आम्ही सातजणी
©®आर्या पाटील
रोजच्या धकाधकीच्या जीवनात गुंतलेलो असतांना ईरा चॅम्पियन्स ट्रॉफीची घोषणा झाली आणि पुन्हा एकदा लेखनीच्या उत्सवाला सुरवात झाली. गेल्या चार वर्षांपासून न चुकता साजरा होणारा हा साहित्याचा सोहळा मानसिक आनंदाची अगणित कवाडं उघडी करून देतो. मर्यादित वेळेत स्पर्धा पूर्ण होते पण स्पर्धेदरम्यानच्या आठवणी नव्या चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत मनाच्या गाभाऱ्यात कायमच दरवळत राहतात.
या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही स्पर्धा माझ्यासाठी विशेष होती. खरं तर शाळेत कामाचा व्याप वाढल्याने स्पर्धेत भाग घ्यावा की न घ्यावा इथून सुरु झालेला माझा प्रवास कॅप्टनच्या पदापर्यंत पोहचला आणि नवनिर्मितीच्या या प्रवासात मग माझीच मला नव्याने ओळख झाली. या प्रवासाचे शिलेदार असलेले माझे टीम मेंबर्स माझी खरी ताकद ठरले. कॅप्टन पद म्हटल्यावर दडपण आलेच पण माझ्या टीम मेंबर्स मुळे हा अनोखा प्रवास अगदी सुखमय झाला. एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्ही सातजणी एकमेकींच्या मनातलं कळेपर्यंत ओळखीच्या झालो. आमचं नातं म्हणजे साहित्याच्या विश्वात जुळलेलं ऋणानुबंध जणू. आमच्या या गोड प्रवासाचा हा थोडक्यात लेखाजोखा.
खरं तर सुरवातीला ग्रूपमध्ये आठ मेंबर्स होते. काही वैयक्तिक कारणांमुळे आठव्या मेंबरला माघार घ्यावी लागली. त्या मेंबरची समस्या जाणून घेण्यासाठी, तिला बोलतं करण्यासाठी एक कॅप्टन म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. त्या मेंबरने ग्रूप सोडल्यावर आम्हांला नविन मेंबर नको अशी विनंतीच केली संजना मॅडमना. सात जणी स्पर्धा संपेपर्यंत साथ साथ राहाव्यात म्हणून गणरायाला प्रार्थना करून नव्याने सुरवात केली. सगळ्यांनीच कंबर कसली आणि शक्य तेवढं किंबहुना अधिकचं योगदान दिलं. माझ्या टीम मेंबर्स बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच असेल. त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवली म्हणूनच मी कॅप्टन बनू शकले. एक टीम सांभाळणे खरं तर तारेवरची कसरत असते. भिन्न स्वभावगुण असणाऱ्या मेंबर्सना एकसंध ठेवणे खूप कठिण असते. कॅप्टन म्हणून खरा कस लागतो तो त्यांच्याकडून वेळेत लिखाण पूर्ण करून घेण्यात. माझ्या वाट्याला हा संघर्ष जरा कमीच आला. खेळीमेळीच्या वातावरणामुळे टीम नेहमीच उत्साही राहिली. भिन्न विचारधारा असलेल्या आम्हां सात जणींमध्ये मत-मतांतरे झाली पण ती टीमच्या दृष्टीने सकारात्मक ठरली. एका मेंबरचा झालेला मेडिकल इश्यू वगळता प्रत्येकीने आपले लिखाण वेळे आधीच पूर्ण करून दिले.
राधिका कुलकर्णी ताई म्हणजे आमच्या टीमचा ऊर्जास्त्रोत. खरं तर मला कॅप्टन बनण्याची हिंमतही त्यांनीच दिली. प्रत्येक फेरीत त्यांच योगदान आमच्यासाठी प्रेरणा ठरायचं.व्याकरण दृष्ट्या परिपूर्ण आणि अचूक लिखाणासाठी त्या नेहमीच आग्रही राहिल्या. रहस्यकथा, प्रेमकथा, अलक, रिल्स,अदभुत माहिती, नाटक या प्रत्येक फेरीत सहभागी होत त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. दीर्घ कथेत प्रत्यक्ष सहभागी न होता अप्रत्यक्षपणे त्यांनी आम्हां तिघींना दीर्घ कथांच्या एडिटिंग साठी मदत केली. इतर फेऱ्यांतही त्यांनी एडिटिंग विभाग एकहाती सांभाळला.
प्रत्येकीला मदत करत, योग्य सल्ला देत, लिखाणातील कमतरता दाखवत त्या भरून काढण्यासाठी आग्रही राहत त्या आमच्या मार्गदर्शक बनल्या.
प्रत्येकीला मदत करत, योग्य सल्ला देत, लिखाणातील कमतरता दाखवत त्या भरून काढण्यासाठी आग्रही राहत त्या आमच्या मार्गदर्शक बनल्या.
ज्योती सिनफळ ताई म्हणजे टीमचं वात्सल्य.तीनशे भागांची कथा लिहिणाऱ्या त्यांनी पाच भागांची उत्कृष्ट रहस्यकथा पूर्ण करत आपल्या मर्यादित लिखाणाचा अवाका वाढवला. रील मध्येही सासूची भूमिका निभावत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. अद्भुत माहिती आणि नाटिकेतही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. ग्रूपवर नेहमीच मायेने सगळ्यांची विचारपूस करणाऱ्या त्या आमच्या लाडक्या ताई बनल्या.
दीपा पिल्ले पुष्पकांथन आणि धनश्री भावसार म्हणजे आमच्या टीमचा श्वास. नवख्या त्या पण आपल्या परिपूर्ण व्यक्तिमत्वाने त्यांनी स्पर्धेत खरी रंगत आणली.
दीपाने रहस्यकथा, प्रेमकथा, रिल्स, अद्भुत माहिती आणि नाटिकेत सहभागी होत आपले योगदान दिले. धनश्री सोबत तिने सादर केलेली सामाजिक रील तर तिच्यातील अभिनय कौशल्याची नांदी ठरली. तिच्या या कौशल्याने आमच्या नाटिकेलाही एक वेगळा आयाम मिळाला. कुठेच वाटलं नाही की तिने पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता.
धनश्रीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने आमच्या टीमला आणखी मजबूत केले. वेगळ्या धाटणीची दीर्घ कथा सादर करत तिने आपल्या ईरावरच्या लेखन प्रवासाचा श्रीगणेशा केला. एका टीम मेंबरने रहस्यकथा लिहितांना आयत्या वेळी माघार घेतल्यानंतर तिने अगदी एका दिवसात आपली दीर्घकथा बाजूला ठेवत रहस्यकथा पूर्ण करून दिली. तिच्या अलक कथाही उत्कृष्ट होत्या. आपल्या अभिनय कौशल्याने तिने रिल्सची फेरी यशस्वीपणे पूर्ण केली. नाटिकेतील तिने रंगवलेली भूमिका डोळ्यांच पारणं फेडणारी ठरली. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने तिने साकारलेल्या पात्रात जिवंतपणा आणला. अलक कथा एडिट करून दिल्या. घरात पाहुणे असतांनाही नाटिकेच्या एडिटिंगचं काम एकहाती सांभाळलं. माझ्यासाठी या दोघी आमच्या टीमच्या विराट आणि बुमराह आहेत.

वर्षा खंडारे म्हणजे आपली लाडकी वर्षाराज.आमच्या टीमचं माधुर्य जणू. रहस्यकथेच्या वेळी टीमवर ओढावलेली नामुश्की दूर करण्यासाठी धनश्री प्रमाणेच वर्षानेही महत्त्वाची भूमिका पार पाडली. आजारी असतांनाही कमी वेळात रहस्यकथा लिहून दिली. स्पर्धेदरम्यान तिचे भारतात येणे झाले. सासरी कार्यक्रमात बिझी झाल्यानंतर मात्र स्पर्धेकडे लक्ष देणे कठीण झाले. या परिस्थितीतही तिने अद्भुत माहिती लिहून दिली. मैत्रिणीकडे जाऊन रिल्सचे शूटिंग केले. दीर्घ कथा लिहितांना तारेवरची कसरत करावी लागली. कथा पोस्ट करत तिने मात्र दिलेला शब्द पाळला. तिने गायलेल्या चार ओळींनी आमच्या संवेदनशील नाटिकेचा गोड शेवट झाला.
प्रियंका सुभा कस्तुरी म्हणजे आमच्या टीमचा साहित्यरूपी इंद्रधनु जणू. इंद्रधनुष्याप्रमाणे क्वचितच दर्शन घडायचं किंबहुना ते घडण्यासाठी राधिका ताईंच्या शब्दसरी आणि सोबत कॅप्टनच्या भूमिकेचा कोवळा सूर्यप्रकाश एकत्र यावा लागायचा. साहित्याचे रंग मात्र मनाला भारावून जायचे. तिने लिहिलेल्या अलकना वाचकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद ही आमची जमेची बाजू. प्रेमकथेच्या रंगात तर आम्ही सगळेच रंगून गेलो. नाटिकेच्या संहिता लेखनाची जबाबदारी तिने यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकिय कारणांमुळे शब्दांची राज्ञी असलेल्या प्रियंकाच्या लेखणीची साथ आमच्या टीमला हवी तेवढी लाभली नाही. स्पर्धेसाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता, ग्रूपवर ॲक्टिव्ह राहता येत नव्हते पण तरीही माघार न घेता तिने ही स्पर्धा पूर्ण केली. काही मत-मतांतरे झाली पण सकारात्मक भूमिका घेत त्यावर तोडगा निघाला. खंत एवढीच वाटली की वैद्यकिय कारणांमुळे तिच्या साहित्याच्या सातही रंगांना अनुभवता आले नाही.
स्वतः बद्दल काय लिहिणार ? या स्पर्धेत कॅप्टन पद सांभाळतांना आत्मविश्वासाचे आणि नेतृत्वाचे दान भरभरून मिळाले. माझ्या प्रत्येक टीम मेंबर्सचे किंबहुना स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्या लेखकांचे साहित्य वाचतांना मानसिक आनंद मिळाला आणि विचारांची प्रगल्भता लाभली. टीमच्या वतीने काही निर्णय घेतांना कमालीची दमछाक झाली. वेगवेगळ्या विचारांच्या माझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन चालतांना विविधतेत एकता जोपासण्याचे बळ मिळाले. वैयक्तिक अडचणी बाजूला पडल्या. स्पर्धेदरम्यान माझी टीम माझे कुटुंब झाले जणू. नाटिकेदरम्यान तर खरच आम्ही एक कुटुंब जगलो. थोडक्यात मीच मला नव्याने उलगडले.
आमच्या सातजणींचा इंद्रधनुष्य ईराच्या आभाळावर गर्द सजला. साहित्याच्या या सप्तरंगात न्हाहून निघत आम्ही सगळ्याच जणी समृद्ध झालो. लिखाणाची आवड जोपासत स्वतःसाठी जगलो. या साऱ्यांत
कॅप्टन म्हणून तुम्ही मला जी साथ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मनापासून प्रेम. स्पर्धेचे औचित्य साधत आमच्या लिखाणाला प्रेरणा देणाऱ्या संजना मॅडम आणि ईरा टीमचे खूप खूप आभार.
कॅप्टन ग्रूपवर नेहमीच आनंदी वातावरण ठेवणाऱ्या माझ्या सगळ्याच मैत्रिणींनाही मनापासून धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाचक वर्ग. तुम्हां मुळेच आमचे लिखाण सार्थकी लागते. तुमच्या समिक्षा म्हणजे आमच्या साहित्याला मिळणारे पोषक खतपाणी. तुम्हां सगळ्यांचेही मनापासून आभार..

धन्यवाद.