Login

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 12 ( अंतिम भाग )

समलैंगिक प्रेमकथा
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 12 ( अंतिम भाग )

मी लगेच प्रीतीकडे गेलो.

" काय झाले प्रीती ?" मी विचारले.

" दादा , आय एम प्रॅगनंट !" प्रीती म्हणाली.

ही गोड बातमी ऐकताच माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटले. माझी लाडकी बहीण आई होणार होती. मी मामा बनणार होतो. यश काका बनणार होता.

" खरच ? अग वेडी यात रडायचे काय ?" मी म्हणालो.

" पुष्करला हे बाळ नकोय. तो तयार नाही ही जबाबदारी घेण्यासाठी. मूलबाळ झाली की माणूस जबाबदाऱ्याच्या जाळ्यात अडकतो आणि मग त्याची वेगळी लाईफ अशी राहतच नाही. शिवाय बायकोला वेळ देता येणार नाही. त्याला वाटते की तो या स्टेजला आला नाही अजून की ही जबाबदारी पेलवू शकेल. " प्रीती रडत म्हणली.

" प्रीती , हे बाळ तुमच्या दोघांचे आहे. तर मला वाटते की त्याच्या इच्छेविरोधात जाऊन बाळ नको आणायला जगात. समजा तुला हे बाळ नको असते तर त्याने पण तुला समजून घेतले असते ना. मान्य स्त्री म्हणून तुला मातृत्वाची गरज आहे. हे स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. पण पुष्करच्या नजरेत पहा ना. जबरदस्ती होईल त्याच्यावर. समजा तो या बाळाशी पुन्हा नाते जोडुच शकला नाही तर ? " मी म्हणालो.

" पण दादा , त्याला वडील व्हायचे नाही तर माझा आई होण्याचा हक्क का हिरावून घेताय तुम्ही ?" प्रीती म्हणाली.

" यार , निवूदीला पण करियर घडवायचे होते. पण महेशजीजूच्या आईला नातू हवा होता म्हणून जबरदस्ती दिदीला आई व्हावे लागले. पुढे निवूदीने यशच्या मदतीने सुरू केला बिजनेस. पण हाच अन्याय आपण पुष्करसोबत करायचा का ?" मी विचारले.

" दादा आई होणे आणि वडील होण्यात फरक असतो. आईला जन्म द्यावा लागतो. मुलाला वाढवावे लागते. वडील काय करतात ? फक्त आर्थिक मदत आणि मुलांसोबत सेल्फी काढतात. डायपर तर आपणच बदलतो ना. " प्रीती म्हणाली.

" यार तसे नसते. वडील बनल्यावर पुरुषांमध्येपण बदल घडतो. त्यांच्याही खांद्यावर जबाबदारी पडते. बर जाऊदे. उद्या मी आणि यश पुष्करला एकदा समजवतो. तू हस बर आता. " मी प्रीतीला गुदगुल्या केल्या. ती तात्पुरती हसली. तिला तिच्या खोलीत पाठवून मी पाणी पिऊन माझ्या बेडरूममध्ये आलो. झोपलेला यश खूपच क्युट दिसत होता. मी त्याच्या कपाळावर किस केले. गमू आणि यशु दोघेही सेम पोजमध्ये झोपले होते. ते पाहून मला हसू आले.

दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती. आम्ही सर्वांनी सकाळी सकाळी गरम गरम पोह्याचा नाश्ता केला. यशने प्रेमाने गमूला दूध पाजवले. तेवढ्यात दारात पोलीस आले. सोबत एक दिसायला कृश , बारीक असा व्यक्ती पण होता. गमूकडे पाहून तो कुत्सितपणे हसला. त्याचे डोळे लालभडक होते.

" चरण , तू इथे सकाळी सकाळी ?" यशने विचारले.

" बाळाचे वडील सापडलेत. हे रंजन भट्ट. यांची बायको बाळाला जन्म देताच वारली. " चरण म्हणाला.

" तुम्ही बाळाला एकटे का सोडले ?" यशने रागात विचारले.

रंजन कुत्सितपणे हसला.

" साहेब , मी बाळाला मंदीरात ठेवून दूध आणायला गेलो. बाळाला थंडी लागेल असे वाटले. म्हणून मंदिरात ठेवले. पण मला अचानक चक्कर आली आणि सकाळीच उठलो. पोलीस स्टेशनमध्ये जाणार होतो पण हिंमत होत नव्हती. " रंजन म्हणाला.

" चेहऱ्यावरून तर हा दारुडा वाटतो मला. आम्ही गमुला असे कोणालाही नाही सोपवणार. " दादी रागात म्हणाली.

" आम्ही सर्व चौकशी आणि टेस्ट केल्या आहेत मॅडम. तुम्ही गमुला सांभाळले त्यासाठी थँक्स. पण आता गमुला परत करावे लागेल भाई. " चरण यशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

घरातल्या सर्वांचे डोळे पाणावले. रौनकने गमूसाठी घेतलेल्या खेळण्या रंजनला दिल्या.

" अंकल , या खेळण्या गमूला आमच्याकडून गिफ्ट !" रौनक पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला.

सर्वजण शेवटचे गमुला भेटले. शेवटी हृदयावर पाषाण ठेवून यशने गमूला रंजनकडे सुपूर्द केले. नकळतपणे त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.

" मुलीला सांभाळले त्याबद्दल थँक्स. पण जीव लावून कुणी कुणाचा बाप होत नाही. त्यासाठी रक्ताचीच नाती असावी लागतात. " रंजन कुत्सिपणे म्हणला.

इतके बोलून रंजन सर्वांसमक्ष गमूला घेऊन गेला. यश त्याच्या खोलीत गेला. पुष्कर त्याच्या मागेमागे गेला. मला ज्याची भीती होती तेच घडले होते. यश बेडवर बसून रडू लागला. पुष्कर येऊन त्याच्या बाजूला बसला. त्याने यशला मिठी मारली.

" पुष्कर , मला तो व्यक्ती खूप नीच वृत्तीचा वाटतोय. गमू सुरक्षित नाही त्याच्यापाशी. " यश म्हणाला.

" दादा , तू गमूशी अटॅच आहेस म्हणून अस बोलतोय. तो गरीब आहे पण बाप आहे शेवटी तो तिचा. तिच्यावर आपला काहीच हक्क नाही. " पुष्कर म्हणाला.

" बरोबर आहे. हक्क असण्यासाठी रक्ताचीच नाती असावी लागतात ना. हृदयाने जोडलेली नाती काही कामाची नाहीत ना. त्या रात्री त्या कुत्र्यांनी मलाच का खेचून आणले ? मलाच का गमू भेटली ? हे सर्व दैवी योगायोग तुम्हाला कळत नाहीत. असो. मला प्लिज एकटे सोडा. " यश म्हणाला.

पुष्कर अस्वस्थ होऊन खोलीतून बाहेर आला. मी बाहेरच उभा होतो.

" पुष्कर , जगात सर्वानाच हक्काचे मुले भेटत नाहीत. त्यांना पदोपदी संघर्ष करावा लागतो. तुमच्या ओंजळीत पालकत्वाचे भाग्य आहे ते लाथाडू नकोस. मी समजू शकतो की तू जबाबदाऱ्यांना घाबरतोय. पण विश्वास ठेव. जगातले कोणतेच पालक परफेक्ट नसतात. तर परफेक्ट बनत जातात. मुले जोडप्यामध्ये दुरावा निर्माण करत नाहीत तर ते नाते अजून परफेक्ट करतात. असो हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुला जबरदस्ती नाही करणार. पण अजूनही तुला वडील बनण्याचे टाळायचे असेल तर प्रीतीला प्रेमाने समजवून सांग. " मी म्हणालो.

" नाही. मी वडील बनणार. मला माझी चूक समजली. आज भाऊबीज आहे ना. मग मी आणि प्रीती आजच ती गुड न्यूज सांगणार सर्वाना. आधी प्रीतीला सांगतो. " पुष्कर पळत गेला.

मी किंचित हसलो. बेडरूममध्ये गेलो. दार लावले.

" पार्थ , मला एकटे सोड. " यश म्हणाला.

" एकटे सोडायला लग्न नाही केलं. " मी म्हणालो.

मी यशच्या जवळ गेलो. त्याला माझ्या मांडीवर टेकवले. त्याचे अश्रू पुसले. त्याच्या केसांवरून हात फिरवू लागलो.

" इकडची स्वारी , मी आणि रौनक असताना तुला अजून एक का हवी ? आम्ही कमी त्रास देतो का ?" मी म्हणालो.

" ती माझ्या टीममध्ये असती. " यश म्हणला.

" यशु , तू माझा चंद्र आहेस आणि चंद्र नेहमी हसरा असतो. गमुवर पहिला हक्क तिच्या वडिलांचा आहे. आपण रंजनला चांगली नोकरी देऊ. गमुला भेटायला जात जाऊ. तू असा का विचार करत नाहीस की इतक्या वर्षांनी घरच्यांना भेटतोय. कधीही डेन्मार्कहून बोलावणे येऊ शकते. शक्य तितक्या सर्व सुंदर आठवणी ओंजळीत भरू ना. तुझ्यामुळे बाकीचे पण दिवाळीत उदास झालेत. आपण इथे आनंद द्यायला आलोय ना यश. आता भाऊबिजेची ओवाळणी आहे. चल लवकर मूड ठिक कर बर !" मी म्हणालो.

इतके बोलून मी यशच्या गालावर ओठ टेकवले. यश उठला.

" तू रोमँटिक होत असशील तर मी रोज रुसायला तयार आहे. " यशने डोळा मारलो.

" मी रोज रोमँटिक होतो फक्त तू रुसू नको. " मी यशचे गाल ओढत म्हणालो.

" लक्ष्मीपूजनदिवशी एक सुंदर कविता वाचली होती सकाळी प्रतिलिपीवर. लेखिका श्रीसंध्या मॅडम यांनी लिहिली होती. खूप सुंदर होती. थांब वाचून दाखवतो.

दारी सजला मांडव
सारी सुख पदरी पडले
होईल निरवा निरव
माझ्या लाडक्या लेकीची

ब्रह्म देवाने बांधल्या
लग्नाच्या अनमोल गाठी
संस्कारांची शिदोरी
दिली लेकीच्या पाठी

थांबे ना डोळ्यातले पाणी
हळद लागता अंगाला
अश्रू अनावर होई
हुंदका फुट ला बापाला

आठवण अशी दाटते
विसरेन मी कदापि
बोबडे बोल कानी येई
जरी गलबला मंडपी

दिल्या घरी सुखी रहा
नांद सुखाने ग राणी
कन्यादान केले तुझे
काळजाचं झाल पाणी

पाठवण करतो लाडी
तुझी राणी जड पावलांनी
नको वळून तू पाहू
अश्रू अनावर झाले नयनी

~ श्रीसंध्या ✍️

म्हणून गमूत स्वतःची मुलगी पाहत होतो. असो. चल खाली सर्वजण वाट बघत असतील. " यश म्हणाला.

◆◆◆

त्या दिवशी भाऊबीज होता. भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्ट्रीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत "भाईदूज" म्हणतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात \"ओवाळणी\" देऊन बहिणीचा सत्कार करतो. या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे. आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते. असो. दुपारी चार वाजता भाऊबिजेची पूजा होती. सर्वजण मस्त तयार होऊन आले.

" मला तुम्ही ओवाळले तर मला आनंदच होईल. " यशचे वडील माझ्या आईला म्हणाले.

" हो. त्यात काय ? मला आनंदच होईल. पण मला गिफ्ट पण भारी पाहिजे बर. " माझी आई म्हणाली.

सर्वजण हसले.

आईने यशच्या वडिलांना ओवाळले. बाकीच्यांना प्रीती-निवेदितादीने ओवाळले. सर्वाना पैठणी साडी ओवाळणी म्हणून भेटली.

" गमू जर राहिली असती तर तिने मोठेपणी मला ओवाळले असते. " रौनक लहान स्वरात म्हणाला.

" खरच. या घरात मुलीच टिकत नाही. तीन पिढ्या झाले घरात एकही कन्यारत्न निपजले नाही. देवीचा शापच आहे घराला. यशचे आजोबा शेजारच्या मुलींना मुद्दाम अंगणात खेळायला बोलवायचे. अंगणात मुली खेळत्या रहाव्या म्हणून. कधी या अंगणात लक्ष्मी खेळेल देव जाणे. " दादी म्हणाली.

" दादी , तुझी इच्छा पूर्ण होऊ शकते. अटेन्शन एव्हरीवन. मी आणि प्रीती आईवडील बनणार आहोत. यशभाई मला मुलगी झाली तर तूच लाड कर बर तिचा. " पुष्कर म्हणला.

दादीने जोरात पाठीवर मारले.

" दादी , दुखतंय !" पुष्कर किंचाळला.

" इतकी गोड बातमी उशिरा का सांगितली ?" दादी आनंदाश्रू पुसत म्हणली.

सर्वजण हसले. या बातमीमुळे सर्वांच्या मुखावर आनंदाची लहर उमटली. आईने लगेच देवासमोर साखर ठेवली. यशने पुष्करला घट्ट मिठी मारली. रौनक तर नाचूच लागला. सर्वजण खुश झाले.

@ काही दिवसांनी

यश एका जुन्या मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. ट्रॅफिक लागल्यामुळे मित्र यायला खूप उशीर होता. अचानक त्याची नजर एका व्यक्तीवर पडली. तो व्यक्ती ओळखीचा वाटला. तो व्यक्ती रंजनच होता.

" रंजन इथे ?" यश स्वतःशीच म्हणाला.

यश रंजनकडे गेला. रंजनच्या बॅगमध्ये पाचशेच्या नोटांचे कितीतरी बंडल होते. तो टेबलावर पैसे मोजत होता. त्याच्या अंगातून दारूचा वास येत होता.

" गमू कुठे आहे ?" यशने रंजनला विचारले.

" तुला काय करायचे ? तू तुझे बघ ना. " रंजन नशेत म्हणाला.

" एवढे पैसे कुठून आले ? काय केले तू गमूसोबत ?" यशने रागाच्या भरात रंजनला दोनतीन थोबाडीत मारले.

" आरे विकले तुझ्या गमुला. माझी मुलगी होती. जन्म होताच आईला गिळली. विकले तिला मी. काय करशील ?" रंजन नशेत म्हणाला.

यशचे डोळे रागाने लाल झाले. त्याने एक मुक्का रंजनला मारला त्याने रंजन खाली आपटला आणि त्याच्या ओठांतून रक्त वाहू लागले. तो बेशुद्ध पडला. मॅनेजरने लगेच पोलिसांना बोलावले. पोलिसांनी रंजनला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. रंजनने एका टोळीला गमुला विकले होते. पोलिसांनी तत्परतेने काम केले. पूर्ण टोळी पकडली गेली. सुदैवाने सर्व मुली उदयपूरमध्येच होत्या. कितीतरी मुलींचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले. दुर्दैवाने बऱ्याच मुलींना त्यांच्या घरच्यांनी पुन्हा स्वीकारले नाही. यशने एनजीओमार्फत सर्व मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी केली. रंजनचे फारसे कुणी नातेवाईक नव्हते. त्यामुळे यशने गमुला कायदेशीररित्या दत्तक घेतले. आज गमुचे बारसे होते. पूर्ण बंगला राजवाड्यासारखा सजला होता. पाळणा हलवल्यावर आता नाव सुचवण्याची वेळ होती.

" आधी मी सुचवतो. कॅटरिना. " पुष्कर म्हणाला.

" नको ती मांजरीण. तेजस्वी ठेवू. " प्रीती म्हणाली.

" का ? शमिता का नाही. शमिता ठेवू. " मी म्हणालो.

" नको. शम्मोराणी म्हणून चिडवतील. मधुबाला ठेवू." यशचे वडील म्हणाले.

" आजोबा , तुमच्या जमान्याचे नाव नको. नेहा ठेवू. " रौनक म्हणाला.

" तुम्ही सर्व पागल झालात बिगबॉस खेळून सॉरी बघून. मी काय म्हणते. ही लक्ष्मीपूजनला भेटली तर हिचे नाव लक्ष्मी ठेवू. " दादी चष्मा वर करत म्हणाली.

" आपण यशला विचारू ना. सर्वात जास्त तो प्रेम करतो गमूवर. " निवेदितादी म्हणाली.

" हो जावईबाबू तुम्ही बोला. " आई म्हणाली.

" आय एम शुअर यशभैयाने क्युट नाव शोधले असेल आपल्या गमूसाठी. " अद्वैत म्हणाला.

" लवकर बोल यश. आता राहवत नाही. " महेशजीजू म्हणले.

यश गमूकडे पाहू लागला आणि गमू खुदकन हसली.

" माझ्या गमुचे , माझ्या परीचे , माझ्या प्रिन्सेसचे नाव असेल