आजी आजोबांचा सहवास
आजी आजोबा आपल्यासाठी खूप काही असतात.
तें आपल्याला खूप जीव लावतात. आपले लाड करतात. आपल्याला साठी खाऊ आणतात. खुळणी आणतात. बाहेर जाताना विचारतात. तुम्हांला काय पाहिजे? आम्ही येताना घेऊन येऊ, ते म्हणतात.
चॉकलेट आणी खाऊ घेऊन येतात. सगळ्यांना देतात.
मी आजी आजोबा जवळ जास्त राहत होती. मला त्यांच्या सोबत खूप आवडायचे. घरात आजी आजोबा असल्यावर खूप छान वाटते, आजोबांना फिरायला खूप आवडायचे, आम्ही वर्षातून एकदा तरी बाहेर फिरायला जायचे. खूप मजा करायचे, आमची मोठी फॅमिली होती. दोन तीन दिवस आम्ही फिरायला जायचे. मजा करायचे, मस्ती करायचे, फुल मजा असायची.
मी आजोबांची खूप लाडकी होती. घरात आजी आजोबांना असल्यावर, घराला घर पण येते. घरात आनंद असतो. त्यांच्या सहवास खूप छान असतो. घरात शांतता असायची.
त्यांच्या कडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. ते आपल्याला नवीन नवीन विकवत राहतात.
आजोबा आमचा अभ्यास पण घेत होते. पाढे लवकर पाठ होत होते. आम्हांला गोष्टी सांगत होते. आजी सोबत शेतात जायला मजा येत होती. थोडं काम केल्यावर कंटाळा येत होता. आजी तें पूर्ण करायची. शेतात फिरायची. बोर, चिंचा, अजून जे फळ मिळेल, ते खात असायची. आजी खूप लाड करायची. माझी नात माझ्यासोबत शेतात आली. तिने काम केले. कमी काम केले तरी, खूप काम केले असे सांगत होती.
मी माहेरी गेल्यावर, त्यांना खूप छान वाटायचे, नातीने खाऊ आणला असेल, त्यांना काही पण खायला घेऊन गेल्यावर, त्यांना खूप आनंद होत होता.
आजी आजोबा आपल्या आयुष्यात हवे. तें आयुष्यातून गेल्यावर आपल्याला त्यांची आठवण जास्त येते.
बालपण त्यांच्या सहवासात घालवतो. मोठे झाल्यावर आपल्याला त्यांच्या साठी वेळ नसतो. माझी आठवण आल्यावर, मला भेटायला यायचे, वय झाले होते तरी, शेवटी जेव्हा आले, तेव्हा बोलून गेले होते, आता मला तुझ्या घरी येता येणार नाही, तसेच झाले ?
मला आजोबांना तर मला शेवटचे भेटता पण आले नव्हते.
आजी मला शेवटी बोलली होती, मला भेटायला येत नाही का? आजोबाच्या वेळेस मला जाता आले नाही म्हणून आजीला बघायला लगेच गेली.
आता दोघांची पण खूप आठवण येते. असे वाटते. ते आता हवे होते. असे वाटतं राहते.