आनंद योग
भाग १
भाग १
" अगं नेत्रा, किती वेळा सांगायचं तुला ? चहामध्ये आलं आधी कुटून टाकायचं आणि मग दूध घालायचं. तू दूध आधी घालतेस म्हणून चहाचा तो अस्सल चव निघून जाते ! " स्वयंपाकघरातून कालिंदीबाईंचा अधिकार वाणीतील आवाज आला.
वयाची पासष्टी ओलांडली असली, तरी त्यांचा आवाजातील जरब आणि कामातील अचूकता तसूभरही कमी झाली नव्हती. नेत्राने हसून गॅस बंद केला आणि दोन कप बाहेर काढले.
" हो आई, लक्षात ठेवीन पुढच्या वेळी. पण आज आलं संपलं होतं ना, म्हणून वेलदोडा टाकलाय. देऊन बघू का तुम्हाला चहा ? " नेत्राने सावरून घेत विचारलं. कालिंदीबाईंनी चष्म्याच्या वरून एक कटाक्ष टाकला.
" बरं बाबा, दे. आता तुझ्या पुढ्यात पर्याय तरी काय आहे म्हणा ! "
नेत्रा ही कालिंदीबाईंची धाकटी सून. घरात नेत्रा, तिचे पती , पूजा त्यांची नात, कालिंदीबाईंचा मोठा मुलगा त्याची बायको आणि कालिंदीबाई असा हा मध्यमवर्गीय संसार. पूजा सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी असली तरी तिच्या नावाचा जप घरात सतत चालू असे. कालिंदीबाईंना संधिवाताचा त्रास होता, कंबर सारखी धरत असे, पण तरीही घरातलं वर्चस्व सोडणं त्यांच्या स्वभावात नव्हतं.
चहाचा आस्वाद घेत असताना नेत्राने हळूच विषय काढला.
चहाचा आस्वाद घेत असताना नेत्राने हळूच विषय काढला.
" आई, काल मी पूजाशी फोनवर बोलत होते. ती म्हणत होती की आपल्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये सकाळी सात ते आठ या वेळेत आनंद योग नावाचा एक वर्ग सुरू झालाय. खास तुमच्या वयाच्या लोकांसाठी." कालिंदीबाईंनी चहाचा घोट घेता घेता कप खाली ठेवला.
"योगा ? आणि मी ? अगं नेत्रा ! साधी खाली वाकून रांगोळी काढताना माझ्या कमरेचे मणके वाजतात, तिथे मी काय पाय डोक्याला लावणार का ? "
" तसं नाही हो आई." नेत्रा समजावत म्हणाली,
" तिथे काही अवघड आसनं नसतात. फक्त श्वासाचे व्यायाम, हलकंसं चालणं आणि एकमेकींशी गप्पा मारणं इतकंच असतं. मी तर ऑनलाइन फी सुद्धा बघून ठेवली आहे. तुम्ही म्हणाल तर उद्या सकाळी फक्त बघायला तरी जाऊन येऊया का ? "
कालिंदीबाईंच्या चेहऱ्यावर अचानक रागाची छटा उमटली. त्यांना हे योगा प्रकरण स्वतःच्या आरोग्यापेक्षा काहीतरी वेगळंच वाटू लागलं. त्यांच्या मनात विचारचक्र सुरू झालं,
' नेत्राला नक्की काय हवंय ? सकाळच्या वेळी मी घरात असते, म्हणून हिला कामात अडथळा येतोय का ? का हिला असं वाटतंय की मी आता म्हातारी झालेय आणि घराबाहेर पडलं पाहिजे ? '
मध्यमवर्गीय मानसिकतेत अनेकदा सासूला वाटतं की सून आपल्याला कामातून रिटायर करू पाहतेय. कालिंदीबाईंना वाटलं की नेत्राला आता घराच्या किल्ल्या आणि अधिकार स्वतःकडे घ्यायचे आहेत, म्हणून ती आपली रवानगी तास भरासाठी बाहेर करू पाहतेय.
" मला कुठेही जायची गरज नाहीये नेत्रा ! " कालिंदीबाई थोड्या मोठ्या आवजात म्हणाल्या.
" घरातलं काम करणं हाच माझा व्यायाम आहे. आणि राहिला प्रश्न योगाचा, तर ते रिकामटेकड्या लोकांचे चोचले आहेत. तुला जर माझं घरात असणं टोचत असेल, तर तसं स्पष्ट सांग ! " नेत्रा अवाक झाली.
" आई, असं काय बोलताय तुम्ही ? मी फक्त तुमच्या तब्येतीसाठी..."
" पुरे पुरे ! मला सगळं समजतं. आज योगाला पाठवशील, उद्या म्हणशील आई गार्डेनमध्ये जाऊन बसा, परवा म्हणशील वृद्धाश्रमाची सहल आहे. नकोय मला हे आधुनिक प्रेम ! " कालिंदीबाई ताडकन उठल्या आणि थोड्याशा लंगडत कपाटाचा आधार घेत आपल्या खोलीत निघून गेल्या.
दुपारची वेळ झाली. म्हणजे घरांत दुपारची शांतता खूप काही सांगून जाते. बाहेर उन्हाचा कडाका वाढला होता. नेत्रा हॉलमध्ये बसून तिच्या कामाच्या काही डिझाइन्स लॅपटॉपवर पाहत होती. कालिंदीबाई आपल्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांचं लक्ष सारखं हॉलकडे होतं.
त्यांना वाटलं,
त्यांना वाटलं,
'नेत्रा आता पूजाला फोन करून माझी तक्रार करेल. म्हणेल तुझी आजी किती हट्टी आहे. मग पूजा मला फोन करून उपदेश देईल.' जुन्या पिढीतील स्त्रियांना आपल्या अधिकारावर गदा येण्याची भीती सतत सतावत असते.
कालिंदीबाईंना वाटत होतं की, जर त्या रोज सकाळी योगाला गेल्या, तर नेत्रा सकाळी कोणालाही न विचारता नाश्ता बनवेल, तिच्या मनाप्रमाणे घर आवरून टाकेल आणि हळूहळू कालिंदीबाईंची घरातली किंमत शून्यावर येईल.
हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा त्यांच्या मनात नाचत होता.
हा त्यांच्या अस्तित्वाचा लढा त्यांच्या मनात नाचत होता.
तितक्यात कालिंदीबाईंना जोरात शिंक आली आणि कमरेत सणक भरली.
"आऽऽ आई गं!"
पाठोपाठ त्यांच्या तोंडातून किंकाळी निघाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा