आजी: कुटुंबाचं आगळ
भाग १
आज सकाळी ११ वाजता शरयु चे मोठे ऑपेरेशन ठरले होते . तिला कालच ऍडमिट केले होते . सकाळी तिची दोन मुले सासू, आणि तिची मामी आणि नवरा असे सगळेच दवाखान्यात आले होते . सगळ्यांना ऑपेरेशन चे टेंशन आले होते त्यामुळे सगळे बाहेर येरझारा घालत होते . बरोबर ११ वाजता आँपरेशन सुरु झाले. डॉक्टरांनी टेंशन घेउ नका ,होईल सगळे नीट असे सांगितले असले तरी कोणाचेच चित्त थाऱ्यावर नव्हते .
आजी नाती च्या शेजारी तिचा हात हातात घेउन बसली होती . आपल्या आईला काही होईल का याच भीतीने तिची गाळण झाली होती. भाऊ पण कधी तिच्या शेजारी बसत होता तर कधी फेऱ्या मारत होता. नाही म्हटले तरी तिचे ऑपेरेशन बरेच मोठे होते. त्यामुळे ते साधारण ३ तासाने संपले. डॉक्टर जेंव्हा ऑपेरेशन चांगले झाले म्हणाले तेंव्हा सगळयांच्या जीवात जीव आला .
साधारण १५ दिवसांनी शरयू ला घरी आणले . घरी आणल्यावर आजी ने आईवरून भाकर तुकडा ओवाळून टाकला मग तिचे औक्षण करून घरात घेतले.
घरी येई पर्यंत बाबांनी कोणालाच आईचे कश्याचे ऑपेरेशन झाले आहे सांगितलेच नव्हते . त्यामुळे आल्या आल्या आईला झोपवून आजी आम्हाला सगळ्यांना घेऊन बाहेर आली . सगळे बसले असताना बाबांना म्हणजे अमोद ला म्हणाली , " बाळा , आता सांग काय झालय शरयूला ? "
इतके दिवस मनात साठवून ठेवले होते ते आधी डोळ्या वाटून बाहेर पडले. आईने पण त्याला जरा मोकळे होऊ दिले . मुलांनी बाबांच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी बघितले . हे बघून दोघंही आजी आणि बाबांच्या मध्ये जाऊन बसले .
अमोद आईचा हात हातात घेउन म्हणाला ," आई , मागच्या आठवड्यात शरयू च्या छातीत गाठ लागली . म्हणून आम्ही डॉक्टरांकडे चेकिंग ला गेलो. सगळ्या टेस्ट केल्या . दोन दिवसात रिपोर्ट येतील असं डॉ. सांगितले. आम्ही शांत होतो .
मनात सगळा गोंधळ होता पण तुम्हाला काही जाणवू द्यायचा नाही असं ठरवलं होते त्यामुळे काही नाही बोललो. परवा आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर ..... .... "
असं म्हणून त्याने समोर ठेवलेले पाणी पिले . मनाचा ठिय्या करून म्हणाला , " तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय ." असं म्हणून तो खोलीत शरयू कडे निघून गेला .
हे ऐकल्यावर सगळे हादरून शांतच बसले. १५ वर्षांची मीरा रडायला लागली . तर आजीच्या पण डोळ्यात पाणी आलं पण .....
अमोद खोलीत आला तर शरयू झोपली होती. तिच्या जवळ जाऊन बसला . तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचार करू लागला. , " शरयू , तुला कधीच असं झोपलेलं पहिले नाही ग . तूला यातून बरं होण्यासाठी मी खूप प्रयत्न करेन . "
तिची हालचाल चालू झाली . हळू हळू डोळे उघडून बघितले तर समोर अमोद बसलेला दिसला . त्याला बघून ती म्हणाली , " मी यातून बरीच नाही झाले तर. .... "
त्याने लगेच तिच्या तोंडावर हात ठेऊन म्हणाला , " अगं असा नको विचार करू . तू नक्की बरी होशील . मी कायम तुझ्या
बरोबर आहे . "
बरोबर आहे . "
खोलीच्या दाराशी उभ्या असलेल्या मीरा ने ते ऐकले अन् पळत पळत आजीच्या कुशीत जाऊन रडायला लागली . आजीने तिला कसेबसे शांत करून जेवणची तयारी करू लागली . मीरा पण आजी ला मदत करू लागली .
जेवणाची तयारी झाल्यावर आजी शरयू ला ताटं घेउन तिच्या खोलीत आली . शरयू सासूबाईंना बघून म्हणाली , " अहो , आई .. ...... "
सासूबाई म्हणाल्या , " बाळा , तू आता काही विचार करू नकोस . मी गरम गरम जेवण आणलंय ते जेव बरं आधी . आपण उद्या बोलूया . " असं म्हणून त्यांनीच तिला भरवायला सुरवात केली .
तिचे जेवण झाल्यावर तिला औषध देऊन तिला झोपवून त्या बाहेर आल्या .
आल्यावर सगळे जेवायचे थांबलेत ते बघून आजी म्हणाली , " बाळांनो , चला आपण जेऊया . सगळयांनी शांत पणे जेवण करा . बाकीचे उद्या बघूया . "
जेवणं झाल्यावर मुलं आपापल्या खोलीत गेले खरे पण कोणालाही लवकर झोप येत नव्हती . सगळे विचार करू लागले .
आजी एकदा शरयू ला बघून बाहेर येऊन सोफ्यावर बसून विचार करू लागली . १५-२० मिनिटात अमोद आईच्या मांडीवर डोके ठेऊन आडवा पडला . मायेने आई मुलाच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. अमोदच्या डोळयातून अश्रू वाहू लागले .
बघूया पुढच्या भागात दोघे मिळून काय विचार करताय ते
क्रमश :
सौ . चित्रा अ.महाराव
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा