Login

आले भरून नयन

विरहातील काळ कसा असतो ते सांगणारी विरह कविता

आले भरून नयन

आले भरून नयन
विरहात किती तुझ्या
कसं सांगू तुला, सख्या ?
किती व्यथा मनी माझ्या

भीती वाटतेय मला
नाही येणार तू असं
कसं सावरू स्वतःला ?
जेव्हा होईल रे तसं

आठवणी तुझ्या,प्रिया
मनी अशा जाग्या झाल्या
पुन्हा तुला आठवून
अश्रू त्या गाळू लागल्या

कधी हसू, कधी रडू
छबी डोळी साठवावे
तुझ्या सोबतचे क्षण
पुन्हा मला आठवावे

नयनांचे ही शिंपले
आले तुडुंब भरून
बरसूनी खारे मोती
गाली आले ओघळून

वाट तुझी मी पाहते
आस लावून रे मनी
पुन्हा येशील का, राजा?
करू ताज्या आठवणी

©️ जयश्री शिंदे