Login

आनंदाचे घर.... (भाग एक)

आनंदाचे घर
"अहो , माझ्या मुलीला सासरी त्रास नको म्हणून  सासू नसलेलं स्थळ बघून पूर्वाच लग्न लावून दिलं. म्हणजे कसं आयुष्यभर माझी मुलगी सुखात आणि आनंदातच राहील'. पूर्वाच्या आई बाजूच्या सावंत काकूंना सांगतात.

पूर्वाकडे बघत सावंत काकू बोलतात...नशीब काढलास बाई, म्हणजे तुला सासूचा जाच नाही!

पूर्वा, हो ना म्हणूनच तर आईने माझ्यासाठी हे स्थळ निवडलं. सासू नाही म्हणजे मला कसं माझ्या मनासारखं जगता येईल.

मंग जावई बापूंना भाऊ-बहीण आहे की नाही?

"अहो काकू त्यांना बहीण नाही, पण एक मोठा भाऊ आहे. मोठ्या जाऊबाई त्यांची दोन मुलं आणि आम्ही दोघ अस आमचं सहा जणांचा एकत्र कुटुंब आहे.

अगं पण ...."सासू नाही पण मोठ्या जावेचा धाक असणारच ना तुला"!

काकूंचे बोलणे ऐकल्यानंतर पूर्वाची आई बोलते "अहो पण जाऊ आणि दीर आज आहे , तर उद्या नाहीत". कधी ना कधीतरी दोघं वेगळे राहतील आणि मग माझी मुलगी सुखाचा संसार करेल.....म्हणूनच मी आता पूर्वाला सांगितला आहे की लवकरात लवकर वेगळं रहा.


काय गं पूर्वा.... तु  बोललीस की नाही जावईबापूशी वेगळं राहण्याबद्दल!

अगं मी त्यांच्याशी बोलेल पण माझ्या मोठ्या जाऊबाई मला वेगळं राहण्याची परवानगी देतील असं वाटत नाही. मी वेगळी राहिली तर त्यांच्या हाताखाली काम करणारी मोलकरीणच कमी होईल.... अगं आई तुला सांगते माझी जाऊ स्वतः एकही काम करत नाही, आणि माझ्याकडून दहा काम करून घेते.

म्हणूनच म्हणते.... जर तुला सुखात राहायचं असेल तर जावईबापूंशी लवकर वेगळं राहण्याबद्दल बोल . नाहीतर आयुष्यभर तुझ्या जावेची खरकटी काढत बस.

अगं मी त्यांच्याशी बोलेल पण ते म्हणतात. माझ्या दादा वहिनीने माझ्यासाठी खूप केल आहे .माझ्या वहिनीने माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. म्हणून मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्यामुळे ते देखील वेगळे राहण्यासाठी तयार होतील असं वाटत नाही....

अग पण किती दिवस तुम्ही एकत्र राहणार  जावईबापूना पगार चांगला आहे. तुम्ही दुसरीकडे राहायला गेला तर तुमचा खर्च देखील कमीच होईल आणि थोडेफार पैसे देखील शिल्लक राहतील.....

काहीतरी कारण काढून पण वेगळं रहा.... आता घरी गेलीस ना की असं काहीतरी कारण सांग जे जावयांना पटेल. आणि ते देखील वेगळं राहण्यासाठी तयार होतील.... आई पूर्वाला बोलते.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all