Login

आली ती परतुनी ( भाग - ३ )

प्रेम आयुष्यात कधी ही येऊ शकतं.
भाग - ३

( पूर्वाध - निशा , मोहितच्या घरी.... )

दाराबाहेर पोहचताच तिने वळून पाहिले .
ती त्या दोघांना बघून हलकेच हसली, पण यावेळी तिच्या हसण्यात काहीतरी लपलं होतं.

पण काय?
हे काही मोहितला कळत नव्हतं पण जाणवत होतं. म्हणूनच, तीच असं विचित्र वागणं, त्याला विचार करण्यास भाग पाडत होतं .
मोहित काही विचारण्याआधीच निशा तिथून निघून गेली होती .

शोभाला ही तीच असं वागणं जरा वेगळच वाटलं. पण जास्त विचार न करता ती आत निघून गेली.

या सगळ्यात कधी सकाळ झाली काही कळलचं नाही .

मोहित सोफ्यावर डोळे बंद करून बसला होता . निशा आल्यापासून  जाईपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जात होत्या .

अचानक तो खूप अस्वस्थ झाला . त्याने डोळे उघडले अन् घडाळ्याकडे पाहत म्हणाला , " शोभाsssss
आवर पटकन, मला ऑफिस ला जायला उशीर होतोय ."

" हो ... हो... झालं झालं.... दोन मिनिट... " आतून आवाज आला.

इकडे मोहित हि ऑफिस ला जाण्याची तयारी करू लागला .
पण सारखा निशाचाच विचार त्याच्या मनात येत होता. पण त्याने ते शोभाला जाणवू दिलं नाही .

मोहित नाश्ता करून ऑफिसला जायला निघाला . अन् शोभा हि तिच्या कामात रमली.

ऑफिसला पोहचणार तेवढ्यात वाटेत त्याचा खूप जुना कॉलेजचा मित्र दिसला.
मोहित ने त्याला हाक मारली , " ए, संजयss ss तो हि हाक ऐकून थांबला .

"अरे मित्राsss इकडे कुठे?", मोहित.....

"म्हणजे तुला माहीत नाही?", संजय.....

"अरे काय माहित नाही मला, नीट सांगशील का?", मोहित, प्रश्नानर्थी नजरेने बघत.....

"कसं सांगू तुला?", संजय, जरा घाबरतच म्हणाला .

"कसं सांगायचं आहे , तसं सांग . पण सांग एकदाच",मोहित चिडून.....

"निशा..... ", संजय....

"काय ? तीच....." मोहित, काळजीच्या सुरात.....

"अरे आपली निशा ....", संजय, अडखळत.....

"काय झालं निशाला?", मोहित, घाबरून

आता तर, मोहितचा जीव ही घाबरून गेला होता.

"ती आपल्याला सोडून गेली....", संजय, जड शब्दात....

" काय? हे कसं शक्य आहे.?"मोहित,

"काल संध्याकाळी , ६च्या आसपास अपघातात....", म्हणत संजय रडू लागला.

हे ऐकून मोहितच्या पायाखाली जमीन अचानक सरकून गेल्यासारखं झालं.

" हे कसं शक्य आहे ? अरे ती माझ्या घरी आली होती जेवायला . आज पहाटेच ती घरून निघाली " , असं म्हणत तो संजय वर चिडला.

क्षणभरासाठी तो सुन्न झाला . त्याचा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता .
आपल्याच समोर कुणीतरी आपलं आयुष्य हिसकावून नेतंय असं त्याला त्या क्षणी वाटलं असावं .

त्याच्या डोळ्यातून आपसूक पाणी गळत होते . एक ही शब्द न बोलता मोहित तिथून निघून गेला .
************************

" ठक ssss ठक sssss" दरवाज्यावर थाप पडली.

तशी, शोभा लगेच दार उघडायला बाहेर आली. तिने दार उघडलं तर काय, दाराबाहेर मोहित उभा होता.

" आज लवकर?
ऑफिस ला जाण्याचा मूड नाही का.", शोभा, दाराबाहेर मोहीतला बघून हसून..,...

काहीच न बोलता मोहित विचार करत आत येऊन सोफ्यावर बसला.
निशा जिथे जिथे बसली होती . त्या त्या जागेला एकटक बघत तो तिच्या आठवणी आठवत होता.

त्याच सोबत आठवले संजयचे ते शब्द अन् त्याचा तोल जाणार तोच शोभाने त्याला सावरलं.

अन् दुसऱ्या क्षणाला त्याला अश्रू अनावर झाले. तो ढसाढसा रडू लागला.

या आधी शोभाने त्याला असं कधीच पाहिलं नव्हतं . त्यामुळे ती हि खूप घाबरली .
हिम्मत एकवटून तिने मोहितला विचारलं , " काय झालं आहे."

मोहित काहीच बोलायला तयार नव्हता . तिने पुन्हा विचारलं, " काय झालं आहे मोहित?"

"अगं निशा.....
आपल्याला सोडून कायमची निघुन गेली. काल संध्याकाळी ६ च्या सुमारे अपघातात....." मोहित,अन् पुन्हा त्याला अश्रू अनावर झाले .

" काय?
हे कसं शक्य आहे ती आता तर पहाटे आपल्या कडून गेली ना...." शोभाला हि विश्वास बसत नव्हता.

तिच्या हि डोळ्यात पाणी रहावत नव्हते . एकाएकी त्या घरात भयान शांतता पसरली .
अन् एकाएकी शोभा, " म्हणजे काल आपल्या घरी आलेली निशा नसून तिचा......"