कथा : आईपणाच्या सावल्या ( भाग २ )
चॅम्पियन ट्रॉफी 2025
-------------------------
दिवस सरत होते तसे संध्या थकून जात होती. बाळाचे संगोपन,झोपेचा अभाव आणि शरीरावरचा ताण इतका वाढला होता की सकाळी उठल्यावरही तिला असे वाटत होते जणू अंगावर शंभर किलोच ओझं आहे.
सुरुवातीला बाळाचा रडणं जणू संगीत वाटत होतं आता तेच रडणं एखाद्या तीव्र कर्कश आवाजासारखं वाटतं होतं.

कधी कधी तर बाळ रडायला लागलं की तिच्या मनात वाईट विचार येऊ लागायचे.
"याला गप्प करण्यासाठी मीच कायमची गप्प झाले तर ? सगळा त्रास संपेल"
"मी नसेल तर माझ्यामागे याला कोणीतरी नीट सांभाळेलच.."
असे विचार आल्यावर संध्या घाबरून जायची, बाळाला छातीशी लावून रडू लागायची.
"याला गप्प करण्यासाठी मीच कायमची गप्प झाले तर ? सगळा त्रास संपेल"
"मी नसेल तर माझ्यामागे याला कोणीतरी नीट सांभाळेलच.."
असे विचार आल्यावर संध्या घाबरून जायची, बाळाला छातीशी लावून रडू लागायची.
घरातील लोक अजूनही हे सगळं सामान्य समजत होते. सासुबाई म्हणत ,"आमच्या काळात एवढं काही नव्हतं,चार चार मुलं सांभाळलीत आम्ही. आज कालच्या मुलींना सगळेच कठीण वाटतं."
त्यांच्या या शब्दांनी संध्या अजूनच गप्प झाली तिला वाटलं,"मी चुकीची आहे,मीच कमकुवत आहे."
त्यांच्या या शब्दांनी संध्या अजूनच गप्प झाली तिला वाटलं,"मी चुकीची आहे,मीच कमकुवत आहे."
विवेकही ऑफिसच्या व्यापात गुंतून गेला होता.रात्री घरी आल्यावर तो मोबाईल रोल करत बसे आणि संध्या बाळंतपणाशी झगडत राही.
कधी कधी धीर धरून ती विवेकला म्हणायची,"जरा तू घे बाळाला,माझं डोकं दुखतंय."
विवेक वैतागून उत्तर द्यायचा,"माझा संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये जातो,निदान घरी आल्यावर तरी शांत बसू देतं."
विवेक वैतागून उत्तर द्यायचा,"माझा संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये जातो,निदान घरी आल्यावर तरी शांत बसू देतं."
हे असे वर्तन,अशी उत्तर संध्याच्या मनावर कडाडणाऱ्या चाबकसारखी बसत.
संध्या बाळासोबत एकटीच झगडत राहायची, आणि विवेकच्या डोळ्यातही आपली ओढ हरवली आहे हे तिला जाणवायचं.
संध्या बाळासोबत एकटीच झगडत राहायची, आणि विवेकच्या डोळ्यातही आपली ओढ हरवली आहे हे तिला जाणवायचं.
दिवस जसजसे पुढे चालले होते तस तसे, हळूहळू संध्याच्या मनातले विचार धोकादायक वळण घेऊ लागले. रात्री झोप येत नसे. संध्या खिडकी जवळ बसून काळोखात पहात राहायची.
"जीवन असं ओझ्यासारखं असेल तर जगण्याचा उपयोग कायं?"
असे प्रश्न तिच्या मनाला कुरतडू लागले.
"जीवन असं ओझ्यासारखं असेल तर जगण्याचा उपयोग कायं?"
असे प्रश्न तिच्या मनाला कुरतडू लागले.
एक रात्री तर ती खिडकीजवळ उभी राहून विचार करत होती "तो अंधार मला बोलवत आहे,मी इथूनच उडी मारली तर?"
अजून पुढचं पाऊल उचलणार होतीच तेवढ्यात बाळ मोठ्याने रडायला लागलं.संध्या शुद्धीवर आली तिने घाई घाईने बाळाला उचललं, पण तिच्या हातांच्या थरथरीतूनच तिच्या आतली भीती स्पष्ट दिसत होती.
अजून पुढचं पाऊल उचलणार होतीच तेवढ्यात बाळ मोठ्याने रडायला लागलं.संध्या शुद्धीवर आली तिने घाई घाईने बाळाला उचललं, पण तिच्या हातांच्या थरथरीतूनच तिच्या आतली भीती स्पष्ट दिसत होती.
घरातल्यांना अथवा चार चौघांना तिची हे झुंज जणू दिसतच नव्हती. नातेवाईक फोनवर विचारपूस करत ,"बाळाचा फोटो पाठव,आई झाल्यावर किती मस्त वाटतं असेल ना?"
संध्या मात्र आतून रिकामी होती.तिला कोणालाही सांगायचं धाडस होत नव्हतं. आईला हे सांगावं वाटलं,पण तिने देखील सगळ्या गोष्टी हलक्यातच घेतल्या. "सगळ्यांना होतं असंच मन कणखर ठेवं," असं बोलून विषय बदलला.
संध्या मात्र आतून रिकामी होती.तिला कोणालाही सांगायचं धाडस होत नव्हतं. आईला हे सांगावं वाटलं,पण तिने देखील सगळ्या गोष्टी हलक्यातच घेतल्या. "सगळ्यांना होतं असंच मन कणखर ठेवं," असं बोलून विषय बदलला.
दिवसा गणिक संध्या अजूनच एकटी पडली. बाळाशी जुळवून घेण्याऐवजी तिचं मन बाळापासून दूर जाऊ लागलं. कधी कधी तिला बाळाच्या डोळ्यांत पाहताना अपराधीपणाची भावना दाटून यायची "मी तुझी आई आहे,पण तुला हवा असलेला प्रेमाचा स्पर्श मी देऊ शकत नाही."
एक दिवस तर परिस्थिती हाताबाहेर गेली. संध्याने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं.ती भांडी घासत बसली होती आणि बाळ सतत रडत होतं.तीव्र चिडचिड तिने बाळाला जोरात हलवलं, बाळ अजूनच रडू लागलं.
तेवढ्यात विवेक रूम मध्ये आला त्यांनी संध्याकाळी पाहिलं आणि ओरडला , "काय करतेस हे ? जरा तरी शहाणपण आहे का तुझ्यात?"
तेवढ्यात विवेक रूम मध्ये आला त्यांनी संध्याकाळी पाहिलं आणि ओरडला , "काय करतेस हे ? जरा तरी शहाणपण आहे का तुझ्यात?"
त्या क्षणी संध्या गप्प बसली,पण तिच्या डोळ्यातल्या खोलवरच्या आर्ततेकडे कोणाचेच लक्ष गेलं नाही.
त्या रात्री संध्या बिछान्यावर पडली होती. विवेक गाढ झोपला होता.संध्या मात्र छताकडे पाहत राहिली.तिच्या मनातला अंधार इतका घट्ट झाला होता की तिला पुढचं पाऊल टाकण्याची भीती च उरली नव्हती.पण तिच्या शेजारीच बाळ हलकसं हात हलवत होतं त्यां नाजूक बोटांकडे पाहून संध्या थरकापली.
"मी नाही राहिले तर या जीवाचं काय?"

संध्याच्या मनात पहिल्यांदाच दोन आवाजांची झुंज सुरू झाली. एक म्हणत होता, "सगळं संपवून टाक तुझी झुंज संपेल " आणि दुसरा कुजबुजत होता, "नाही,असं करू नकोस थोडं थांब कुणीतरी तुला नक्कीच समजून घेईल."
इतक्यात विवेक झोपेतून हलकासा जागा झाला. बाळ झोपलेला असताना संध्या जागी का आहे हे पाहताच तो उठून बसला आणि विवेक ने संध्याकडे पाहिलं.
तिच्या डोळ्यातलं ओसाड रिकामेपण विवेकला दिसलं.
त्याला पहिल्यांदाच जाणवलं काहीतरी गंभीर बिघडलं आहे.
तिच्या डोळ्यातलं ओसाड रिकामेपण विवेकला दिसलं.
त्याला पहिल्यांदाच जाणवलं काहीतरी गंभीर बिघडलं आहे.
(पण नक्की काय बिघडलं होतं, असंही नव्हतं की संध्या सोबत किंवा संध्याचं कोणीच नव्हतं. असंही नव्हतं की संध्या सांभाळू शकत नव्हती. मग नेमकं बिघडले कुठे?)
भाग २ समाप्त
लेखिका : अहाना ©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा