आनंदी हे जग सारे (भाग - ४)
©® स्मिता भोस्कर चिद्रवार .
डॉक्टर गुप्ते निघून गेले. सुरभी सैरभैर झाली होती. त्यांनी, "घरी जा" असं सांगितलं, तरीही ती हॉस्पिटलमध्येच थांबणार होती. तिने हॉस्पिटलमध्ये आडून आडून चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण कोणीच काही सांगितलं नाही.
सुरभीने केशवला जबरदस्ती घरी पाठवलं. तिने सोहमला फोन केला.
"कुठपर्यंत आलस रे? तू उगीच काळजी करशील म्हणून तुला सांगितलं नव्हतं, पण अरे बाबांना ऍडमिट केलंय. आईला मी घरी पाठवलय. निमा काकू आहेत सोबत. इकडे केशव होता माझ्यासोबत. सगळं ठीक आहे. तू घरी पोहोच, फ्रेश होऊन आई आणि तू या हॉस्पिटलमध्ये. तोपर्यंत टेस्ट होतील बाबांच्या."
"ताई, मी अर्ध्या तासात पोहोचतोय. डायरेक्ट येतो मी हॉस्पिटलमध्ये. मला राहवणार नाही. पोचतोच मी काळजी घे ताई." सोहम बोलला
दोघे बहीण भाऊ अगदी एकमेकांसाठी आणि आई बाबांसाठी काहीही करायला तयार होते. खूपच गुणी आणि समजूतदार होते दोघेही.
सोहम हॉस्पिटलमध्ये पोचला. दोघांनी एकमेकांना कडकडून मीठी मारली. सोहम ताईच्या पाया पडला.
"ताई, ताई अग काय झालं बाबांना? मी सकाळी बोललो तर बरे होते. काही सांगितलं का डॉक्टरांनी?"
"अजून काही नाही बोलले. गुप्ते काका येतीलच आता राऊंड वरून मग सांगतील. ते असताना काळजी करायची गरज नाही आणि आपले पैसे सुद्धा जमले आहेत आता. त्यामुळे काहीच प्रोब्लेम नाही. ऑपरेशन करा म्हटले लगेच तर आपली तयारी आहे आणि माझं पण सिलेक्शन झालंय, आज गेले होते ना इंटरव्ह्यूला. सगळं ठीक होईल बघ आणि तू काय सरप्राइज देणार होतास?"
"अग खूप आनंदाची बातमी आहे. मला कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे जॉब मिळाला आहे. खूप छान ऑफर आहे. पगार, पर्क्स एकदम भारी आहे. आता बाबा बघ एकदम पटकन बरे होतील. तुझं पण अभिनंदन!खूप छान झालं बघ. आता डॉक्टर काय म्हणतात याचीच काळजी." सोहमने ताईला आनंदाची बातमी दिली.
"अरे काय सांगतोस काय? किती आनंद झाला म्हणून सांगू? कुठली कंपनी? किती पगार? आणि कुठे होणार पोस्टिंग? आईला सांगितलं का तू? अरे ती घरी काळजी करत असेल." सुरभीचां उर अभिमानाने भरून आला.
"हो. मी पोचलो तेव्हाच आईला फोन केला. तिला सांगितलं मी इकडे येतोय ते. ती म्हणत होती तिला यायचं आहे इकडे ते. पण मला राहवलं नाही म्हणून इकडे आलो आधी."
"हो. मी पोचलो तेव्हाच आईला फोन केला. तिला सांगितलं मी इकडे येतोय ते. ती म्हणत होती तिला यायचं आहे इकडे ते. पण मला राहवलं नाही म्हणून इकडे आलो आधी."
दोघं बोलत होते तितक्यात डॉक्टर गुप्तेनीं त्यांना आत बोलावलं. सुरभीचं हृदय धडधडत होतं. सोहम सोबतीला होता तेव्हढाच आधार.
"या. बसा. कधी आलास सोहम? काय म्हणतोय अभ्यास?" गुप्ते काका मुद्दाम काहीतरी बोलून टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करत होते.
"नमस्कार करतो काका. आताच आलो. मला बाबांना भेटायचं आहे. खूप आनंदाची बातमी आहे. मला खूप चांगला जॉब मिळाला आहे आणि ताईलाही. बाबांना कळलं की लगेच बरे होतील ते. जाऊ का आम्ही त्यांना भेटायला? नक्की काय झालंय बाबांना? टेस्ट झाल्या का? रिपोर्ट्स ठीकच असतील. बाबांची तब्येत चांगली आहे. खूप स्ट्राँग आहेत ते. हे गुढग्यांच ऑपरेशन झालं की बास्स! मग धावायला लागतील."
"सोहम, सुरभी हे बघा. मी जे सांगणार आहे ते तितकसं चांगलं नाहीये. मन घट्ट करा. खरंतर माझ्याच्याने सांगवत नाहीये पण आता पर्याय नाही. तुम्ही मुलं लहान आहात पण आता हे आपल्याला एक्सेप्ट करायलाच हवं." गुप्ते काकांच्या डोळ्यात पाणी होतं. ते बघून दोघेही हादरले.
"काका, अहो काय ते स्पष्ट सांगा. कितीही पैसे लागले तरी ते आम्ही उभे करू. पण बाबा बरे झाले पाहिजेत. दुसरीकडे शिफ्ट करायचं असेल तर तेही करा. काय वाटेल ते करा. नक्की काय झालंय?काका प्लीज सांगा. तुम्ही सांगाल ते करू आम्ही." सुरभीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. सोहम पण हादरला होता.
"मुलांनो, कॉर्डियाक अरेस्ट होता तो. हार्ट फेलुअर आहे. व्हेंन्तीलेटर वर ठेवलं आहे वसंताला."
"बाप रे. देवाची कृपा बाबा ठीक होतील ना लवकर? आता आम्ही भेटू शकतो ना? किती दिवस लागतील?" सोहम बोलत होता
"सोहम, सुरभी अरे ऐकून घ्या. मनावर दगड ठेवून. अरे वसंता जिवंत आहे ते फक्त व्हेंटीलेटरमुळे, ते काढलं की, तो आपल्यात नसेल. काहीच शक्यता नाहीये. मुलांनो मला माफ करा. मी हरलो. शेवटी देवापुढे माणूस काय करणार." डॉक्टर गुप्ते इतका मोठा, ग्रेट माणूस पण आज हतबल होऊन अश्रू ढाळत होता.
सुरभीने टाहो फोडला
"काका, काका हे खोटं आहे म्हणा. असं कसं होऊ शकतं? बाबांसारखा इतका फिट माणूस असा कसा हरेल? मेडिकल सायन्स इतकं एडवांस झालंय आता. काहीतरी होईल ना. आपण दुसरीकडे नेऊ ना बाबांना नाहीतर दुसरे एक्स्पर्ट डॉक्टर बोलवा ना." सोहम डॉक्टरांना विनवत होता
"अरे बाळा, मी सगळं करून बसलोय. पण या सगळ्यांच्या वरतीही एक शक्ती आहे. तिच्यापुढे कोणाचं काहीच चालत नाही. आता एक परसेंट पण शक्यता नाहीये. वहिनींना काय तोंड दाखवू मी आता? हरलो रे मी, पोरांनो आज एक मित्र म्हणून आणि डॉक्टर असूनही मी हतबल आहे." डॉक्टर गुप्तेनी सोहमला जवळ घेतलं
सुरभी आणि सोहम ढसाढसा रडत होते. त्यांना कसं सावरायचं ते गुप्तेना समजत नव्हतं.
"वहिनींना बोलावून घ्या आणि माझं ऐका, वसंताला जाऊ द्या. त्याला खूप त्रास होतोय. व्हेंटीलेटर काढायची परवानगी द्या. त्याच्या जीवाचा त्रास बघवत नाही मला. " डॉक्टर हात जोडून म्हणाले
"नाही, नाही ते शक्य नाही. काका व्हेंटीलेटर सुरू आहे, तोपर्यंत बाबा आहेत ना आपल्यात. मग नाही काढायचं ते. चमत्कार होऊ शकतो ना? अहो बाबा किती परोपकारी आहेत. काय वाईट केलं आपण कोणाचं? देवाचं पण इतकं करतात आई, बाबा मग देव असा कसा क्रूर होईल." सुरभी बाबा जाणार हे ॲक्सेप्ट करायला तयारच नव्हती.
" आईला कळवायला हवं. तिचे चार मिस कॉल्स आहेत. केशवला सांगतो आईला घेऊन यायला." सोहमने केशवला फोन केला.
"केशू, अरे ऐक ना. कुठे आहेस तू? जवळपास आई, काकू असतील तर जरा बाजूला ये. आई आणि काकूला घेऊन हॉस्पीटलमध्ये येशील का लगेच?"
"हो. हो येतो ना. तू पोचला का? कसे आहेत काका? काकु कधीपासून काळजी करतात आहेत. मागेच लागल्या होत्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून. काय म्हणाले डॉक्टर? थोडेफार पैसे आणतो सोबत. बाकी उद्या अजून व्यवस्था होईल. काळजी करू नकोस." केशव धीर देत म्हणाला
सोहमने केशवला सगळं सांगितलं. ऐकून केशव सुद्धा हादरला. सोहमला कसा धीर द्यायचा तेच त्याला कळत नव्हतं. दोन्ही घरे अगदी एकच होती. मुलंही बरोबरीची त्यामुळे त्यांचं विशेष सख्य होतं पण काकूंकडे बघून केशवने डोळे पुसले
"काकु, सोहमचा फोन आला होता. चला आपण जाऊया. आई तू पण चल सोबत. आधी दोघी जेवून घ्या. औषधं घ्या. नाहीतर दोघं रागावतील मला. " केशव उसनं अवसान आणून म्हणाला
"हो का? बरं झालं बाई. केव्हाची फोन करत होते पण हे बहीण भाऊ काही फोन उचलायला तयार नाहीत. ह्यांच्याजवळ असतील म्हणून नसेल उचलला फोन. मी छान उपमा करते ह्यांच्या आवडीचा मऊ. चव येईल तोंडाला. मुलांसाठीही जेवण न्यायला हवं. निमा ताईंना कशाला रे उगीच दगदग? भावजी येतील आता गावाहून. तू ही नाही आलास तरी चालेल. मला रिक्षात बसवून दे फक्त. मुलं आहेतच तिकडे. मी फ्रेश होते आणि येते. असा चेहरा बघून रागावतील हे नाहीतर. देवापुढे दिवा पण लावायला हवा. येते मी ताई." रंजना बाई म्हणाल्या आणि घरी गेल्या
काकू जाताच केशवला रहावलं नाही. तो आईच्या गळ्यात पडून रडायला लागला. निमा ताईंना काय झालय तेच कळेना. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. तितक्यात त्याचे बाबा सुरेशराव गावाहून परत आले
केशव त्यांच्याकडे बघून जास्तच रडायला लागला.
केशव त्यांच्याकडे बघून जास्तच रडायला लागला.
"बेटा शांत हो. काय झालं सांग मला. आम्ही आहोत ना. बस इथे सांग बरं काय झालं ते .."
"बाबा वसंत काका.." केशवने रडतच आई बाबांना सगळं सांगितलं. बाबांनी त्याला जवळ घेतलं. सगळेच खूप दुःखी झाले. सुरेश आणि वसंत यांची इतक्या वर्षांची मैत्री, अगदी सख्ख्या भावालाही लाजवेल अशी होती. इतका हसतमुख, परोपकारी आणि मुख्य म्हणजे तब्येतीने अगदी ठणठणीत असणारा आपला मित्र आपल्याला सोडून जाणार ही कल्पना सहन होणारी नव्हती. तितक्यात बाहेरून रंजनाबाईंचा आवाज आला. सगळ्यांनी पटकन डोळे पुसले.
"बाबा वसंत काका.." केशवने रडतच आई बाबांना सगळं सांगितलं. बाबांनी त्याला जवळ घेतलं. सगळेच खूप दुःखी झाले. सुरेश आणि वसंत यांची इतक्या वर्षांची मैत्री, अगदी सख्ख्या भावालाही लाजवेल अशी होती. इतका हसतमुख, परोपकारी आणि मुख्य म्हणजे तब्येतीने अगदी ठणठणीत असणारा आपला मित्र आपल्याला सोडून जाणार ही कल्पना सहन होणारी नव्हती. तितक्यात बाहेरून रंजनाबाईंचा आवाज आला. सगळ्यांनी पटकन डोळे पुसले.
"केशवा, अरे झालं का तुझं? मी तयार आहे. निमा ताई हा घ्या उपमा. तुम्हाला आवडतो ना आणि ही भेंडीची भाजी केशवच्या आवडीची. आपल्या सगळ्या मुलांना भेंडी किती आवडते ना? अरे भावजी कधी आलात तुम्ही? कशी आहे कल्याणी? मी हॉस्पिटलमध्ये जातेय. तुमच्या मित्राला लवकर घरी घेऊन येते. किती घाबरवून टाकलं होतं मला. आता बघा अगदी आराम करायला लावते की नाही?
आणि तुम्ही सगळे असे का आहात? डोळे का सुजलेले? काही झालंय का? कल्याणीकडे काही प्रॉब्लेम झालाय का? काळजी करू नका. होईल सगळं ठीक. मी येते हॉस्पिटलमध्ये जाऊन. केशवा, रिक्षा आणतोस ना? " आपला नवरा लवकर बरा होऊन घरी परत येणार याची रंजना बाईना अगदी खात्रीच होती.
समोर काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
आणि तुम्ही सगळे असे का आहात? डोळे का सुजलेले? काही झालंय का? कल्याणीकडे काही प्रॉब्लेम झालाय का? काळजी करू नका. होईल सगळं ठीक. मी येते हॉस्पिटलमध्ये जाऊन. केशवा, रिक्षा आणतोस ना? " आपला नवरा लवकर बरा होऊन घरी परत येणार याची रंजना बाईना अगदी खात्रीच होती.
समोर काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
(काय होईल पुढे? सगळेजण ह्या अवघड परिस्थितीला कसं सामोरं जातील? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा