Login

आईपणाच्या सावल्या ( भाग ३)

मातृत्व हे स्त्री आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग जणू स्त्रिया आयुष्य मातृत्वाशिवाय अपूर्णच पण हेच मातृत्व प्रत्यक्षात अनुभवताना स्त्रीला शारीरिक तसेच मानसिक त्रासातून आजारातून जावे लागते त्यावरच आधारित एक सामाजिक कथा आईपणाच्या सावल्या.
कथा : आई पाण्याच्या सावल्या
(भाग ३)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
--------------
त्या रात्री विवेकने संध्याच्या डोळ्यातलं गडद रिकामेपण पाहिलं आणि त्याच मन हललं.
"ही माझी तीच संध्या आहे का जी पूर्वी हसतमुख उत्साही होती ?"
त्याला पहिल्यांदाच जाणवलं.तो सतत नॉर्मल आहे निघून जाईल असं म्हणून दुर्लक्ष करत होता पण आता समोर दिसणारी तिची अवस्था सामान्य नव्हती.

सकाळी उठल्यावर त्याने इंटरनेटवर शोधाशोध करायला सुरुवात केली.नेमकं याचं कारण तो शोधू लागला. जेव्हा डिलिव्हरी नंतरच्या स्त्री आयुष्यातील बदलांबद्दल त्यांनी शोध घेतला;तेव्हा त्याला अनेक असे लेख सापडले त्यात लिहिलं होतं 'पोस्ट पार्टम डिप्रेशन ही गंभीर मानसिक अवस्था आहे.योग्य उपचार न घेतल्यास ती स्त्रीच्या आणि बाळाच्या जीवनाला घातक ठरू शकते.'

विवेकच्या अंगावर काटा आला. त्या रात्री जेव्हा संध्या खिडकीत उभी होती ते विवेकने पाहिले होते मात्र त्यादिवशी विवेकने दुर्लक्ष केले होते पण या मानसिक अवस्थेबद्दल जेव्हा त्याला माहिती मिळाली त्यादिवशी विवेकला संध्या खिडकीत उभी असताना तिच्या डोळ्यातले भाव आठवले आणि तो हादरला.
वेळ न दडवता विवेक थेट संध्याकडे गेला.
"संध्या,मला माफ कर.मी तुला समजून घेतलं नाही.चल आपण डॉक्टरांकडे जाऊया."
संध्याने थकलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर शब्द फुटले नाहीत,पण डोळ्यातून उघडणारे अश्रू तिचा होकार कळवत होते.

डॉक्टरांनी तपासून सांगितलं "ही पोस्ट पार्टम डिप्रेशन ची लक्षणं आहेत. ही कुठलीही कमजोरी नाही,तर एक वैद्यकीय अवस्था आहे.योग्य औषधं,समुपदेशन आणि कुटुंबाचा आधार मिळाला तर ती सहज सावरू शकते."

संध्याच्या मनावरून जणू एक ओझं उतरलं "माझ्या दोष नाही,मला फक्त मदतीची गरज आहे," हे तिला पहिल्यांदाच जाणवलं.

उपचारांसोबत समुपदेशकांनी संध्याला बोलतं केलं "तुझ्या मनातले विचार मोकळेपणाने सांग.कुठलाही विचार चुकीचा नाही.तू तुझा अनुभव आहे."
संध्या हळूहळू तिच्या आतल्या अंधाऱ्या गोष्टी भीती बाहेर काढू लागली. "मला वाटायचं की बाळाला नीट सांभाळू शकत नाही,कधी वाटायचं स्वतःच्या जीवाला काहीतरी करून घ्यावं तर बरं होईल,आईपणाचा आनंद का नाही मिळत?"

समुपदेशक शांतपणे संध्याचं बोलणं ऐकत होते. शेवटी त्यांनी सध्याला समजावलं
"यात तुझा दोष नाही,अवस्था अनेक स्त्रियांना येते,पण समाज त्याबद्दल बोलायला तयार नसतो.तू बोललीस म्हणजे अर्ध ओझ कमी झालं."

संध्याच्या मनाला पहिल्यांदा दिलासा मिळाला.
घरी परतल्यावर विवेकही बदलला होता. आता विवेक संध्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साथ द्यायला लागला. बाळ रात्री रडायला लागलं की तो उठून बाळाला घेई.जेवणात तिचं आवडतं काहीतरी करायला लागला.संध्या आश्चर्याने त्याच्याकडे पहायची.हा तोच विवेक आहे का जो पूर्वी म्हणायचा, "सगळ्या बायका करतात मग तुला का जमत नाही?"

सासुबाई सुरुवातीला थोड्या कुरकुरल्या. "आमच्याकडे डॉक्टर नव्हते,आम्ही हे सगळं झेललं."
पण विवेक ने आईला समजावलं, "आई काळ बदलला आहे.शरीराला जसा औषध लागतं, तसेच मनालाही उपचार लागतात."

हळूहळू सासू बाईंचा दृष्टिकोन बदलू लागला.त्या संध्या सोबत बसून बाळाला खेळवायला लागल्या.

काही आठवड्यातच संध्याला फरक जाणवायला लागला.झोपेत सुधारणा झाली,चेहऱ्यावरील तेज परतला,बाळाच्या गालावर हात फिरवताना तिच्या मनात आता रिकामेपण नव्हते,तर एक मऊसा ओलावा होता.

एके दिवशी संध्या बाळाला अंगावर घेऊन खेळवत होती. बाळ आईच्या छातीवर शांत श्वास घेत होतं.संध्याच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू आले ती हळूच कुजबुजली "आज मी खरंच आई झाल्यासारखी वाटते."

विवेक तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटला "संध्या, तू सुरुवातीपासूनच आई होतीस फक्त तुला तुझ्या आईपणापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा हात धरायला हवा होता आणि तो हात मी लवकर दिला नाही हे माझी चूक होती ."

इतक्या दिवसात संध्याने पहिल्यांदा मनापासून हसून विवेककडे पाहिलं. हळूहळू सध्याची स्थिती बदलू लागली.तिच्या आतील अंधारात भीतित पुन्हा प्रकाश डोकावू लागला.अजूनही काही दिवस अवघड असायचे पण आता ती एकटी नव्हती. कुटुंबाची साथ, डॉक्टरांचा सल्ला आणि स्वतःचा आत्मविश्वास हे तिला त्या अंधारातून बाहेर काढत होते.

काही महिन्यांनी संध्याकाळ तिचा अनुभव छोट्या गटात मांडला जिथे नवीन आई-बाबा एकत्र यायचे. तिने हळुवारपणे सांगितले
"आई पण हे फक्त गुलाबाच्या पाकळ्यांनी बनलेलं नसतं त्यात काटेही असतात.आपण त्या मान्य नाही केलं तर स्त्रिया आतून जखमी होतात.मला पोस्ट पार्टम डिप्रेशन झालं पण योग्य वेळी योग्य उपचार घेतले आणि मला साथ मिळाली.आज मी पुन्हा त्याच उत्साहाने जगते.त्यामुळे कुठलीही आई अशी झुंज देत असेल तर तिला 'कमकुवत' म्हणू नका.तिचा हात धरा तिला एका एवढेच पुरेसं आहे."

गटातल्या उपस्थित अनेक स्त्रिया डोळे पुसत होत्या आणि पती मंडळी गप्पपणे आपल्या पत्नींकडे पाहत होते.

अंतिम
संध्याची कहाणी हे केवळ एका स्त्रीची नाही, हजारो आईंची आहे.अशा अनेक संध्या आपल्या आसपास आपल्या घरात वावरत आहेत.
आई होणं केवळ शारीरिक नाही,तर मानसिक प्रवासही आहे. बाळाचा जन्म म्हणजे आईसाठी नव्या आयुष्याचा जन्म त्यात आनंदही आहे आणि संघर्षही.डिलिव्हरी मध्ये फक्त बाळच नाही तर आई देखील नवा जन्म घेते तिलाही तितकच प्रेम आणि काळजी हवी असते जितकी नवजात बाळाला.

समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की,पोस्टपार्टम डिप्रेशन हे आजार आहे कमकुवतपणा नाही.
आईला हसरं बघायचं असेल तर तिच्या डोळ्यातला अदृश्य थकवा,भीती आणि पोकळीही पहायला शिका. तिच्या खांद्यावर हात ठेवा.तिचं एका तिला डॉक्टरांपर्यंत घेऊन जा. कारण,
आई आनंदी असेल तरच बाळ खरं आनंदी होईल.

कथा समाप्त
धन्यवाद !
लेखिका : अहाना©®
0

🎭 Series Post

View all