला. तेव्हा तिला सगळं सेट करून मगच इकडे येऊ."
निलेश आता मात्र तिच्या बाजूने बोलत होता; त्यामुळे निलिमाला खूप बरं वाटतं होतं.
निलेश आता मात्र तिच्या बाजूने बोलत होता; त्यामुळे निलिमाला खूप बरं वाटतं होतं.
सुट्टीचे दिवस संपले आणि जुईचे एडमिशन सुद्धा झाले. तिच्या सोबत तिच्या दोघी तिघी मैत्रिणी सुद्धा होत्या; त्यामुळे काळजीचे काही कारण नव्हते. जसे सुट्ट्यांचे दिवस संपले तशी जुई तिची बॅग भरायला लागते, कारण तिला जास्त सामान न्यावे लागणार होते. घरापासून पाच सहा तासांच्या अंतरावर कॉलेज होते; त्यामुळे घराकडे सारखे येणे होणार नाही हे चांगलेच माहिती होते. कपड्यांची एकच मोठी बॅग आणि वह्या पुस्तकांची एक बॅग अशा दोन बॅग भरून तयार होत्या. निलिमा पण जुईसाठी जमेल तितके खायचे पदार्थ बनवून ठेवत होती आणि त्याची एक मोठी बॅग तयार झाली.
"आई अग हे काय? ह्या इतक्या मोठ्या बॅगमधे काय काय भरलं आहे तू?"
जुई त्या बॅगकडे बघत बोलली.
"तुझ्यासाठीच चाललाय हा सगळा खटाटोप. तुला आवडतात म्हणून खारी आणि गोड शंकरपाळी, बाकरवडी, लाडू, चिवडा.. सगळं तुझ्या आवडीच बनवलं आहे. भूक लागली की खाता येईल लगेच."
निलिमा तिची बॅग भरतच बोलली.
निलिमा तिची बॅग भरतच बोलली.
"अरे पण इतकं सगळं केलं तू! ती काय दिवाळी साजरी करायला नाही चालली तिकडे, अभ्यासासाठी चाललीय.. आणि तिकडे मिळते खायला प्यायला. ती काही वाळवंटात नाही निघाली. काय तू पण नीलू!"
असे म्हणून निलेश पण तिला चिडवू लागला.
"तुम्ही दोघे गप्प बसा बरं, आता सगळं भरून ठेवलं आहे मी; त्यामुळे न्यावेच लागेल."
निलिमा दोघांना दम देत बोलली तसे दोघेही गप्प बसून तिच्याकडे बघू लागले.
निघायच्या आदल्या रात्री निलिमाला झोपच येत नव्हती. सारखी ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत असल्यामुळे निलेशला जाग आली. त्यालाही समजत होते, की लेकीच्या काळजीने होतं असं.
"नीलू, नको इतकी काळजी करू. आपली मुलगी हुशार आहे. सगळं सांभाळून घेईल ती."
निलेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलू लागला.
निलेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलू लागला.
"सांभाळून तर घेईलच ती, पण तरीही मला काळजी वाटतेय. आधीसारखे नाही राहिले आता काहीच, ही पोरगी म्हणजे जीवाला घोर लावते नुसता. कसं करणार ती सगळं एकटी राहून!"
नीलूला खरचं रडू येत होते जुईच्या जाण्याने, तिला खूप अस्वस्थ वाटतं होते.
नीलूला खरचं रडू येत होते जुईच्या जाण्याने, तिला खूप अस्वस्थ वाटतं होते.
क्रमशः
सौ तृप्ती कोष्टी©®
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा