आईपण (मातृत्व) भाग-१

बाईपणाच्या जन्माला आईपणाची झालर लावून आपलं बाळ आपले आयुष्य खऱ्या अर्थाने पुर्ण करत असते..
"बाईपणाच्या जन्माला आईपणाची झालर लावून आपलं बाळ आपले आयुष्य खऱ्या अर्थाने पुर्ण करत असते..
हे मातृत्व लाभणं म्हणजे बाईच्या जन्माचे सार्थक होणे"

" आई तु हे काय करतेय? ,तुला सांगीतले होते ना मी पलंगावरून खाली उतरायचे नाही? चल झोप पाहु इकडे ..अजुन तुझ्या अंगात ताप आहे बघ! थोडं माझं दुर्लक्ष काय झालं ?लगेच ऊठुन कुठे चालली होती? तुला काही लागलं तर मला आवाज दे.बोलली होती ना मी तुला ? तरी ऐकायचं नसतंच का तुला माझं काही?"  नेहा आपल्या आईला रागावत होती.

"अगं नेहा बाळा बरं वाटतंय मला आता आणि तुझ्या परीक्षा आहेत ना उद्या पासून तुला अभ्यास ही करायचा आहे, आणि हे काय किती ओरडतेस माझ्या वर?? मी तुझी आई आहे का तु माझी आई?? इतकी काळजी करते
तर माझी?"

" हो आई मी आता इतकी मोठी तर झालीच आहे की, तुझी काळजी घेऊ शकेल ,तु सुध्दा जपलसं ना मला एकटीने एवढीशी ची एवढी मोठी केलीस ना काळजीने!" अमिता आपली मुलगी नेहाचे बोलणे ऐकून भुतकाळात जाते..अमिता,राकेश नेहा असे त्यांचे आनंदी कुटुंब होते, नेहा नुकतीच दोन महिन्यांची झाली होती. अमिता ने राकेशला आणि सासुबाईंना आठवण करून दिली.


" आई पहिलं बाळ जेव्हा जन्मताच दोन दिवसांनी वारले होते, म्हणून दुसऱ्यांदा दिवस राहिले तेव्हा मी कुलदेवी ला नवस बोलले होते.यावेळी कुठल्याही विघ्ना शिवाय सर्व सुखरूप होऊ दे. माझ्या होणाऱ्या बाळाला घेऊन मी नवस फेडायला येईल!"

"आता नेहा पुर्ण दोन महिन्यांची झाली आहे, आपल्याला कुलदेवी च्या दर्शनासाठी जायला पाहिजे."

सासुबाई आणि राकेश लगेच तयारी लागले, सासुबाई ने आपल्या दोन्ही मुली आणि जावायांनाही बोलावुन घेतले,नेहाचे आई-वडील भाऊ बहिण असे सर्व मिळून कुलदेवी चा नवस फेडायला जाणार होते.राकेश ने त्यासाठी दोन गाड्या बुक केल्या होत्या. त्यांच्या राहत्यागावापासून दोन तासाच्या अंतरावर कुलदेवी चे मंदिर होते.म्हणुन राकेश आणि त्याचे मोठे भावोजी दोघे बाईक ने जाणार होते.

राकेश च्या आईने जावयाला आपल्या सोबत गाडीत येण्याचा आग्रह केला पण,त्यांनी ऐकले नाही राकेश एकटा जाईल त्यापेक्षा आंम्ही दोघे सोबतच येतो म्हणाले...
पुढे नेमके काय घडले?? ते पाहुया कथेच्या पुढच्या भागात...(क्रमशः)
©®✍️सौ.दिपमाला अहिरे.


🎭 Series Post

View all