Login

आली ती परतुनी ( भाग - ४ ) शेवट

आयुष्यात प्रेम कधी ही येऊ शकतं.


भाग - ४

( अनपेक्षित वळण......... )

म्हणजे काल आपल्या घरी आलेली निशा नसून तिचं.......
शोभा नकळत बोलून गेली .

" कॉलेजमध्ये आमचं एकमेकांवर खूप प्रेम होत . आम्ही लग्न ही करणार होतो."मोहित, जुन्या आठवणीत रमत....

एके दिवशी आम्ही लग्नाची सगळी तयारी ही केली होती . मी निशाची वाट ही बघत होतो . सकाळ ची संध्याकाळ झाली पण ती नाही आली........

त्या दिवसानंतर तिची मी खूप वाट पाहिली . तिचा शोध घेण्याचा देखील खूप प्रयत्न केला. पण हाती काहीच लागलं नाही .

निशा विना आयुष्य सुकलेल्या फुलांसारखं झालं होतं . काही
दिवसांनी माझ्या आयुष्यात तु आलीस.
तुझ्या आपुलकीने, प्रेमाने केव्हा तु मला आपलसं करून घेतलं, काही कळलंच नाही.

आणि तुझ्या सोबत माझ्या नवीन आयुष्याला सुरवात ही  झाली .
सगळं सुरळीत चालू होतं. अन् अचानक एक दिवस " तिचा मॅसेज..... "

पुढे तर तुला सगळ माहीतच आहे . हे सगळं आधी न सांगण्याच कारण म्हणजे .....

तेवढ्यात,
"थांब.....", शोभा, मोहितला थांबवत....

" माझं तुझ्या वर प्रेम तर आहेच पण त्या पेक्षा जास्त विश्वास आहे . त्यामुळे मला कारण नाही जाणून घ्यायचं.....", शोभा, मोहितचा हात हाती घेत....

( दरवाज्याची बेल वाजली...... )

शोभा ने दरवाजा उघडला अन् बाहेर पोलीस आले होते . पोलिसांना पाहून क्षणभर मोहित गोंधळला.

शोभा ने पोलिसांना आत बोलावलं.

मोहित काही विचारण्याआधीच पोलिसांनी विचारलं," तुम्हीच मोहित का..... ?

नमस्कार , मी इन्स्पेक्टर जाधव .

"नमस्ते इन्स्पेक्टर , मी मोहित आणि ही शोभा माझी बायको" मोहित, ओळख करून देत....

"तुम्ही इथे काही काम होतं का.....?"मोहित....

"हो,
मी निशा मर्डर केसचा तपास करत होतो." इन्स्पेक्टर जाधव...

"मर्डर ..... ", मोहित, आश्चर्याने शोभा कडे बघत.... .

त्या केसची चौकशी करत असताना निशाच्या मला काही वस्तू सापडल्या होत्या, ज्यांचा तुमच्याशी थेट संबंध आहे.

त्याचं वस्तू द्यायला आलो होतो .
असं सांगत पोलिसांनी मोहितच्या हातात एक बॅग दिली ज्यात निशाच्या काही वस्तू होत्या .

आणि सात वर्षाच्या तपासा नंतर निशाचा खुनी आज आम्हाला सापडला आहे .

" इन्स्पेक्टर साहेब,
कोण आहे तो खुनी? मी येऊ शकतो का पोलिस चौकीत ..?"मोहित, पोलिसांना विचारत....

इन्स्पेक्टर जाधव यांनी ही होकारात मान हलवली. थोड्या वेळाने इन्स्पेक्टर जाधव आणि मोहित पोलिस चौकीत पोहचले .

निशाच्या आठवणीत अन् खुनी कोण असेल या विचार करतच मोहित खुनी असलेल्या खोलीत गेला .

खुनीला पाहून मोहितचा स्वतः वर विश्वास बसत नव्हता . कारण खुनी अजून कोणी नसून मोहितचा कॉलेजचा मित्र संजय होता.
संजयला पाहून क्षणभर त्याला काहीच कळले नाही. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. मोहित संजयच्या अंगावर धावून गेला .

कसा बसा पोलिसांनी मोहितला संजय पासून दुर केलं . आधीच निशाच दुःख आणि वरून आपल्याच मित्राने खून....
या सगळ्या गोष्टींमुळे मोहित खूप खचला होता .

इन्स्पेक्टर जाधव यांनी मोहितला एका खुर्चीवर बसवलं . अन् मोहितच्या समोरच संजयची चौकशी करण्यास सुरवात केली .

सुरवातीला तर संजय काही एक सांगायला तयार नव्हता . पण जेव्हा पोलिसांचे फटके बसले तेव्हा संजय पोपटासारखा बोलायला लागला .

संजय मोहितच्या जवळ येऊन उभा राहिला .

" हो... हो... मीच खून केलाय निशाचा .... ते ही तुझ्यामुळे.",संजय, मोहितच्या नजरेला नजर देत.....

"जसं तुझं प्रेम होतं निशावर . तसचं माझं ही खूप प्रेम होतं तिच्यावर....
पण तू माझ्या पासून माझ्या निशाला दुर केलंस.", संजय,क्रूर आवाजात.....

"अरे,
पण निशा माझ्यावर प्रेम करत होती . आम्ही लग्न करणार होतो ......" मोहित, तरमळत सांगत....

मोहित बोलत असतानाच मध्येच संजय," म्हणूनच मी निशा ला लग्नासाठी तुझ्यापर्यंत पोहचू नाही दिलं .
तिला वाटेतच भेटून यम सदनी पाठवलं."संजय, असूरी हसून हे सगळ सांगत होता .

"मग येवढ्या वर्षाने " तो मॅसेज..... ", मोहित, स्वतः शीच....

"तो मॅसेज
मीच पाठवला होता निशाच्या फोन वरून ....
तु माझ्यापासून माझ्या निशाला दुर केलंस . तुला कसा सोडेन....." संजय चिरकाळून म्हणाला .

"ते तर तुला शोधण्यात एवढे वर्ष लागले , नाहीतर तुला केव्हाच संपवलं असतं .
पोलिस मागे होते म्हणून त्या दिवशी तुझ्या घरी नाही जमले यायला .
त्या दिवशीचा डाव माझा फेल झाला . म्हणून मुद्दाम दुसऱ्या दिवशी तुला रस्त्यावर भेटून , तुला निशा बद्दल खोटं सांगितलं . संधी मिळताच तुझा ही गेम करणार होतो . पण त्या दिवशी ही डाव हुकला....

तिसरी संधी मिळण्याआधीच पोलिसांनी मला पकडलं . अन् तू पुन्हा वाचलास.....", संजय, ओरडत मोहितच्या अंगावर येत....
खिश्यात लपवलेल्या हत्याराने मोहितच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला . पण संजयचा हा ही डाव पोलिसांनी हाणून पाडला.

" तुम्ही जा घरी. तुम्हाला आरामची गरज आहे.", इन्स्पेक्टर जाधव,.,.... घरी जाऊन आराम करण्यास सांगितले .

इन्स्पेक्टर जाधव बोलत होते पण मोहीतच लक्ष्य मात्र संजयवर होतं.

" तुम्ही नका काळजी करू. त्याला तर आम्ही बघू." इन्स्पेक्टर जाधव.....
*********************

" ठक्  ठक्  ठक्  ठक् " दारावर थाप....

शोभा ने दरवाजा उघडला, समोर हताश झालेला मोहित उभा होता.

मोहित च्या चेहऱ्यावरून शोभा ने त्याच मन ओळखून घेतलं होतं.
मोहित आत येऊन सोफ्यावर बसला , निशा बसलेल्या दिशेने बघत.....

शोभा ने मोहितला पाणी आणून दिलं . आणि ती मोहितच्या शेजारी बसली .

"काय झालं ..? कोण आहे खुनी ...?" शोभा, त्याचा हात हाती घेऊन....

काहीच न बोलता....
मोहित एका लहान मुलाप्रमाणे शोभाच्या मांडीवर डोकं ठेवून फक्त आश्रू गाळत होता .
अन् कधी त्याला झोप लागली त्याला ही कळले नाही.

या पुढे शोभाला एक ही शब्द बोलवणासे झाले . ती फक्त मोहितच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला सांत्वना देत ती ही झोपी गेली .
**********************

मध्यरात्री.....

अचानक  मोहितला एका आवाजाने जाग आली . मोहित डोळे उघडून पाहता समोर त्याला धुंधकसं काही दिसू लागलं.

डोळे चोळतच तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. 

त्या काळोख अंधारात ही चांदण्यांचा उजेड पसरला होता. अन् त्या चांदण्यांकडे बघत खिडकीत उभी असलेली एक मुलगी...,

" निशा sssss ", मोहित, हाक मारत त्या मुलीच्या दिशेने जात.....

हाक ऐकता तिने वळून पाहिले.

तर समोर निशा उभी होती. डोळ्यात सागरा एवढं प्रेम घेऊन ती त्याच्याकडे पाहत होती.
तो तिच्या जवळ गेला. थोडा वेळ तर भान हरवल्यासारखं  तो  तीला बघतच होता.

" मी आलेय मोहित......
तुझ्यासोबत एक क्षण पुन्हा जगायला मी आलेय. माफ कर मला मी तेव्हा येऊ शकले नाही. म्हणूनच, शेवटचं तुला बघायला आले आहे.

तुझ्या प्रेमाने अन् काळजीने मला तुझ्यापर्यंत आणलं होतं. पण आता
मी आता निवांत जाऊ शकते कारण तुझ्यावर प्रेम अन् तुझी काळजी घ्यायला आता तुझ्या आयुष्यात कुणीतरी आहे.

अन् मी ही राहीन च तुझ्या अवतीभवती कश्या ना कश्या रूपात फक्त तु नेहमी आनंदात रहा. आय लव्ह यू मोहित, आय लव्ह यू ......", म्हणता म्हणता ती मंद प्रकाशात हळू हळू दिसेनाशी झाली.

" निशा...."
प्लिज जाऊ नकोस. मला गरज आहे तुझी आहे." मोहित, तोंडातल्या तोंडात....

" मला गरज आहे तुझी, जाऊ नकोस.", मोहीत, दोन पाऊल पुढे सरसावून तिला अडवण्याचा प्रयत्न करत....

"निशाsssssss", मोहित, किंचाळत.,..,..

" मोहित ssss मोहित ssssss ", शोभा, उठवण्याचा प्रयत्न करत.....

हाक देऊन ही मोहितला जाग येत नव्हती, म्हणूनच शोभा आता मोहितच्या गालावर हळू मारू लागली. जेणेकरून त्याला जाग येईल.

अन् झाले ही तसेच.
हळू हळू मोहितला जाग येऊ लागली. तो भानावर आला समोर शोभा होती.

" काय झालं? वाईट स्वप्न पडलं का?", शोभा, मोहित च्या कपाळावरचा घाम पुसत....

त्याला कळून चुकले त्याने जे काही पाहिलं ते स्वप्न होतं अन् जर काही सत्य असेल तर ते शोभाच्या रूपाने त्याच्यासमोर होते.