आईपणाची शिक्षा : भाग २

प्रत्येक आई चूक पोटात घालत नसते
विषय : चुकीला माफी नाही

    प्रभाताई जेवताना ही मुद्दाम नरेन आणि गौरीला कुठे कुठे फिरायला गेला होता? कायं कायं केले असे काही काही प्रश्न विचारतं होत्या पण त्यांना अपेक्षित अशी उत्तरे मिळाली नाहीत आणि त्यांचा संशय आणखी बळावला.

जेवणं झाल्यावर गौरीला अपार्टमेंटच्या कंपाऊंडमध्ये शतपावलीला घेऊन जाण्यासाठी त्या निघाल्या तेव्हा नरेनने तिची तब्येत बरी नाही, तिला आरामाची गरज आहे असे सांगून आतमध्ये नेले. प्रभाताई काही बोलल्या नाही.

आपल्या रूममध्ये जाऊन त्या पडल्या मात्र त्यांना झोप काही लागतं नव्हती. गौरी आणि नरेनच्या नात्यात नक्की कायं गडबड आहे याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हते. विचारांत मध्यरात्री केव्हातरी त्यांचा डोळा लागला. तरीही सवयीप्रमाणे त्यांना लवकर जाग आली.

स्वतःचे आवरून प्रभाताई किचनमध्ये आल्या आणि त्यांनी चहा करायला ठेवला इतक्यात बेडरूम मधून गौरी बाहेर बाथरूमच्या दिशेने आली तेव्हा प्रभाताईनी बाहेर डोकावले.

गौरी एका पायाने लंगडत चालतं होती आणि तिचा चेहरा खूप थकलेला वाटत होता. त्यांनी लवकरात लवकर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले.

गौरी अंघोळ करून किचनमध्ये आली तसे प्रभाताईंनी तिच्या हातात चहाचा कप दिला.
"अहो आई मी केला असता ना चहा, मला आज उशीर झाला जरा", गौरी खाली मान घालून बोलायला लागली.

"असू दे गं कधीतरी तु ही घे आयता चहा", त्यांनी गौरीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला.

"गौरी नरेन तुला काही त्रास देत नाही ना गं? नीट काळजी घेतो ना तुझी?", प्रभाताईंनी गौरीला विचारले इतक्यात नरेन किचनमध्ये आला

" कायं आई तुझा तुझ्या मुलावर जराही विश्वास नाही वाटतं. सुनेला विचारतं आहेस मुलगा काळजी घेतो की नाही म्हणून. गौरी तु का शांत का उभी आहेस? आईला सांग ना मी तुझी किती काळजी घेतो ते ", नरेन गौरी जवळ येत बोलला तेव्हा तिचे थरथरणारे हात प्रभाताईंच्या नजरेतून सुटले नाहीत.

" हो आईss खूप काळजी घेतात माझी हे ", गौरीने उत्तर दिले.

" बघं आई आता पटली ना खात्री? बर आज आई आहे तर मी ही सुट्टी घेतो आपण मस्त गप्पा मारूया ", एवढे म्हणतं नरेन आतमध्ये गेला आणि गौरीशी त्यांना एकांतात बोलायला मिळणार नाही तेव्हा दुसरा काहीतरी उपाय शोधायला हवा हे त्यांनी ठरवले.

क्रमशः


🎭 Series Post

View all