विषय - आणि ती हसली
फेरी - राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा
सरु , म्हणजे सरस्वती देशमुख . कुटुंबातील मोठी सुन , तिच राघवशी लग्न होऊन आता जवळपास वीस बावीस वर्षे झाली होती . दोघांचा सुखी संसार सुरू होता . त्यांना एक मुलगा एक मुलगी . सरुच अर्धाहुन जास्त आयुष्य तर मुलांना मोठ करणे , सासु सासऱ्याची सेवा करणे आणि घरची काम या गोष्टीतच गेल .
या काळात तिने दुसर्यांसाठी सर्व गोष्टी केल्या , पण स्वतःसाठी जगायच राहून गेलं . किंबहुना तिला संधी , नवऱ्याची साथ आणि वेळच नाही मिळाला . 
          आत सासु सासऱ्याचे वृद्धापकाळामुळे निधन झाले होते . मुलगा शिकून मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर  कामाला लागला , मुलगी देखील लग्न करून आपल्या नवऱ्यासोबत आऊट ऑफ इंडिया सेटल झाली . आणि राघव तर आधीपासूनच त्याच्या कामात गढलेला . 
कधी त्याने सरुला स्वतःचा वेळ दिलाच नाही . एक मुलगा बाप म्हणून तो त्याची सर्व कर्तव्य पार पाडत होता . पण नवरा म्हणून बायकोला समजून घ्यायला कमी पडत होता .
कधी त्याने सरुला स्वतःचा वेळ दिलाच नाही . एक मुलगा बाप म्हणून तो त्याची सर्व कर्तव्य पार पाडत होता . पण नवरा म्हणून बायकोला समजून घ्यायला कमी पडत होता .
     सध्या तिच्या घरात मुलाच्या लग्नाचे वारे वाहत होते . राघव मुलासाठी स्थळ पाहत होता .
पण अचानक एके दिवशी त्यांचा मुलगा एका मुलीला घेऊन घरी आला आणि लग्न केलंय तिच्याशी सांगून मोकळा झाला . राघव सरु दोघांना देखील सुरुवातीला हे अजिबात पटलं नव्हत .
पण अचानक एके दिवशी त्यांचा मुलगा एका मुलीला घेऊन घरी आला आणि लग्न केलंय तिच्याशी सांगून मोकळा झाला . राघव सरु दोघांना देखील सुरुवातीला हे अजिबात पटलं नव्हत .
      पण मुलाच्या हट्टापायी  सरुनेच कसे तरी राघवला तयार केले . तो जरा नाखुशीनेच पण शेवटी तयार झाला . कारण मुलाच्या सुखातच तर आई बापाच सुख असते ना . 
    अनघा म्हणजे सरुची सून , अनाथ असल्यामुळे दोघांचं लग्न थोडक्यातच एका मंदिरात उरकले . 
      अनघा अनाथ असल्यामुळे तिला एकट राहायची सवय झाली होती . तिला सरु राघव सोबत जुळवून घ्यायला जमत नव्हते . बरेचदा यावरून अनघा आणि चिन्मयमध्ये वाद व्हायचे . पण चिन्मय तिला समजून घ्यायचा नाही .  
पण सरू मात्र नाराज न होता , तिला समजून घ्यायचा प्रयत्न करायची . 
अनघा पटकन काही वेळा सरुला बोलुन दुखावायची , पण सरु मनाला लावून न घेता , पुन्हा अनघाशी प्रेमाने वागायची . 
     चिन्मय , अनघा , राघव रोज सकाळी ऑफिसला निघून जायचे . त्यानंतर पूर्ण दिवस सरु एकटीच घरी असायची . घरातील काम झाल्यावर तिला हा एकांत खायला उठायचा . 
म्हणून आता तिने तिचा विणकामाचा जुना छंद पुन्हा जोपासायचे ठरवले .
म्हणून आता तिने तिचा विणकामाचा जुना छंद पुन्हा जोपासायचे ठरवले .
            घर खर्चातून शिल्लक साठवलेल्या पैशातून तिने एक दिवस जाऊन लोकर आणली आणि रोज दुपारी काहीना काही वस्तू तयार करू लागली . 
      आपल्या मर्जीनुसार त्या वस्तुने घर सजवू लागली . कारण जोपर्यंत तिच्या सासुबाई होत्या तोपर्यंत त्यांच्यासमोर तिचे काहीच चालत नसे , पण आता तिला टोकणार कोणीच नव्हतं . सध्या ती तिच त्या घरची मालकीण होती . 
पण याची कल्पना घरातील तिघांना अजिबात नव्हती .
एके दिवशी अनघाच्या काही मैत्रिणी घरी आल्या होत्या .
सरुने सर्वांचे व्यवस्थित आदरातिथ्य केले , कशाचीच कमी ठेवली नव्हती . अनघा बद्दल देखील ती त्या सर्वजणींशी भरभरून बोलत होती . त्यांच्या समोर अनघाचे कौतुक करत होती .

घरात येतानाच त्यावेळी त्यांना दरवाजाला लोकरीचे तोरण दिसले . त्यांना ते खूप आवडले . 
    त्याच्यातील एकीने अनघाला विचारले , हे कुठून आणले ? पण याबद्दल अनघाला त्याबद्दल काहीच माहिती नव्हते .
शेवटी सरु म्हणाली , मी बनवल आहे घरी . हे ऐकून त्या सर्वजणी आश्चर्याने सरु कडे बघू लागल्या .
शेवटी सरु म्हणाली , मी बनवल आहे घरी . हे ऐकून त्या सर्वजणी आश्चर्याने सरु कडे बघू लागल्या .
वाव आंटी , तुम्ही किती मस्त बनवले आहे हे , त्यांच्यातील एक जण म्हणाली .
तशी ती हसली , कारण कधी नव्हे कोणीतरी तिच्या कलेचे , तिचे कौतुक केले होते . 
नाही तर आजपर्यंत तिने केलेल्या कोणत्याच गोष्टीचे कोणीच कधीही कौतुक केले नव्हते किंवा तिला प्रोत्साहन देखील दिले नव्हते . पण जर अगदी बारीक अशी चूक असली तरी सर्वजण तिला बोलून दाखवत असत .
नाही तर आजपर्यंत तिने केलेल्या कोणत्याच गोष्टीचे कोणीच कधीही कौतुक केले नव्हते किंवा तिला प्रोत्साहन देखील दिले नव्हते . पण जर अगदी बारीक अशी चूक असली तरी सर्वजण तिला बोलून दाखवत असत .
आंटी , तुम्ही हे मला असच बनवून द्याल का ? 
त्यांच्यातील अजून एकीने विचारले .
त्यांच्यातील अजून एकीने विचारले .
      हो त्यात काय , माझ्याकडे अशी काही तोरण आणि अजून बऱ्याच वस्तू बनवलेल्या आहेत . तुम्हाला दाखवु का ?  सरु
हो , आम्हांला आवडेल बघायला .   
सगळ्या जणी हो म्हणाला .
सगळ्या जणी हो म्हणाला .
   तशी सरु खुश होऊन उठली . तिने बनवलेले लोकरीचे विविध आकर्षक हार , तोरण घेऊन बाहेर आली . 
तिने बनवलेल्या वस्तू बघून सगळ्या जणी आश्चर्यचकित झाल्या .
तिने बनवलेल्या वस्तू बघून सगळ्या जणी आश्चर्यचकित झाल्या .
      अगदी अनघा देखील आश्चर्यचकित झाली . कारण तिला देखील आपल्या सासुची ही कला माहीत नव्हती . 
अनघाला सरु कायम अडाणी वाटायची , फक्त घर च सरुच विश्व हा अनघाचा समज होता . 
     आंटी तुम्ही आम्हाला या वस्तू विकत द्याल का ?  
अग विकत कश्याला , तुम्ही हे असच घ्या तुम्हाला जे हव ते , सरु म्हणाली . 
नाही ...! 
अनघा एकदम मोठ्याने ओरडली .
अनघा एकदम मोठ्याने ओरडली .
सगळ्या जणी तिच्याकडे पाहु लागल्या . 
नाही म्हणजे तुम्हाला या वस्तू बाहेरच्या किंमतीपेक्षा नक्कीच कमी दराने मी आईंना द्यायला सांगेन . अनघा बोलली .
अग पण अनघा , सरु काही बोलणार इतक्यात ....
आई चिन्मय यायचा टाईम झाला आहे . तुम्ही प्लीज् स्वयंपाकाच बघा . नाही तर तो आल्यावर परत चिडचिड करेल . 
यावर काही न बोलता सरु गपचूप किचनमध्ये निघून गेली . 
त्या सर्व वस्तू कोणाकोणाला पाहिजेत तश्या अनघाने सर्वांना विकत दिल्या आणि त्यांच्याकडून पैसे देखील घेतले . 
खरं तर सरलाला अनघाचा अशा वागण्याचा खूप राग आला होता . पण बोलून दुसऱ्याला दुखावणे हा तिचा स्वभाव नसल्यामुळे ती शांत बसली . 
चिन्मय राघव आले , जेवण झाले तरी सरु शांतपणे तिची काम करत होती . रोज बडबड करणारी सरु आज शांत आहे हे त्या दोघांना जाणवले  देखील नाही . 
    जेवण झाल्यावर सरु शांतपणे गॅलरीत जाऊन बसली . अनघाला तिच्या मनात काय चालू आहे याची थोडीफार कल्पना आली होती , पण ती सध्या तिला काहीच बोलली नाही . 
दुसऱ्या दिवशी सरुचा वाढदिवस होता . पण एक घरातील कोणालाच माहिती नव्हते . सगळे आपल्या कामाला निघून गेले .
रोजच्याप्रमानणे घरातल सगळ काम उरकून थोडं विणकाम केलं आणि सरु मंदिरात गेली. 
    दरवर्षी न चुकता वाढदिवसाच्या दिवशी मंदिरात जाणं आणि सगळ्यांना प्रसाद देणं हा तिचा एक नियम होता . 
म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ती मंदिरात गेली .
म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ती मंदिरात गेली .
संध्याकाळी घरी आली तेव्हा घराचा दरवाजा देखील उघडा होता .
सगळीकडे अंधार होता . ती घाबरून ओरडली तश्या घरातील सगळ्या लाईट लागल्या . समोर तिची मुलगी जावई अनघा चिन्मय राघव सर्वजण उभे होते.
सगळीकडे अंधार होता . ती घाबरून ओरडली तश्या घरातील सगळ्या लाईट लागल्या . समोर तिची मुलगी जावई अनघा चिन्मय राघव सर्वजण उभे होते.
घर सगळ्या फुलांच्या माळांनी मस्त सजवलेले होतं . ते बघून आनंद झाला आणि आश्चर्य देखील वाटलं . 
हॅप्पी बर्थडे आई , तिची मुलगी आणि चिन्मय तिला मिठी मारत म्हणाले . 
 तिला अजून एक सुखद धक्का बसला . 
दरवर्षी आपल्या आईचा वाढदिवस विसरून आपल्याच मस्तीत गुंग असणारे हे दोघं चक्क यावर्षी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते . 
राघवला देखील आज लवकर घरी आलेलं बघून तिला छान वाटलं . कारण आजपर्यंत एक दोनदा सोडल्यास राघव कधीच तिच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी थांबत नसे . किंबहुना तिचा वाढदिवस त्याच्या लक्षात राहत नसे . 
आई मला माहिती आहे , तुम्ही माझ्यावर रागावले आहात पण तरीदेखील माझ्याकडून हे छोटसं गिफ्ट म्हणत अनघाने तिच्यापुढे एक बॉक्स धरला . 
सरुने काही न बोलता तो बॉक्स घेतला आणि बाजूला ठेवणार तोच \" आई उघडून बघा ना \" असे म्हणत अनघाने आग्रहाने तो बॉक्स सरुला उघडायला लावला . 
सरुने देखील तिच्या आनंदासाठी तो बॉक्स उघडला तर त्यात सुंदर असे सोन्याचे तोडे होते .
सरुने देखील तिच्या आनंदासाठी तो बॉक्स उघडला तर त्यात सुंदर असे सोन्याचे तोडे होते .
ते बघून सरुला आश्चर्य वाटलं कारण आजपर्यंत एवढं कधीच तिला कोणी महाग गिफ्ट दिलं नव्हतं .
      जे काही असेल ते ती स्वतःच पैसे साठवून स्वतःला घ्यायची ते देखील कमी किमतीचंच असायचं . 
     आई तुम्ही काल माझ्यावर चिडला , मला मान्य आहे . पण  एखाद्याला जर आपण फुकट वस्तू दिली तर त्या व्यक्तीला आपली किंमत आणि त्या वस्तुंची  किंमत राहत नाही . ती वस्तू बनवण्यामागे लागलेले त्या व्यक्तीचे कष्ट , गेलेला वेळ देखील कोणी समजून घेत नाही . कारण ती फुकट मिळालेले असते . 
पण जर त्यासाठी पैसे मोजले तर त्या वस्तूची किंमत माणसाला कळते . आणि हेच आम्हाला लहानपणा पासून शिकवले होते . कारण जेव्हा पैसा जातो तेव्हाच वस्तुची किंमत कळते. 
तसंच काहीसं काल झालं असतं . म्हणून मी काल अस वागले .
तसंच काहीसं काल झालं असतं . म्हणून मी काल अस वागले .
सॉरी आई , म्हणत अनघाने पैशांचं एक एन्वलप तिच्या समोर धरल . आई हे तुमच्या कालच्या सर्व वस्तूचे पैसे .
त्या दोघी काय बोलताय हे कोणाला समजत नव्हते . 
   सर्वजण गोंधळून त्यांच्याकडे बघत होते .
त्यांच्याकडे बघून अनघाने काल झालेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगितला आणि सर्वांसमोर पुन्हा एकदा सरुची माफी देखील मागितली . ते बोलणे ऐकून सगळे खुश झाले .
त्यांच्याकडे बघून अनघाने काल झालेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगितला आणि सर्वांसमोर पुन्हा एकदा सरुची माफी देखील मागितली . ते बोलणे ऐकून सगळे खुश झाले .
खरंच आपण आपल्या कामाच्या व्यापात इतके गुंतलो कि तिच्याकडे आपले दुर्लक्ष झाले .  याचा आता राघवला पश्चाताप होत होता. 
पण त्याने मुलांसमोर न लाजता  तिची माफी मागितली . तिने देखील लगेच त्याला माफ केले . कारण त्याच्याबद्दल कधीच तिच्या मनात राग नव्हता . 
आज कधी नव्हे ते तिच्या चेहऱ्यावर निखळ खरे हसू होतं . 
सरुला तर आज हे सगळ स्वप्नवतच वाटत होते .
सरुला तर आज हे सगळ स्वप्नवतच वाटत होते .
त्यानंतर राघवने सरुला तिच्या आवडत्या रंगाची पैठणी गिफ्ट म्हणून दिली . 
अनघाने आग्रहाने सरुला ती नेसायला देखील लावली . त्यानंतर उत्साहाने सरुचा वाढदिवस साजरा केला .
अनघाने आग्रहाने सरुला ती नेसायला देखील लावली . त्यानंतर उत्साहाने सरुचा वाढदिवस साजरा केला .
आज अनघाने खास सरुच्या आवडीचा सगळा मेन्यू स्वतः बनवला होता . 
त्यानंतर सरुचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना अनघाची हे जेवण झाल्यावर चिन्मयने सरुला सांगितले .
त्यानंतर सरुचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना अनघाची हे जेवण झाल्यावर चिन्मयने सरुला सांगितले .
जी गोष्ट इतके वर्षे हक्कांच्या आपल्या मुलांनी केली नाही , ती गोष्ट सुन म्हणून नुकत्याच आलेल्या अनघाने केली . याच सरुला खुप अप्रूप वाटल . 
तेवढ्यात अनघाने उठून सरु पुढे हात करत उभ राहायला सांगितले .
सरु देखील तिच्या हातात हात देत उभी राहिली .
सासुबाई आज पर्यंत माझ्या मनात तुमच्याबद्दल बरेच गैरसमज होते .
तेवढ्यात अनघाने उठून सरु पुढे हात करत उभ राहायला सांगितले .
सरु देखील तिच्या हातात हात देत उभी राहिली .
सासुबाई आज पर्यंत माझ्या मनात तुमच्याबद्दल बरेच गैरसमज होते .
   मी बरेचदा खुप चुकीची देखील वागले तुमच्या सोबत . पण दरवेळी तुम्ही मला मोठ्या मनाने माफ केलत . तस एक आई आपल्या मुलांना करते . अस म्हणत अनघा तिच्या समोर गुडघ्यावर बसली आणि तिथले एक गुलाबाचे फूल हात घेऊन सरु समोर धरत म्हणाली , 
माझ्या सारख्या अनाथ मुलीची आई व्हाल का ? 
लेकी सारखे माझे पण सगळे हट्ट पुरवाल का ?
चुकल्या वर आईच्या हक्काने कान धराल का ?
अनघाने भावुक होत विचारल .
तिच्या अश्या वागण्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले .
सरु देखील होकारार्थी मान हलवत तिला उठवून आपल्या मिठीत घेतले .

आज एका अनाथ लेकीला तिची आई मिळाली होती . आज दोघींच्या देखील चेहऱ्यावर एक समाधानाचे आणि आनंदाचे हसु होते .  
अमृता कुलकर्णी
जिल्हा - सातारा , सांगली
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा