आईपण (मातृत्व) भाग-२-अंतिम

कितीही मोठे दुःख असो.एका आईला आपल्या लेकरासाठी खंबीर बनावेच लागते..कारण मातृत्व ही आपली पहिली जबाबदारी असते.
कुलदेवी दर्शन,मानलेला नवस ,प्रसाद, जेवणाचा कार्यक्रम सारं काही व्यवस्थित पार पडले होते. अमिता आणि राकेश ला आता जरा बरे वाटले. परत येतांनाही इतर सर्व मंडळींना दोन्ही गाडींमध्ये व्यवस्थित बसवुन राकेश ने पुढे पाठवले आणि मागुन बाईक वर राकेश आणि त्याचे भावोजी निघाले.

थोड्याच अंतरावर एक वळण लागले राकेश ने त्या वळणावर आपली गाडी फिरवली तसा अचानक समोरून ट्रक आला आणि बाईकला जोरदार धडक दिली. राकेश आणि त्याचे भावोजी दोघेही जागेवरच मरण पावले होते.

राकेशच्या आईने नेहा आणि अमिता दोघींनाही या गोष्टी चा दोष देत घराबाहेर काढले. " ही मुलगी नेहा ही बापासाठी काळ बनुन आली, हिच्या मुळेच माझा मुलगा आणि जावाई दोघांना मी गमावून बसले, तुम्हां दोघी मायलेकींना माझ्या घरात जागा नाही, चालत्या व्हा माझ्या घरातुन."

अमिता चे आई वडील दोघींना ही आपल्या सोबत घेऊन गेले. तेव्हा पासून एवढ्याशा दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन अमिता एकट्याने आयुष्य जगत होती, आई-वडील होते मदतीला पण नेहाला मात्र पदोपदी आपल्या वडिलांची कमतरता जाणवायची. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यावरून अचानक बापाचे छत्र हरवुन गेले होते.

अमिता राकेश च्या जागेवर नौकरी ला लागली होती. सासरच्या लोकांच्याजवळ जाण्याचा त्यांच्या बरोबर राहण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला अमिताने पण सासुने दोघींनाही कधीच जवळ केले नाही.

आई-वडील आणि नातेवाईकांने अमिता ला दुसरे लग्न करण्यासाठी बरेच वर्षे आग्रह केला पण, अमिता ने आपली मुलगीच आपल्या साठी सर्वकाही आहे हेच मानुन आपले पुर्ण आयुष्य काढले होते.

नेहाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम देण्याचा प्रयत्न करत होती. आयुष्य भर मायलेकी एकमेकांना जपत, काळजी घेत जगत होत्या.

आज नेहा एकवीस वर्षांची झाली वकीलीच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. लहानपणापासून आईची धावपळ,खस्ता सर्व गोष्टींचा संघर्ष तिने पाहिला आहे, म्हणून आता ती आईला खूप जपते, वेळ पडली तर रागावतेही आणि आई तिला नेहमीच हसण्यात विचारते "मी तुझी आई आहे का तु माझी आई?"....

नियतीने अमिता राकेश ला हिरावून घेतले.. तेव्हा  अमिताला आपलं आयुष्य संपले असेच वाटले होते..पण आपल्या बाळासाठी, आपल्या लेकीसाठी तिने आपले सारे दुःख बाजुला ठेवले..

कारण मातृत्वा पुढे सारे काही शुन्य आहे...एका आईची सर्वात मोठी जबाबदारी ही आपली मुलं असतात.. मातृत्व मिळावे,लाभावे,अनुभवावे ही प्रत्येक बाईच्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्ट..आणि आपल्या लेकरासाठी सर्व दुःख विसरून फक्त त्याच्यासाठी खंबीर बनणं हेच खरं मातृत्व...

  ©®✍️सौ.दिपमाला अहिरे.


🎭 Series Post

View all