चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथा लेखन
©®नम्रता जांभवडेकर
विषय - आजच्या युगातील सावित्री (भाग - २)
ऑफिसमध्ये लंच ब्रेक झाला. तसे सगळे पुरूष मंडळी कॅन्टीनच्या दिशेने जाऊ लागले. तर बायका फराळाचे डबे उघडू लागल्या. तशी आकांक्षाला सुद्धा भुकेची जाणीव होऊ लागली पण फराळाचं काहीचं आणल नसल्याने ती आपलं कामं करत होती. बाजूच्या डेस्कवरच्या नुकतीच ओळख झालेल्या मुलीने तिला फराळाचं खायला बोलावलं पण तिने कामाचं कारण पुढे करून नकार दिला आणि आपलं काम करू लागली.
पाचेक मिनिटांनी एक शिपायाने तिच्या डेस्कवर टिफीन बॅग घेऊन ठेवली. टिफीन बॅग तिला ओळखीची वाटली.
"हा टिफीन कोणी आणला?" आकांक्षा
"एक साहेब हा टिफीन बॉक्स आकांक्षा मॅडमला द्या असं म्हणून निघून गेले." शिपाई माहिती पुरवत म्हणाले आणि निघून गेले
"नशीबवान आहेस बाई. वट पौर्णिमेचा उपवास चांगलाच पावलाय तुला. चक्क नवरा फराळाचा डबा देऊन गेला. नाहीतर आमचे हे!" एक कलिग आदित्यच कौतुक करत म्हणाली
तशी आकांक्षा काहीशी लाजली
तिने डबा उघडला. तसा साबुदाणा खिचडीचा घमघमाट तिच्या नाकात शिरला. तिने वासावरूनच ओळखलं. ही खिचडी आदित्यने बनवली आहे म्हणून.
तिने चमच्याने एक घास खाताच तिचं मन तृप्त झालं. तिने सगळ्यांना थोडी थोडी खिचडी वाटली. सगळ्यांनी आदित्यने बनवलेल्या खिचडीच कौतुक केलं. तसं आकांक्षाने काहीतरी विचार करतच आदित्यला मॅसेज केला. 'संध्याकाळी न्यायला ये.' त्यावर त्याचा '' चा रिप्लाय आला.
तिने चमच्याने एक घास खाताच तिचं मन तृप्त झालं. तिने सगळ्यांना थोडी थोडी खिचडी वाटली. सगळ्यांनी आदित्यने बनवलेल्या खिचडीच कौतुक केलं. तसं आकांक्षाने काहीतरी विचार करतच आदित्यला मॅसेज केला. 'संध्याकाळी न्यायला ये.' त्यावर त्याचा '' चा रिप्लाय आला.
तशी आकांक्षाने आपल्या मैत्रिणींसोबत फराळ फस्त केला आणि पुन्हा कामाला लागली.
*****
सगळी कामं आवरून संध्याकाळी साडे पाचच्या दरम्यान आकांक्षा ऑफिसमधून निघाली. आदित्य ऑफीस कॅन्टीन जवळ उभा राहून तिची वाट पाहत होता.
"निघायचं?" आदित्य
"चहा घेऊया. इथे खूप छान चहा मिळतो. मी सकाळीच घेतला." आकांक्षा
त्यावर आदित्यने होकारार्थी मान हलवली. दोन चहाची ऑर्डर देतं आकांक्षा पुन्हा आदित्यकडे वळली.
"मग कसा होता ऑफिसचा पहिला दिवस?" आदित्यने विचारलं
"खूप छान होता ऑफिसचा पहिला दिवसही आणि तू पाठवलेला फराळाचा डबाही. खिचडी खूप मस्त झालेली. सगळ्यांना आवडली." आकांक्षा आनंदाने म्हणाली
"इतक्या दिवसांनी बनवली. मला वाटलं फसेल की काय पण जमली व्यवस्थित." आदित्य
"ज्याच्या हातात खुद्द अन्नपूर्णा देवी वसली आहे. त्याची कुठली रेसिपी कशी काय फसेल." आकांक्षा त्याच्याकडे कौतुकाने पाहत म्हणाली
तेवढ्यात, दोघांचा चहा आला. आदित्यने चहाचा आस्वाद घेतला.
"कसा आहे?" आकांक्षाने उत्सुकतेने विचारलं
"खूप मस्त! वेलचीमुळे चहाला वेगळीच टेस्ट आलीय." आदित्य
"हो ना, दूध सुद्धा अगदी नावाला घातलय. त्यामुळे चहाचा खरा स्वाद लागतोय." आकांक्षा
आदित्य मात्र कॅन्टीनमधल्या चहा बनवणाऱ्या काकांचं निरीक्षण करू लागला.
"आदित्य, काय झालं? असं का बघतोयस?" आकांक्षा
"ते काका एवढ्या एकाग्रतेने पण तेवढ्याच सहजतेने चहा बनवतायत ना की ह्या चहाला सुद्धा अमृताची गोडी आलीय. किती आनंदी दिसतायत ना ते." आदित्य
"कारण ते त्यांच्या आवडीचं काम करतायत." आकांक्षा
तसा आदित्य तिच्याकडे बघू लागला
"माणूस जेव्हा मनापासून आनंदी असतो ना, तेव्हा त्याचा आनंद त्याने बनवलेल्या पदार्थात उतरतो. आता तुझ्याच हाताला किती छान चव आहे हे आज तू बनवलेल्या खिचडीतून मला पुन्हा एकदा जाणवलं." आकांक्षा सूचक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली
"तुला नेमकं काय म्हणायचय आकांक्षा?" आदित्यने स्पष्टपणे विचारलं
"आदित्य, जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्या गोष्टीमागे नक्कीचं काहीतरी कारण दडलेलं असतं. जे आपल्याला तेव्हा कळतं नाही पण वेळ आपल्याला त्या कारणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवत असते. तुला लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड होती. तुला शेफ बनायचं होतं पण बाबांच्या अचानक जाण्याने शेफच शिक्षण सोडून तुला नोकरी करावी लागली आणि आता तू तुझ्या नोकरीत स्थिरस्थावर असताना अचानक तुझी नोकरीही गेली. ह्यामागे नक्कीचं काहीतरी कारण असेल. कदाचित तुला तुझी आवड जपता यावी म्हणून देवानेच असा मार्ग तयार केला असेल." आकांक्षा विचार करत म्हणाली
"आकांक्षा, अग मी तुझ्यासाठी आज साधी साबुदाणा खिचडी काय बनवून आणली तू तर मला सरळ शेफ ही पदवी देऊन मोकळीच झालीस. साबुदाणा खिचडी बनवून कोणी शेफ बनत नाही. त्यासाठी स्टडी करावा लागतो. शिकावं लागतं सगळं." आदित्य
"मग शिक ना. कुठूनतरी सुरूवात करायचीच आहे. जशी तू आज साबुदाणा खिचडी बनवून केलीस. तसचं एक दिवस छान रेसिपी सुद्धा बनवशील खात्री आहे मला." आकांक्षा आत्मविश्वासाने म्हणाली
तसा आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला.
"निघायचं?" कपातला चहा संपताच आकांक्षाने विचारलं.
काहीशा विचारताच भांबावलेल्या त्याने होकारार्थी मान हलवली आणि बाईकला किक मारत दोघेही निघून गेले.
*******
दोघेही घरी आले. आकांक्षाने बेल वाजवली पण उमा बाईंनी काही दरवाजा उघडला नाही. तसं आदित्यने स्वतः जवळच्या चावीने दरवाजा उघडला आणि दोघंही घरात आले. तर घरात पूर्ण अंधार होता. आकांक्षाने हॉलमधली लाईट लावताच सगळीकडे प्रकाश पसरला पण समोरचं दृश्य पाहून दोघेही दचकले. समोरच्या आराम खुर्चीत उमा बाई निर्विकार चेहरा करून बसल्या होत्या.
"आई, अग तिन्ही सांजेच्या वेळेला घरात असा अंधार करून का बसलीस आणि मी बेल वाजवली तेव्हा दार का नाही उघडलंस आणि तुझ्या हातात हे पेपर कसले आहेत?" आदित्यने त्यांच्याजवळ जातं विचारलं
"तुच बघ कसले पेपर आहेत?" उमा बाईंनी त्याच्या हातात पेपर दिले आणि उठून उभ्या राहिल्या.
आदित्यने पेपर वाचताच तो आश्चर्यकारक भीतीने उमा बाईंकडे बघू लागला. त्यांचे पाणावलेले रागीट डोळे पाहून आदित्यला भीती वाटू लागली.
"आदित्य, कसले पेपर आहेत ते?" दोघंही काहीचं बोलत नाही हे पाहून शेवटी आकांक्षाने विचारलंच.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा