आईपणाची शिक्षा : भाग ३ (अंतिम भाग)

प्रत्येक आई चूक पोटात घालत नसते
विषय : चुकीला माफी नाही

     दिवसभर नरेन गौरीला जराही एकटे सोडतं नव्हता. प्रभाताई कायं करता येईल याचा विचार करत राहिल्या. रात्री त्यांनी आईस्क्रीम आणायला त्याला बळजबरीने एकट्याला पाठवले तेव्हा नरेनचा नाईलाज झाला.

गौरी नरेनला इतकी घाबरते की ती काही बोलणार नाही याची खात्री प्रभाताईंना होतीचं म्हणून गौरीला किचनमध्ये पाठवून त्या हळूचं त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि फोन रेकॉर्ड चालू करून कोणालाही दिसणार नाही अशा रीतीने ठेवला.

नरेन आईस्क्रीम घेऊन आला तसे सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ले. नरेन गौरीला घेऊन रूममध्ये गेला. ते दोघे रूममध्ये गेले तसे प्रभाताई हळूच रूममधून बाहेर आल्या आणि त्यांच्या बेडरूम जवळ जाऊन त्यांनी कान लावले.

त्यांना अस्पष्ट असे आवाज येऊ लागले.

"मी नाही काही सांगितले अहो खरचं", गौरीचा रडण्याचा आवाज त्यांना थोडासा यायला लागला.

'म्हणजे माझी शंका खोटी नव्हती. इतकी सोन्यासारखी सून आहे पण नयनला तिची किंमत नाही.', स्वतःशीच बडबडत त्यांनी जोरजोरात दरवाजावर थाप मारली. तसे नरेनने सगळे सावरून दरवाजा उघडला अर्धा.

" कायं झालं आई? ", प्रभाताईंनी त्याच्या कानाखाली वाजवले आणि त्या थेट आतमध्ये घुसल्या. गौरी अर्ध नग्न अवस्थेत होती आणि तिच्या पट्ट्याचे वण होते. तिची अवस्था पाहून प्रभाताईंना गलबलून आलं.

"अरे नालायका काय अवस्था केली आहेस तु या मुलीची? तुला लाज नाही का वाटतं? ", असे म्हणतं त्यांनी गौरीला जवळ घेतले आणि नरेनला सुनावले.

"हे बघं आई तु माझ्या आणि गौरीच्या मध्ये पडू नको आमचं आम्ही बघून घेऊ."

"कायं बघणार आहेस? हिला अजून किती त्रास देणार आहेस? नरेन तु थोडा रागीट आहेस पण तु कधी या थराला जाऊन वागशील असे मला वाटले नव्हते.

किती हौसेने मी गौरीला सून म्हणून घेऊन आले होते घरी तु मात्र तिची आणि माझ्या स्वप्नांची ही निराशा केली. ते काही नाही तुला शिक्षा मिळायला हवी. ", असे म्हणतं प्रभाताई उठल्या आणि गौरीला घेऊन बाहेर हॉलमध्ये जाऊ लागल्या तसे नरेन त्यांच्या पाठोपाठ आला त्याने प्रभाताईंचे केस धरले.

" हे बघं म्हातारे आमच्या मध्ये पडू नको इथं राहिलीस तर गप्प रहा नाहीतर गावाला निघून जायचं ", आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकताना प्रभाताईंना प्रचंड धक्का बसला.

गौरी रडत होती आणि नरेनला प्रभाताईंना सोडण्याची विनंती करतं होती पण त्याच्या अंगात सैतान संचारला होता त्याने प्रभाताईंना जोरात ढकलले तसे त्या डायनिंग टेबलच्या खुर्चीवर जाऊन पडल्या. समोर फ्रूट बास्केट मध्ये चाकू होता.

नरेन गौरी जवळ आला आणि तिचा चेहरा त्याने हाताच्या पंज्याने पकडला गौरी वेदनेने ओरडली आणि इतक्यात प्रभाताईंनी त्याच्या पोटात चाकू खुपसला.

गौरी किंचाळली आणि नरेन प्रभाताईंच्या पायाशी पडला.

"आई कायं केले तुम्ही हे? तुमच्या मुलाला तुम्ही मारले का?", गौरीने रडतं रडतं विचारले.

"गौरी तो मुलगा होता हे माझं दुर्दैव. त्याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुझ्या या परिस्थितीला मी जबाबदार होते म्हणून तुझी मी सुटका केली यातून. आता नव्याने आयुष्याची सुरुवात कर", असे म्हणून त्यांनी गौरीच्या आई वडिलांना फोन करून सगळे सांगितले.

सकाळी गौरीचे आई वडील तिला घेऊन जाण्यासाठी आले. जाताना गौरी प्रभाताईंच्या गळ्यात पडून खूप रडली.

" आई तुम्ही असे करायला नको होते? पोलिसांना का कळवले तुम्ही?"

" हे बघं गौरी मी गुन्हा केला आहे, नरेन सारख्या मुलाला जन्म देऊन मी खूप मोठी चूक केली होती आणि माझ्या या आईपणाची मला शिक्षा मिळायला हवी मला", इतके बोलून पोलिसांच्या ताब्यात स्वतःच्या स्वाधीन करतं प्रभाताई गौरीसमोरून नजरेआड झाल्या.


                     **समाप्त **


🎭 Series Post

View all