आईची समजूत घालतांना भाग 3
रवीला ही आता तिच्या फोन करण्या मागची गहणता कळली होती ,तिला बोलायला कोणी नव्हते म्हणून तिने फोन केला होता असा त्याचा समज झाला होता..
त्याला त्याच्या बोलण्याचे वाईट वाटले होते पण त्याचा उद्देश आईला समजला नव्हता, हळवे मन झाली आई आता वयामुळे चीड चीड करत होती आजकाल ,मन शांत रहात नव्हते, खूप काही बोलायचे होते पण छोट्या कारणावरून रडत होती, बाबा तिला वेळ देत नसत, आणि जरा ही घरी न थांबता बाहेर निघून जात, गप्पा मारत, छोट्या मुलांसोबत जाऊन त्यांचे मन रमवत... कधी पुस्तक वाचन करीत..पण रवीच्या आईला घर काम झाले की नवऱ्याचा चहा ,नाश्ता, त्यांची बाकी कामे, भाजी आणणे ,त्या निवडणे, ह्या पलीकडे मनाचा असा बाकी विरंगुळा नव्हता, कोणी तिच्या हळव्या झालेल्या मनाचा विचार ही करत नाही अशी भावना होत..
आईचा तिकडून आवाज आला नाही म्हणून जरा चिंतीत झाला, आई रडते की काय असे वाटले त्याला
आई ,अग आई काय तू इतकी मनावर घेतेस बाबांचे त्यांना बोलायला कोणी तरी लागते माहीत तर आहेच ना तुला ,मग त्यांनी घरी बसले म्हणजे बरं ही वाटणार नाही तुला ही आणि त्यांना ही, राहिलेच घरी तर मग इथे खटपट कर, तिकडे साफ सफाई कर, तुझ्या कामात लुडबुड कर, हे नाही केले, ही वस्तु इकडे का ठेवली, ती तिकडे का नाही ठेवलीस असेच करत असतात हे तूच तर सांगत असतेस मला ,आणि मग कसे तुमचे वाद होतात ही तक्रार तूच करतेस बाबांची, मग तू म्हणतेस की ते जरा ही वेळ कुठे जात नाही.. रवी आईला धीर देत समजावत होता
रवी आणि त्याची बायको हे आपल्या नौकरीसाठी नागपूरला होता ,त्यांची दोन छोटी मुलं आणि त्यांचे आई बाबा पुण्यात ..
रवीचे आई बाबा दोघे ही रिटायर झाले होते
तर सुधाचे आई बाबा पुण्यात तालुकाच्या ठिकाणी रहात होते .
दोघांचे आई वडील हे एकटेच रहात होते, सगळे आता आपल्या उतारवयात आपल्या नातेवाईकांच्या सोबत जवळपासच्या भागात रहात होते ..पण तरी त्यांना एकटेपणा जणवत असायचा...मुलांनी इतक्या लांब नौकरी धरली आहे ,आणि त्यांचे वर्षातून एकदा ,दोनदा येणे होते ,त्यांना आमची काळजी नाही अशी दोघांच्या आईंची तक्रार असायची...वय झाले होते त्यात नातू इनमिन दोन..त्यात त्यांच्या आईवडिलांना दोघे ही एकुलते एक...तिला भाऊ ना बहीण, त्याला ही भाऊ ना कोणी बहीण...
इकडे रवीची आई ही सतत त्याला फोन करून सांगत ,अरे कधी तरी एकदा घरी येऊन जा ,माझ्या मेलीची इच्छा पूर्ण करून जा, मुलांना आजी आजोबा आहेत हे कळू दे, आणि आम्हाला ही त्यांच्या प्रेमात तिष्ठत ठेवू नकोस, तुम्ही येऊन गेलात तर घर कसे भरल्यासारखे वाटते, एकटेपणा दूर होतो ,तुमच्या सोबत काही दिवस आनंदात जातात, मूठ भर मास चढते बघ म्हणत आई आपल्या मनातली खंत बोलून दाखवत..
पण त्यांना दोघांना ही सुट्टीची अडचण असल्याने ते ही येऊ शकत नव्हते, मग हा त्याचा आईवडिलांना समजावत तर ती तिच्या आईवडिलांना समजून सांगत ,आणि मग कुठे दिवाळीला सुट्टी काढून पूर्ण 10 दिवस दोघे पुण्यात येत, त्यातले 5 दिवस ती तिच्या आईवडिलांकडे जात आणि हा आपल्या आईवडिलांकडे जात, त्यात नातू आईच्या आई वडिलांकडे 5 दिवस आणि बाकी 5।दिवस वडिलांच्या आई वडिलांकडे, त्यात ते दिवस कसे भुर उडून जात ,पण तरी ही आजी आजोबांचे मन भरत नसत...डोळ्यात अश्रू च्या धारा, मन अजूनच तळमळत मुलांच्या भेटीसाठी, मग वर्षभर ह्या दिवाळीची वाट बघत बसत ते म्हतारी जोडपी... मुलं सहज म्हणून जात ,अग येऊ आम्ही ,आहोतच ना आपण सतत फोन वर, दिसतो ना आम्ही तुम्हाला विडिओ मध्ये ,मुलं ही दिसतातच ना, मग हा दुरावा कसला म्हणतेस,।मला तर तुम्ही जणू बाजूलाच असल्या सारखे वाटतात...
पण त्यांना दोघांना ही सुट्टीची अडचण असल्याने ते ही येऊ शकत नव्हते, मग हा त्याचा आईवडिलांना समजावत तर ती तिच्या आईवडिलांना समजून सांगत ,आणि मग कुठे दिवाळीला सुट्टी काढून पूर्ण 10 दिवस दोघे पुण्यात येत, त्यातले 5 दिवस ती तिच्या आईवडिलांकडे जात आणि हा आपल्या आईवडिलांकडे जात, त्यात नातू आईच्या आई वडिलांकडे 5 दिवस आणि बाकी 5।दिवस वडिलांच्या आई वडिलांकडे, त्यात ते दिवस कसे भुर उडून जात ,पण तरी ही आजी आजोबांचे मन भरत नसत...डोळ्यात अश्रू च्या धारा, मन अजूनच तळमळत मुलांच्या भेटीसाठी, मग वर्षभर ह्या दिवाळीची वाट बघत बसत ते म्हतारी जोडपी... मुलं सहज म्हणून जात ,अग येऊ आम्ही ,आहोतच ना आपण सतत फोन वर, दिसतो ना आम्ही तुम्हाला विडिओ मध्ये ,मुलं ही दिसतातच ना, मग हा दुरावा कसला म्हणतेस,।मला तर तुम्ही जणू बाजूलाच असल्या सारखे वाटतात...
मुलं किती ही समजूत घालू देत पण शेवटी आई वडिलांना तर प्रत्येक क्षणाला आपली मुलं आपल्या जवळच असावी ह्या वयात, काही झाले तर कोणाला बोलवायचे हक्काने, कोण घेऊन जाईल आम्हाला दवाखान्यात, हिला तुझ्या आईला एक तर काही सुचत नाही मला काही झाले तर ,असे सुधाचे वडील तिला कळवळून सांगत होते...शेजारची मुलगी माहेरपणाला आली की तुझी आई घळाघळा डोळे गळते गे, त्यांचे नातू आजी आजोबा म्हणत गळ्यात पडतात तेव्हा आमची मिठी ही असुसते नातवांना मिठीत घ्यायला... आणि तुम्ही म्हणतात पहातो ना आपण एकमेकांना ,किती सहज भावनांशी खेळतात तुम्ही...अग भेटी होने आणि मुलांना स्पर्श करणे यात जमीन असमानाचे अंतर आहे ग ,हे तुला आमच्या सारखे हतबल झाल्यावर कळेल आणि तेव्हा तुम्ही आसुसलेले असणार तुमच्या मुलांच्या गळा भेटीला आणि ते ही असेच दुरून दिसत जातील ..
हा किस्सा सुधाच्या बाबतीत घडला , तिच्या ही आई वडिलांच्या सहनशीलतेचा बांध फुटला होता, त्यांना ही आपली मुलगी हवी होती ,काही दिवस तिच्या सोबत घालवायचे होते, नात ,नातू यांच्या सोबत लाडिक लाडिक बोल बोलायचे होते, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जायचे होते, खूप खूप गप्पा मारायच्या होत्या, पण ते काही जमता जमत नव्हते..योग आला तरी फार वेळ हातात नसायचा...
सुधा ही आपल्या आईवडिलांना समजावून त्यांची इच्छा मन नसतांना मारायची...
इकडे रवीचे ही तसेच झाले होते, आईला रडतांना पाहून वाईट वाटले पण इलाज नव्हता मग नेहमीसारखे खोटे आश्वासन देऊन तिला मन गुंतवायला सांगितले ...
पर्वाची अशीच गोष्ट घडली,
क्रमशः??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा