Login

आली ती परतुनी [ भाग -२ ]

प्रेम आयुष्यात कधी ही येऊ शकतं.

भाग - २

( पूर्वार्ध :- तिचा मॅसेज पाहून मोहितच्या डोळ्यात पाणी... )

मोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहताना बघून शोभा खूप अस्वस्थ झाली .

तिने शेवटी मोहित ला विचारले, " काय झालं? कुणाचा आहे मॅसेज? काय आहे त्या मॅसेजमध्ये? "

" सॉरी....
मोहित मी तुझ्या घरी येऊ शकत नाही." असा त्या मॅसेजचा मजकूर मोहित ने शोभाला वाचून दाखवला . "

तिचा मॅसेज पाहून कदाचित," आपली तिच्याशी भेट होणार नाही या कल्पनेने मोहितला अश्रू अनावर झाले असतील.

" तिला वेळ भेटला की ती नक्की येईल......." मोहितची समजूत काढून शोभा आत गेली.

पण मोहितच मन काही थाऱ्यावर नव्हतं. पुन्हा एकदा त्याने त्या मॅसेज ला पाहिलं.
अन् भरलेल्या डोळ्यांना मोकळं केलं.

मोहित त्याच्या बेडरूममध्ये जाणार तेवढयात दरवाज्याची बेल वाजली.

दरवाजा उघडण्यासाठी मोहित वळून पुन्हा दाराच्या दिशेला येऊ लागला.

त्याने दरवाजा उघडताच मोहिते हृदय बंद पडले, कारण समोर ती उभी होती अगदी आधीसारख्या गोड हसूसह.....

क्षणभर तिला पाहून त्याचे भान राहिलेच नाही जाग्यावर.... 

" हरणीसारखे डोळे , टोकदार नाक आणि होठ जणू गुलाबाची पाकळीच......."

तिच्या सौदर्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच. नेहमी शब्द कमी पडायचे तिचं कौतुक करण्यासाठी.....

" कोण आहे?", शोभा, आतून मोहित ला आवाज देत....

बराचा वेळ झाला शोभापण काहीच उत्तर आले नाही.

शेवटी.... शोभा च बाहेर आली . तिने मोहित च्या खांदयावर हात ठेवला अन् मोहित चे भान परतले .

तिने मोहितला विचारलं , " कोण आलंय.....? "

" निशा....... ", मोहीत तोंडून तिचं नाव आपसूक निघून गेलं.

अन् तो तिच्याकडे पहातच राहिला आणि ती ही त्याच्या डोळ्यात हरवून गेली.

पुढच्याच क्षणी मोहितला खांद्यावर शोभाचा हात जाणवला.
तसे
डोळ्यातले प्रेम अन् पाणी लपवत मोहित तिच्याकडे बघून हसू लागला.

मोहीतच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला बघून निशा त्याच्यासाठी काय आहे याची जाणीव तिला होत होती. त्याचा आनंद बघून शोभा ही हसली.

निशानेच पुढाकार घेऊन स्वतः ची ओळख करून दिली. 
" नमस्कार,
मी निशा तुझ्या नवऱ्याची खूप चांगली मैत्रीण. अगदी कॉलेजच्या दिवसांची...... "

शोभा ने ही हसत मुखाने तिचं स्वागत केलं .

अन् हसत म्हणाली ,
"अखेर आज तुझं नाव कळालं नाहीतर मोहित फक्त " ती " असच सांगायचा .

"पण मग तो मॅसेज नाही येणार म्हणून.... " शोभा......

" सॉरी......
मोहितची थोडीशी गम्मत करत होते.", निशा, कानाला पकडून हात लावून.....

" काय?", मोहित, आश्चर्याने निशाला बघत गाल फुगवून....

मोहितच्या अश्या रुसण्याला बघून दोघी खळखळून हसू लागल्या.
त्या दोघींच्या हसण्याने वातावरण ही खेळकर झालं होतं.
पण मोहितला अजुनही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .

" आत येऊ ना?",निशा, खोडकर शब्दात मोहित ला बघून....

" ये ना.....
तुम्ही दोघं गप्पा मारत बसा. मी आलेच..", म्हणत
शोभा जेवणाची तयारी करण्यासाठी आत गेली . 

दोघेही समोरासमोर होते. पण कुणी आणि कुठून बोलण्याची सुरवात करायची हाच प्रश्न त्या दोघांसमोर होता.

अन् अखेर मोहित ने बोलायला सुरुवात केली.

" कुठे होती तु आजवर? एक ही फोन नाही का मॅसेज नाही?", मोहित, थोडं ऑकवर्ड होत.....

मोहितचं ऑकवर्ड निशाला कळत होतं कारण ती ही थोड्या प्रमाणात त्या अवस्थेत होती.

"अन् आज अचानक तु एकदा भेटशील का?असा मॅसेज, सगळं ठीक आहे ना?", मोहित, काळजीच्या सुरात.....

मोहितच्या प्रश्नाचं उत्तर कदाचित निशाकडे नव्हतं म्हणूनच ती गप्प होती.
ती जरी काही बोलली नसली तरी तिच्या झुकलेल्या पापण्यांनी जे सांगायचं होतं ते सांगितलं होतं.

तिच्या मनात काहीतरी सुरू होतं जे मोहितला कळू द्यायचं नव्हतं.

तो तिला पुन्हा विचारणार तेवढ्यात शोभाने जेवण्यासाठी हाक मारली.

पुन्हा दोघांनी हसरा चेहरा ठेवून विषय टाळला. अन् डायनिंग टेबलवर जाऊन बसले.

शोभा एक एक करून पदार्थ सर्व्ह करत होती.

निशाचा उतरलेला चेहरा मोहितने हेरला होता. ती अजूनही विचारात गुंग होती.

" निशा ss
मोहित कॉलेज मध्ये कसा होता? म्हणजे शांत होता की मस्तीखोर....", शोभा, मोहितच्या शेजारी बसून....

शोभाच्या आवाजाने निशा तिच्या विचारातून बाहेर आली. पण, नक्की शोभा काय म्हणाली हे आठवत नव्हतं.

" सॉरी,
काय म्हणालीस? माझं लक्ष्य नव्हतं." निशा....

" मोहित बद्दल सांग ना.", शोभा, मोहितला बघून हसून...

" काय सांगू त्याच्या बद्दल? शब्द कमी पडतील पण त्याच्याबद्दल सांगायचं म्हंटल तर....", निशा, मोहितला एकटक बघत.....

त्या क्षणी दोघं एकमेकांच्या नजरेत कैद होत जुन्या आठवणीत.....

" अरे व्वा! ", शोभा.....

पुन्हा शोभाच्या आवाजाने दोघांना भानावर आणलं.

" शोभा sas
एकदा काय झालं? सांगू का मोहित?", निशा, खोडकर शब्दात....

" हो.... हो... सांग. मी घाबरत नाही कुणाला?", मोहित, कॉलर हवेत उडवीत.....

" हो ... हो...
सांग ना, मला आवडेल मोहितच्या कॉलेजचा किस्सा ऐैकायला.
आणि खास करून जर कुण्या स्पेशल मैत्रिणीचा.... "  शोभा हसत.....

डोळ्यातलं पाणी चेहऱ्यावरच्या हसू ने लपवीत निशाने
कॉलेजच्या मित्र मैत्रिणींचा किस्सा सांगायला सुरुवात केली .

जेवणाबरोबर  गप्पांचा ही बेत  चांगलाच रंगला होता . रात्र ही खूप झाली होती .

" शोभा तुझ्याशी भेटून खूप छान वाटलं . विशेष करून मी आज तुला भेटायला आले होते.

कारण मला बघायचं होतं. माझ्या जवळच्या मित्राची काळजी घेणारं कुणी आहे का? म्हणजे मी जायला मोकळी..... "निशा, तोंडातल्या तोंडात....

" काय?", मोहित अन् शोभा, दोघं एकत्र.....

ती काय बोलत होती त्या दोघांना काही कळलेच नव्हते.

" उशीर होतोय मला घरी जायला , त्या बद्दल बोलतेय... " निशा, गडबडीत बोलून गेली.

निशाचं उत्तर ऐकून दोघं ही गोंधळून गेले अन् त्यांच्या गोंधळ लेल्या चेहऱ्याला पाहून निशा हलकीशी हसू लागली.

अन् एकाएकी
ती तडक उठली अन् मी जाते असं सांगत तिने त्या दोघांकडे पाठ फिरवली .

" रात्र खूप झाली आहे, आज तू इथेच का थांबत नाहीस? ", शोभा, निशाच्या पाठोपाठ येत....

अजूनही निशा थांबली नव्हती.

शोभा ने खूप प्रयत्न केला तिला समजवण्याचा की आता खूप रात्र झाली आहे . उद्या सकाळी जा.... पण तिने एक ही ऐैकले नाही .

" मोहित, तू समजव ना...", निशाच्या मागे जाणारी शोभा मोहितला वळून बघत...

"निश sss" मोहित...

तशी, निशा थांबली.

"मला शक्य नाही." निशा, हळूच हलकेसे मान तिरकसं करून....

ती अचानक अशी का वागायला लागली , याचा अंदाज त्या दोघांना येत नव्हता .

निशा दाराच्या दिशेने पाऊले टाकत होती अन् दाराच्या बाहेर जाताच ती थांबली.
तिने वळून पाहिले," तिच्या डोळ्यात अश्रू जास्त होते की प्रेम हेच सांगणे कठीण....."

ती त्यांना बघून हसली अन् बायच्या अविर्भावाने तिने हलकेसे हात हलविले.
पण यावेळी तिच्या हसण्यात काहीतरी लपलं होतं, पण काय?

( क्रमशः )