आईची शिकवण भाग - ५ अंतिम
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
संघ - वनिता शिंदे
संघ - वनिता शिंदे
जुईला हॉस्टेलवर सोडून आल्यापासून निलिमाला घरात करमत नव्हते, कारण आता घरात ते दोघेच उरले होते. तिकडे जुई पण कॉलेज सुरू झाल्यापासून रमली होती. तिच्या बाकीच्या मैत्रिणी पण भेटल्या होत्या आणि रूममधल्या सुद्धा नवीन मुलींशी चांगली गट्टी जमली होती. जुई रोज न चुकता घरी फोन करून दिवसभरात काय काय घडले तो दिनक्रम सांगत बसायची; त्यामुळे रात्र झाली की निलेश आणि निलिमा फोनकडे डोळे लावून बसायचे, कारण दिवसभर कॉलेजमधे निघून जात होता.
निलिमाने तयार करून दिलेला खाऊ अवघ्या पंधरा दिवसात सपाचट झाला होता; त्यामुळे खाली जाऊन जेवण करावे लागत होते. जेवण आवडो की न आवडो पोटातली भूक घालवण्यासाठी चार घास पोटात ढकलावे लागतं होते.
हॉस्टेलवरील मेसमधले खाणे कोणालाच आवडत नव्हते; त्यामुळे कधी कधी रूममधे बाकीच्या मुली मिळून काही ना काही बनवत बसायच्या. एकीने घरून थोडे फार सामान आणले होते आणि राहिलेले त्या खालून घेऊन यायच्या. इंडक्षन वर जमेल तसा स्वयंपाक त्या तिघी मिळून करायच्या आणि जुई मात्र त्यांना बघत बसायची, कारण तिला स्वयंपाकातले फारसे काही येत नव्हते. ती मदत म्हणून त्यांना भांडी घासून द्यायची, पण ते कामही तिला इतके जमत नव्हते. त्या तिघी मात्र हळूहळू चांगल्याच जेवण बनवू लागल्या होत्या.
"यार! तुम्ही किती छान जेवण बनवतात आणि ते ही अगदी झटक्यात तयार होईल असे पदार्थ. चवही अगदी परफेक्ट नाही पण तरीही माझ्यासाठी तरी तेच बेस्ट आहे. मलाही यायला पाहिजे होते असे काहीतरी करायला."
जुई त्या तिघींकडे बघून बोलू लागली.
जुई त्या तिघींकडे बघून बोलू लागली.
"हो नाहीतर काय, तू फक्त खायला येतेस. काम मात्र आम्हीच करत बसतो."
त्यातल्या एकीने जुईला हसत हसत का होईना बोलून दाखवले. जुईला मात्र खरचं वाईट वाटतं होते.
त्यातल्या एकीने जुईला हसत हसत का होईना बोलून दाखवले. जुईला मात्र खरचं वाईट वाटतं होते.
तिची आई सांगत होती ते खरचं होते. आता मात्र जुईला आईची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. लागेल ती वस्तू हातात आणून द्यायची, खायला पण जे सांगणार ते बनवून द्यायची. कसलीच कामं नव्हती घरात आणि इकडे मात्र स्वतः चे कपडे स्वतः धुवायचे. रूम स्वच्छ ठेवायची. बेड व्यवस्थित आवरून ठेवायचा ही सगळी कामं बाकीच्या मुली अगदी सराईतपणे करत होत्या, पण जुईला मात्र ह्या सगळ्या कामांचा कंटाळा यायचा, कारण तिने याआधी ही असली कामे कधी केली नव्हती.
'आई सांगत होती ते काही चुकीचे नव्हते. आता हे सगळं करायला आई थोडीच येणार होती इकडे. निदान ही छोटी मोठी कामे तरी जमायला पाहिजे होती आपल्याला, किमान बाकीच्या पोरींसमोर आपले हसू तरी झाले नसते. आई ग! खूप आठवण येतेय तुझी. आता असे वाटतेय, की तेव्हा मी का ऐकले नाही तुझे.'
जुई बेडवर पडल्या पडल्या मनातल्या मनात बोलत होती.
जुई बेडवर पडल्या पडल्या मनातल्या मनात बोलत होती.
दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तशा सगळ्या जणी काही दिवस आपापल्या घरी गेल्या. घरी आल्यावर जुई आईकडून शिकून घ्यायचा हट्ट करते आणि हे ऐकून निलिमाला तर खूपच आनंद होतो.
"बघ मी म्हणत होते ना की सगळ यायला पाहिजे. किमान स्वतः च पोट भरता येईल इतकं तरी यायलाच हव, मग ते खिचडी किंवा तुमची ती मॅगी का असेना."
आई सांगत होती ते सगळ जुईला आता पटतं होते.
"हो आई, तू म्हणत होतीस ते अगदी बरोबर होते. मी किमान तुला मदत म्हणून तरी किचनमधले छोटे मोठे काम करायला हवे होते. आता बघ ना त्या मुली किती मस्त बनवतात आणि मी फक्त त्यांना बघत बसते."
जुई इतकुस तोंड करून बोलत होती.
"बघून बघून पण शिकून होतं बरच काही, आता तू फक्त माझ्या बाजूला किचन ओट्याजवळ जरी उभी राहिलीस तरी तुला अर्धा स्वयंपाक जमेल लगेच, फक्त अंदाज यायला हवा बरोबर मग सगळं सोप होऊन जाईल."
निलिमा जुईला अगदी साधे सोपे आणि झटपट करून तयार होतील असे पदार्थ बनवायला शिकवत होती. विशेष म्हणजे आता निलेश सुद्धा तिला काही बोलत नव्हता, त्यालाही कळून चुकले होते. आपली मुलगी कशातच मागे नको राहायला म्हणून तो सुद्धा मदत करत होता.
हळूहळू जुई शिकत होती. खिचडी करायला काय काय तयारी करावी लागते? किंवा मग मसाला मॅगी, पोहे, उपिट, पास्ता, नुडल्स, तोंडी लावायला चटण्या.. हे असे सोपे आणि पटकन तयार होतील असे पोटभरीचे पदार्थ शिकून घेतले म्हणजे अभ्यासालाही पुरेसा वेळ मिळेल.
खरचं, आपण मुलींना हेच सांगत असतो की, चांगले शिकून मोठे व्हा. स्वतः च्या पायावर उभे राहायला तर शिकवतो, पण त्यासोबत घरातल्या चार गोष्टी सुद्धा यायला हव्या हे विसरून जातो. त्यांना किमान स्वतः पुरते तरी करून खाता येईल इतपत येणे गरजेचे असते. कधी घरापासून लांब राहावे लागले तर खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही आणि स्वच्छ नीटनेटके राहण्याची चांगली सवय अंगवळणी पडेल.
समाप्त
सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड
रायगड
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा