एकाच घरात राहणारे लोक नेहमी हसत खेळत राहतात असं नाही.
कधी कधी ते फक्त निभावून घेत असतात. घरात शांतता असावी म्हणून, नाते तुटू नये म्हणून.
कधी कधी ते फक्त निभावून घेत असतात. घरात शांतता असावी म्हणून, नाते तुटू नये म्हणून.
प्रीती आणि मोना यांचं नातं पण तसंच होतं. दोघी जावा होत्या.
प्रीती —मोठी सून, लग्नाला तीन वर्ष झाली होती. तिचा नवरा —पंकज, घरातला मोठा मुलगा. एकदम शांत, जास्त न बोलणारा. वडील लवकर गेल्यामुळे तो कमी वयात समजूतदार झाला होता.त्याला जबाबदारीची जाणीव होती, पण मनातलं जास्त बोलून दाखवत नव्हता.
घरात सगळं सुरळीत चाललंय, त्यातच तो समाधानी होता.
प्रीतीही तशीच होती. घरातली सगळी कामं नीट करणारी, सगळ्यांची आवड जपणारी होती.
कधीही कुठली तक्रार करत नव्हती.
घरात सगळं सुरळीत चाललंय, त्यातच तो समाधानी होता.
प्रीतीही तशीच होती. घरातली सगळी कामं नीट करणारी, सगळ्यांची आवड जपणारी होती.
कधीही कुठली तक्रार करत नव्हती.
मोना —घरातली धाकटी सून. लग्नाला एकच वर्ष झालं होता.
तिचा नवरा — निलेश, घरातला धाकटा मुलगा.हसमुख आणि बिनधास्त. घरच्या गोष्टींपेक्षा बाहेरच्या जगात जास्त रमणारा होता. घरात काही झालं तरी म्हणायचा, "होईल सगळं नीट."
मोना एकदम मॉडर्न विचारांची होती. मनात जे असायचं ती बोलून मोकळी व्हायची. गप्प बसणं म्हणजे अन्याय सहन करणे असं तिला वाटत होतं.

शीलाताई —सासूबाई. त्यांचं लक्ष घरावर बरोबर होतं. त्या वाईट नव्हत्या.पण तुलना करायची खूप वाईट सवय होती.
"प्रीती किती समजूतदार आणि शांत आहे.
" मोना विचार ना करता बोलत असते. "
त्यांच्या या बोलण्यामुळे, त्या दोघी जावा एकाच घरात राहून मनाने जवळ नव्हत्या.
" मोना विचार ना करता बोलत असते. "
त्यांच्या या बोलण्यामुळे, त्या दोघी जावा एकाच घरात राहून मनाने जवळ नव्हत्या.
जेव्हा मोनाचं नवीन लग्न झालं तेव्हा ती प्रीतीकडे ताई ताई करत सारखी जात होती.
मोना म्हणायची -" मला तुम्ही मोठ्या बहिणीसारखे वाटता ताई. "
मोना म्हणायची -" मला तुम्ही मोठ्या बहिणीसारखे वाटता ताई. "
प्रीती पण खुश होऊन बोलायची —" हो गं, तू माझ्यासाठी लहान बहीणच आहे."
पण शीलाताईंनी सारखी तुलना करून सगळं खराब केलं होतं .
आता त्या दोघी फक्त कामापुरता बोलत होत्या.
दोघींच्या मनात अजूनही काळजी होती. पण ईर्ष्यामुळे सगळं मनात राहत होतं.
दोघींच्या मनात अजूनही काळजी होती. पण ईर्ष्यामुळे सगळं मनात राहत होतं.
त्या दिवशी सकाळी प्रीती स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. शीलाताई भाजी निवडत होत्या.
मोना ऑफिससाठी जायला निघाली.
" आज जरा उशीर होईल."
" आज जरा उशीर होईल."
शीलाताई बोलल्या —"हो नीट जा, काळजी घे. "
निलेश मोबाईल पाहत म्हणाला —"मीटिंग असेल बहुतेक."
थोड्या वेळात निलेश आणि पंकज पण कामाला गेले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा