आज घरात लगबग सुरू होती. जावई आणि सासरे बुवा काहीतरी बोलतं होते. बाकीचे सगळे त्यांच्या बोलण्याला होकार देत होते. पूर्वा मात्र घरातली काम करत होती. नणंदेची दोन मुलं आणि तिचा मुलगा यांची देखभाल करत होती. त्या सोबत घरातली काम पण करत होती.सगळ्यांसाठी चहा नाष्टा करण्याची जबाबदारी तिची होती.
तिने सगळ्यांच्या साठी चहा बनवला. चहाचे कप ट्रे मध्ये ठेवून ती बाबांच्या रुम मध्ये गेली. सगळ्यांच्या हसण्या खिदळण्याचे आवज बाहेर पर्यंत ऐकु येत होते. ते ऐकुन तिच्या गालावर आपसूकच छान हसु आलं.
पण तिला दरवाज्यात उभे राहिलेल बघून एकदम सगळ्यांच हसणं थांबलं. वैभवने तिला सगळ्यांचा चहा सर्व्ह करायला सांगीतला. तिने कोरडा खाऊ पण सोबत आणला होता. ती पण सगळ्यांच्या सोबत चहा प्यायला बसली. पण तिला तिथ चहा प्यायला बसलेलं बघून तिथल्या काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या. हे तिने नजरेच्या कोपऱ्यातून बघितलं होत. पण तिने त्याकडे दर्लक्ष केलं.
तितक्यात तिच्या सासू बाईंनी वैभवला इशारा केला.
' तिला बाहेर जायला सांग.'
हे पण पूर्वा ने बघितलं. तरी देखील तिने इग्नोर केलं. पण पुढच्या क्षणी तिला ती इथ बसल्याचा पाश्चाताप झाला. वैभव तिला म्हणाला,
' तिला बाहेर जायला सांग.'
हे पण पूर्वा ने बघितलं. तरी देखील तिने इग्नोर केलं. पण पुढच्या क्षणी तिला ती इथ बसल्याचा पाश्चाताप झाला. वैभव तिला म्हणाला,
" पूर्वा तु रुम मध्ये जाऊन चहा घे."
वैभव असं काही बोलेल याचा अंदाज तिला नव्हता. खुद्द वैभव ने सांगितलं , म्हणून ती बाहेर जाऊ लागली. जाण्यापूर्वी तिने एकदा प्रश्नार्थक नजरेने वैभव कडे बघितलं,
जणु काही नजरेने विचारत होती,
" मी या घरची एकुलती एक सुन आहे. मला या घरात काय चालु आहे हे समजायला हवं ना ! मग मी बाहेर का जायचं ? "
तिच्या नजरेची अबोल भाषा पूजा ताईंनी अचूक ओळखली. त्या सहज स्वरात म्हणाल्या,
" त्याचं काय आहे ना, पूर्वा तुला काही काम सांगायचं असेल तेव्हां बोलावू. आता जरा महत्वाच्या बाबी बोलायच्या आहेत. त्यात तुझं काय काम. तू तुझी काम करायला मोकळी आहेस. आता लग्न घर आहे तर शेकडो काम असतात. घरची सून म्हणून तुलाच सगळं काही सांभाळायचं आहे ना !"
वरकरणी पाहता तिने हसुन बघितलं.नुसती मान डोलावली. इतक्यात नणंदेच्या मुलीनं शी केली. तर पूजा ने तिला शार्वी कडे बघण्याची जबाबदारी दिली. पूर्वा मामी आहे ना ! तिला नकार देता आला नाही.
ती शार्वी च आवरता आवरता स्वतःशी बोलतं होती,
" ते तुम्ही बरोबर बोलतं आहात, मी आहेच कोण ? या घरातली ? मोलकरणीची काम करायला लागतात आता फक्त. या घराची सुन नावाला आहे. बाकी घरात काय चालु असतं, काय झालं काय करायचं ठरल आहे ? कोणत सामान घरात आणलं, कोणतं सामान घरातून नेलं, मला काहीच माहीत नसतं. सगळं ठरल्या नंतर मला कळत. त्या पेक्षा मला सांगितलं जातं.
बाहेरून जे काही आणल जातं ते दारातून आत येत आणि सरळ आई बाबांच्या रूम मधल्या कापतात ठेवलं जातं. मला काही दाखवत नाहीत. मला काही सांगत पण नाहीत.'
बोलता बोलता तिने शार्वीच आवरलं. काही वेळाने तिची धाकटी नणंद मेघा पण आली. तिने तिन्ही मुलांना तयार करायला सांगितल. तिच्या म्हणण्या प्रमाणे पूर्वा ने मुलाना तयार केलं. मुलं बाहेर जायचं या आनंदात पटकन तयार झाली.
मुलांना तयार करून ती तिच्या रुम मध्ये तयार व्हायला गेली. पण त्याच वेळी सासू बाई त्यांच्या रूम मधुन बाहेर आल्या. त्यांनी सांगितलं ,
" सुनंदा बाई अजून आल्या नाहीत. तू घरीच थांब. घरची कामं अजून झाली नाहीत. तू दुपारचा स्वयंपाक करून ठेव. आज शंतनु राव आले आहेत तर त्यांच्या आवडीच्या पुरण पोळ्या कर."
पूर्वा ने मान हलवली. त्या बोलतं होत्या की बाहेरून बाबांची हाक ऐकू आली. त्या बाकी काही न बोलता बाहेर पडल्या.
पूर्वा ने मान हलवली. त्या बोलतं होत्या की बाहेरून बाबांची हाक ऐकू आली. त्या बाकी काही न बोलता बाहेर पडल्या.
सासू बाईंच्या पाठो पाठ मेघा आणि पूजा ताई देखील खंद्याची पर्स सावरत, डोळ्याला गॉगल लावत बाहेर पडल्या. मुलं पण आत्या आणि आईला चिटकली. मुलांच्यात बाहेर जाण्याचा उत्साह संचारला होता. ते सगळे बाहेर पडले.
इतक्यात वैभव परत आला. तो सरळ त्याच्या रुम मध्ये गेला. पूर्वा पण त्याच्या मागे रुम मध्ये आली, तिने विचारलं,
" वैभव तुम्ही कुठं बाहेर जात आहात का ? "
" हो. मगाशी आईनं सांगितल की काही तरी महत्वाचं काम आहे. तर तेचं करायला जातं आहोत." अंगावर परफ्यूम फवारत तो नेहमीच्या कूल अंदाजात म्हणाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा