Login

आम्ही चालवू हा पुढे वारसा कवितेचा अर्थ मराठी meaning in marathi >>

आम्ही चालवू हा पुढे वारसा कवितेचा अर्थ मराठी meaning in marathi >>
आम्ही चालवू हा पुढे वारसा कवितेचा अर्थ मराठी meaning in marathi >>

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग

जगदीश खेबूडकर लिखित हे एक प्रार्थना गीत आहे आधी आपण ह्या गाण्याचे बोल पाहू या आणि त्यानंतर खाली प्रत्येक ओळीचा अर्थ.


गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा!

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!


शिकू धीरता, शूरता, बीरता
धरू थोर विधेसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा।

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा!

मराठी शब्द English to Marathi || English to Marathi words || Marathi to marathi || Marathi word
मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग find word meaning in Marathi with irablogging


प्रस्तुत कवितेमध्ये लेखक गुरु आणि शिष्य परंपरेतील गुरुची महती वर्णत आहे. पहिल्या मध्ये जिथे कवी म्हणतात.

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

याद्वारे ते संबोधन करतात की गुरूकडून मिळालेला ज्ञानरूपी वारसा शिष्य विद्यार्थी पुढे चालवणार आहेत.
शिक्षा घेत असताना शिकलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी संस्काराने परंपरा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे कार्य हाती घेण्याचा आश्वासन विद्यार्थी करतो आहे.

पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा!

दुसऱ्या ओळींमध्ये कवी म्हणतात गुरुंना की तुम्हीच आमचे पिता म्हणजे वडील बंधू म्हणजे भाऊ स्नेही म्हणजे मित्र आणि माऊली म्हणजे आई सोबतच तुम्ही कल्पवृक्षाप्रमाणे आहात ज्यांच्या सावलीच्या तळाशी आम्ही. आणि शेवटच्या ओळीत सर्वोच्च उपमा देतात की तुम्ही सूर्य आहात आणि आम्हाला कवडसा म्हणजेच सावली देता.

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!

तुमच्या सानिध्यात आलो तेव्हा आम्ही बीज होतो आणि आज वेलीवरची फुले झालो आहोत.
आता हा ज्ञानरूपी वारसा असाच कल्पवृक्षाप्रमाणे मोठा होवो आणि या फळ लागो असे उद्बोधन शिष्य करत आहे.

शिकू धीरता, शूरता, बीरता
धरू थोर विधेसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा।

गुरु कडून आम्ही सगळे धीर धरायला शिकवू शूरता आणि वीरपणाही शिकू पण त्यासोबतच नम्रता हा गुण अंगी बाळगू. असा ध्यास मनी लागावा अशी प्रार्थना या ओळींमधून विद्यार्थी करतो.

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा!


इथे शासन या शब्दाचा अर्थ दंड असा दिला आहे. म्हणजेच जे कोणी दृष्ट असतील त्यांना आम्ही दंडित करू आणि जे गुणी सज्जन आहेत त्यांचे पालन म्हणजेच रक्षण करू हाच ध्यास मनी आहे.

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा!

ह्या शेवटच्या ओळींमध्ये शिष्य गुरूला म्हणतो की तुम्ही फार पुण्यवंत आणि भले माणसं आहात, तुम्ही दिलेली त्याग सेवा‌ तुमची कीर्ती दाही दिशांना होईल.

पुन्हा एकदा हा ज्ञानरूपी वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे वचन शिष्य आपल्या गुरूला देत आहे.

शालेय आयुष्यातील अविभाज्य भाग असणारी प्रार्थना खरंच फारच अप्रतिम आहे.


This article will help you to find :-

Definition of   आम्ही चालवू हा पुढे वारसा
Translation of आम्ही चालवू हा पुढे वारसा Meaning of  आम्ही चालवू हा पुढे वारसा
Translation of   आम्ही चालवू हा पुढे वारसा
English to marathi of   आम्ही चालवू हा पुढे वारसाMarathi to english of   आम्ही चालवू हा पुढे वारसा
Translate English to Marathi, English to Marathi words.

शब्दाचा मराठी अनुवाद || मराठी अर्थ Meaning of word in Marathi || Marathi anuvad ,Marathi story to explain Marathi word meaning by irablogging || मराठी शब्द /शब्दकोश इराब्लाॅगिंग


0