Login

आनंदी हे जग सारे ( भाग ११ )

पहिल्या दिवसापासून आनंदी स्विमिंग शिकायला चांगली प्रतिसाद देऊ लागली. तिला शिकतांना बघून सुरभी खूप खुश होती पण आनंदी जास्त वेळ पाण्यात राहिली की, आजारी पडायची. मग स्विमिंग बंद करावं लागायचं. काही दिवसांत आनंदी बरी व्हायची मग पुन्हा क्लास सुरू. हे असं काही दिवस चालू होतं. तिला आवड असूनही स्विमिंग करता येत नव्हतं, हे बघून सुरभी दुःखी व्हायची. नेहमी आनंदी आजारी पडायची. एका मोठ्या डॉक्टरच्या सल्याने आनंदीची ट्रीटमेंट सुरू झाली. त्याच वेळी आनंदीच्या स्विमिंग कोचने तिला पहिल्या स्पर्धेसाठी पूर्ण तयार केलं होतं पण आनंदी कशी जाणार होती? तिची तब्येत तिला साथ देत नव्हती. इच्छा असूनही आपल्याला पाण्यात का जाता येत नाही हे त्या निरागस जीवाला खूप त्रास देत होतं. काहीही करून आनंदीला तिचा आनंद परत मिळवून देण्यासाठी सुरभी लढत होती.आनंदीच डाएट, तिची औषधं आणि व्यायामाकडे अगदी व्यावस्थित लक्ष द्यावं लागे. त्यात संस्थेचे कामही होताच. सुरभीची अगदी धावपळ व्हायची. आनंदी आजारपणामुळे जिद्दी आणि किरकिरी झाली होती. इच्छेविरुद्ध सगळ्या गोष्टी कराव्या लागत असल्यामुळे ती जास्तच बिथरली होती. कधीकधी तिला सांभाळणं कठीण होऊन जायचं. तिला काही नवीन थेरपी द्वारे शांत करावं लागे. आनंदीची ट्रीटमेंट खर्चिक होत चालली होती. आनंदीचा स्विमिंगचा स्पेशल क्लास असल्यामुळे त्याचीही फी जास्त द्यावी लागे. सुरभीला फारसे पैसे मिळत नसत. त्यामुळे तिने तिच्या सेविंगमधून आनंदीची ट्रीटमेंट करायची ठरवली.
आनंदी हे जग सारे (भाग -११)

स्मिता भोस्कर चिद्रवार.

सुरभीच बोलणं पूर व्हायच्या आतच समरने तिला थांबवलं.

"काहीही काय बोलतेस तू सुरभी? असं काही होत नसतं. ही अशी मुलं काहीच करू शकत नाहीत आयुष्यात. तू तुझं आणि माझंही आयुष्य घालवतेस तिच्यापायी. हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय, त्या पोरीला संस्थेत ठेव आणि आपण आपला संसार करूया. हे जर तुला मान्य नसेल तर तुला तुझा रस्ता मोकळा आहे. तू जा, तुला हवं ते कर. मी पैसे पाठवेन तुला जमेल तसं."

"अरे स्वतःची मुलगी आहे ना ती तुझी? मग जबाबदारी का नकारतोस? तुझं काही कर्तव्य नाही का आणि मी करतेय त्यातही सपोर्ट नाही तुमचा. अरे तिला आपली गरज आहे."

"समर बरोबर बोलतो आहे. तू त्या पोरीला तिकडे सोड नाहीतर तूही तिच्यासोबत जा. माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं तू! या घरातून गेलात तुम्ही दोघी तरच आमचं घर नीट राहील आणि राहायचं असेल तर आम्हाला हवं तेच झालं पाहिजे. बस कर समर आता फार पाठीशी घातल तू हिला. आता जरा डोकं ठिकाणावर ठेवून वाग." आईंनी शेवटच सांगितलं.

सुरभी सुन्न होऊन बसून राहिली. तिचे सगळे प्रयत्न वाया गेले होते.

"ठीक आहे. तुम्हाला कोणाला नसलीतरी मला माझ्या लेकीची पर्वा आहे आणि मी तिला तिकडे घेऊन जाणार आहे. जिकडे तिच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तुमच्याकडून आपेक्षा केल्या, हीच फार मोठी चूक झाली माझी. निघतो आम्ही." सुरभीने जुजबी सामान घेतलं आणि आनंदीला घेऊन तिने घराबाहेर पाऊल ठेवलं. मागे वळून बघितलं. कोणीही दिसलं नाही तिला. दाटून आलेला पूर तिने महत्प्रयासाने दाबला. देवाकडे शक्ती मागितली आणि एका नव्या लढाईला प्रारंभ झाला.

सुरभी आनंदीला घेऊन संस्थेत आली. सिंधू ताईंनी तिचे स्वागत केले. त्यांना बघून सुरभी स्वतःला सावरू शकली नाही. त्यांच्या कुशीत तिचा स्वतःचा बांध फुटला.

"शांत हो बाळा, अग मला तुझी आईचं समज. आपण आनंदीसाठी जे जे शक्य ते सगळं करू. आता हरायच नाही तर हिंमतीने सामना करायचा. त्याने दुःख दिलंय ना मग तोच शक्ती देईल त्यातून सावरायची. आता डोळे पुस. रडायचं नाही आता. या नवीन आयुष्यात पुन्हा नव्याने गृहप्रवेश कर. आम्ही आहोतच. सगळं ठीक होईल बघ आणि ह्यापुढे दुःख कुरवाळत बसायचं नाही. वचन दे मला."

"हो. सिंधू ताई! तुमचा किती आधार आहे मला. अगदी आईचं आहात माझी. नाहीतर काय केलं असतं मी? पण आता रडणार नाही मी. आनंदीसाठी आणि आपल्या या सगळ्या मुलांसाठी आपण उज्ज्वल भविष्य घडवू. तुमचे उपकार कसे मानू मी?" सुरभी सिंधूताईंच्या पाया पडली

"आई म्हणतेस ना मला. मग ही उपकाराची भाषा कशाला? आता हे तुझं हक्काचं घर समज. काय आनंदी राहणार ना इकडे?" सिंधूताई आनंदीकडे पाहत विचारतात

"येय, आपण इकडे राहणार मम्मा? मज्जा मग. मला ते घर नाही आवडत. तिकडे पप्पा, आजी-आजोबा यांना मी आवडत नाही. इकडे मी सगळ्यांना आवडते. असं का ग मम्मा? आजी मी गुड आहे की बॅड? इकडे सगळे मावशी, काका किती छान आहेत आणि गोरे आजोबा पण खूप लाड करतात आमचा. हे घर बेस्ट आहे. आजी, मी इकडे राहिले तर तू त्या आजीसारखी नाही ना मला रागावणार?" बिचारी निरागस आनंदी सिंधू ताईंना बिलगून विचारत होती. तिला काय आणि कसं समजावाव हे सुरभीला कळत नव्हतं.

सिंधू ताईंनी आनंदीला जवळ घेऊन कुरवाळलं. ती गोड हसली.

सुरभी आणि आनंदी नवीन रूममध्ये पटकन सेट झाल्या.

छोटीशी रूम होती. जुजबी सामान होतं पण आजूबाजूला प्रेमाची माणसं होती, त्यामुळे त्या दोघी आनंदात होत्या.

सुरभीची नवीन नोकरी छान सुरू होती. तिने आपल्या लाघवी स्वभावाने सगळ्यांना आपलंसं केलं होतं. नवीन लोकांना ती अगदी छान समजावून सांगायची. आनंदी पण खुश होती.

आता दिवसभर आपल्या मित्रांसोबत तिचा चांगला वेळ जात होता. नवीन गोष्टी हळूहळू शिकत होती ती.

संस्थेत सगळ्या मुलांना त्यांचा कल ओळखून त्याप्रमाणे शिकवलं जातं असे. सगळ्यांनी सारखंच शिकलं पाहिजे असा हट्टहास नसायचा.

संध्याकाळी सगळी मुलं आपल्या घरी जात. सुरभी मग तिला घेऊन बाहेर फिरायला जायची. कधी कधी सिंधूताई आणि गोरे काका पण त्यांच्यासोबत असायचे. सिंधू ताईंना एक मुलगी होती. तिचं लग्न होऊन ती परदेशात स्थायिक झाली होती . त्यांच्या पतीच निधन लग्नानंतर दोनच वर्षात झालं होतं. त्यांनी एकटीने आपल्या लेकीला धीरान वाढवलं होतं. आता त्यांनी आपला पूर्ण वेळ संस्थेसाठी वाहून घेतला होता.

गोरे काकांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला एका अपघातात गमावलं होतं. आता ते एकटेच होते. आधार संस्था स्थापन करून त्यांनी खरंच स्पेशल मुलांना आधार दिला होता.

तशी बहुतेक स्पेशल मुलं घाबरट असतात. उंचीला, पाण्याला, मोठ्या आवाजाला ती घाबरतात पण आनंदीला मात्र पाण्याचं आकर्षण होतं. तिला पाण्यात जायला खूप आवडायचं. तिची आवड बघून सुरभीने तिला स्विमिंग क्लास लावायचा ठरवलं.

पहिल्या दिवसापासून आनंदी स्विमिंग शिकायला चांगली प्रतिसाद देऊ लागली. तिला शिकतांना बघून सुरभी खूप खुश होती पण आनंदी जास्त वेळ पाण्यात राहिली की, आजारी पडायची. मग स्विमिंग बंद करावं लागायचं. काही दिवसांत आनंदी बरी व्हायची मग पुन्हा क्लास सुरू. हे असं काही दिवस चालू होतं. तिला आवड असूनही स्विमिंग करता येत नव्हतं, हे बघून सुरभी दुःखी व्हायची. नेहमी आनंदी आजारी पडायची.

एका मोठ्या डॉक्टरच्या सल्याने आनंदीची ट्रीटमेंट सुरू झाली.

त्याच वेळी आनंदीच्या स्विमिंग कोचने तिला पहिल्या स्पर्धेसाठी पूर्ण तयार केलं होतं पण आनंदी कशी जाणार होती? तिची तब्येत तिला साथ देत नव्हती. इच्छा असूनही आपल्याला पाण्यात का जाता येत नाही हे त्या निरागस जीवाला खूप त्रास देत होतं. काहीही करून आनंदीला तिचा आनंद परत मिळवून देण्यासाठी सुरभी लढत होती.

आनंदीच डाएट, तिची औषधं आणि व्यायामाकडे अगदी व्यावस्थित लक्ष द्यावं लागे. त्यात संस्थेचे कामही होताच. सुरभीची अगदी धावपळ व्हायची. आनंदी आजारपणामुळे जिद्दी आणि किरकिरी झाली होती. इच्छेविरुद्ध सगळ्या गोष्टी कराव्या लागत असल्यामुळे ती जास्तच बिथरली होती. कधीकधी तिला सांभाळणं कठीण होऊन जायचं. तिला काही नवीन थेरपी द्वारे शांत करावं लागे.

आनंदीची ट्रीटमेंट खर्चिक होत चालली होती. आनंदीचा स्विमिंगचा स्पेशल क्लास असल्यामुळे त्याचीही फी जास्त द्यावी लागे. सुरभीला फारसे पैसे मिळत नसत. त्यामुळे तिने तिच्या सेविंगमधून आनंदीची ट्रीटमेंट करायची ठरवली.

लग्नाआधीपासूनच सुरभी पैसे साठवायची. लग्नानंतरही त्यात भर पडत होती. आता ते पैसे ती वापरणार होती.

तिच्या लॉकरमध्ये तिचे काही दागिने सुद्धा होते. गरज पडल्यास ते सुद्धा वापरता येणार होते. त्या दोघी इथे राहायला आल्यापासून समर दोन-तीन वेळा कामापुरता फोनवर बोलला होता. खरंतर त्याने पैसे द्यायला हवे होते पण ते काही त्याने दिले नाहीत. सुरभीला सुद्धा त्याच्याकडून आता कुठलीही मदत शक्यतो घ्यायची नव्हती.

खरंतर आता सुरभी अजून काहीतरी काम करायचं बघत होती, पण आनंदीच्या तब्येतीमुळे काहीच जमत नव्हतं. सुरभी पैसे काढायला गेली पण तिच्या अकाऊंटमध्ये आजिबात पैसे नसल्याचं तिला समजलं. तिला काहीच कळेना, ते तिचं आणि समरच जॉइंट अकाऊंट होतं. अडी अडचणीला असू द्यावे म्हणून दोघांचंही एकत्र अकाऊंट उघडल होतं. तिने समरला फोन करून सगळं सांगितलं.

"हो, अग मला गरज होती म्हणून मी काढले पैसे. आणि सध्याचं मला काही जमणार नाही तुला पैसे द्यायला. तुझे दागिने पण मी काढले आहेत. गरज आहे मला पैश्यांची. त्या पोरीच्या ट्रीटमेंटपेक्षा माझं काम गरजेचं आहे. तसंही काही अर्जंट नाहीत ते. काही दिवसांनी मी जमेल तेव्हा देईन पैसे. सध्याच काही जमणार नाही. स्वतः च्या जीवावर गेली होतीस ना घर सोडून मग लगेच माझी गरज पडली तुला? तुझी ती प्रेमाची माणसं कुठे गेली? त्यांना सोडून माझी गरज कशी काय पडली तुला? बघ तुला काय करायचं ते कर. माझ्याच्याने आता हा खर्च कारण शक्य नाही." समरने तोडून बोलत फोन बंद केला. सुरभी पुन्हा एकदा आतून तुटली होती.

(पुढे काय होईल? सुरभी कसा मार्ग काढेल यातून? जाणून घेऊया पुढील भागात)
0

🎭 Series Post

View all