आजच्या प्रवासाचा सोबती केली पण प्रीती

केली पण प्रीती
आजच्या प्रवासाचा सोबती "केली पण प्रीती."

आजवर प्रवास करताना कानात इअरफोन नावाच्या पुंगळ्या टाकुन असाच वेळ वाया घालवत होतो. असही तेव्हा करायला दुसरं काहीच नसतं. नाही का?


पण आज मात्र माझ्या प्रवासाला सोबत होती. ती म्हणजे एका पुस्तकाची.

स्वाती बालुलकर लिखीत "केली पण प्रीती" नावाच.

आता अशा प्रतिभावंत लेखिकेच्या पुस्तकाला मी नवख्या माणुस काय प्रतिक्रिया देणार? आणी नाही दिली तर त्या शिक्षिकेच्या भिती. त्याला तर माझ्यासारखे सगळेच घाबरतात.

असो. तर या कथासंग्रहाबद्दल बोलायचं झालं. तर यात प्रेमकथा आहेत. पण त्यात प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा मांडल्या गेल्या आहेत.

लग्न झाल्यानंतर अचानक भेटलेलं पहील प्रेम, लग्नानंतर पाय घसरणार तोच हात सांभाळणार प्रेम, जात पात, गरीब श्रीमंत, उच्च नीच यापलीकडे जाऊन मिळवणार प्रेम.

अशा विविध छटा ह्या कथासंग्रहात वाचायला मिळतात. कधी कधी आपला भुतकाळ तर नाही? असं वाटुन जातं.

सर्वात महत्वाच म्हणजे नात संभाळुन घेतलं की ते टिकतं हे सांगणारा हा कथासंग्रह आहे. वेळ भेटला तर नक्कीच वाचा.