आईपणाची शिक्षा : भाग १

प्रत्येक आई चूक पोटात घालत नसते
विषय : चुकीला माफी नाही।


   नरेन आणि गौरीच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले होते नुकतेच. त्यांचा सुखी संसार भरल्या डोळ्याने पहावा म्हणून प्रभाताई गावावरून मुंबईला आल्या. त्या आपल्या सुनेला भेटण्यासाठी जेवढ्या उत्सुक होत्या ती त्यांची सगळी उत्सुकता गौरीला पाहून मावळली.

गौरीला पाहून प्रभाताईंना प्रश्न पडला की, 'आपण जिला सून म्हणून आणले ती हीचं गौरी का?'

चार महिन्यांपूर्वी असलेली ती गोरी गोरी पान, चेहर्‍यावरून उत्साहाचा झरा वाहंत असलेली आणि कायम बडबड करत असलेली गौरी आता मात्र खूपच शांत वाटायला लागली त्यांना. तिचा तो गोरापान चेहरा अगदी निस्तेज पडला होता आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती.

"आई अहो तुम्ही अचानक कसे येणे केले?", गौरीने पाणी देतं विचारले.

"काही नाही गं तुमची आठवण आली म्हणून आले पण आता वाटतयं बरं झालं अशी अचानक आले ते. कायं गं गौरी कायं तुझी ही अवस्था? सगळे ठीक आहे ना गं?", प्रभाताईंनी गौरीच्या चेहर्‍यावरून मायेने हात फिरवला.

"अहो आई सगळे ठीक आहे. ते मी दोन दिवस आजारी होते म्हणून तुम्हाला वाटतं असेल तसे. तुम्ही आत्ताच आला आहात गावावरून तर फ्रेश होऊन आराम करा मी तुमच्यासाठी खायला बनवते काहीतरी. ", असे म्हणतं गौरी किचनमध्ये गेली.

प्रभाताईंना मात्र गौरीने दिलेले उत्तर का कोणास ठाऊक पटले नाही. संध्याकाळी नरेन घरी आला तेव्हा आईला पाहून तो ही जरा आश्चर्यचकित झाला.

" आई तु अचानक? "

" अरे मी येऊ शकतं नाही का? "

" तसे नाही आई काही कळवले नाहीस म्हणून विचारले."

"अरे तुमची आठवण येतं होती म्हणून आले.", प्रभाताईंनी उत्तर दिले.

"गौरी तु तरी सांगायचे ना?", नरेनने गौरीकडे पाहून कटाक्ष दिला.

"अहोss अहो मी फोन करत होते पणs पणs आई नको म्हटल्या", गौरीने घाबरतचं उत्तर दिले.

" अगं मगं ठीक आहे ना एवढं घाबरण्यासारखं कायं आहे त्यात? मी काही खाणार थोडीच आहे तुला?", असे म्हणतं नरेन हसतं आत रूममध्ये गेला.

प्रभाताईंना मात्र नरेन आल्यावर गौरीचे असे घाबरणे, बोलताना अडखळणे खटकले. नयन थोडा रागीट आहे हे त्यांना ठाऊक होते पण गौरी आणि त्याच्यात सगळे काही ठीक नाही किंवा त्यांनी इथे येण्यापूर्वी त्यांच्या सुखी संसाराची जी चित्रे रंगवली होती तसे इथे काहीचं नाही हे त्यांच्या लक्षात आले.

क्रमशः


🎭 Series Post

View all