Login

आरोही - ( जीवनाचा संघर्ष )( भाग - 2 )

Aarohi


        काकी आरोही ला घेऊन तिच्या घरी गेली. काकी आधीच ह्या सर्व गोष्टींमुळे खूप चिडलेली होती. काकी घरी पोचल्या पोचल्या धुस पूस करू लागली. तिची मुलं आरोही शी चांगलं बोलत होती, त्यांना लहान बहीण मिळाली म्हणून छान  वाटत होत, काकीं ची मुलं मोठी होती एक मुलगा दहावी ला तर एक सातवीला होता. मुलं आरोही ला बघून खूप खुश  झाली.

        काकी ची बडबड चालूच होती, काकी काका ला बोलत होती...आता हिला शाळेत पण घालायला हवं, आपल्या इथे, पुन्हा त्याचा खर्च, एकतर तुमची ही नोकरी अशी, नीट पगार पण नाही तुम्हाला, आपण चं मुलांचं शिक्षण कसं बसं करतोय, मोठ्याचं दहावी चं वर्ष आहे यंदा त्याला चांगला क्लास नको का लावायला, आपण चं आपल्या मुलांना इंग्लिश मीडियम ला घालताना कसे बसे डोनेशन चे पैसे साठवले होते आता हिच ऍडमिशन घ्यायला हवं. ते पैसे कोण देणार आहे. त्यातून हल्ली इंग्लिश मीडियम ला ऍडमिशन पण खूप महाग आहे. त्यावर काका पटकन बोलला - आरोही ला मराठी मीडियम ला घालू मग जास्त खर्च पण नाही येणार.

        काकी लगेचच बोलली, हो तसं चं करू, म्हणजे जास्त खर्च पण नाही येणार तिच्या शाळेचा. आरोही अजून चार चं वर्षाची असल्यामुळे शाळेत जातं नव्हती, जवळच्या एका बालवाडी मध्ये ती जायची पण नंतर आई सोडून गेल्यावर तिची ती बालवाडी पण बंद झाली.

         आई सोडून गेल्यावर बाबा खूप दारू पियायला लागल्यावर ते तिच्याकडे लक्ष देईनासे झाले. आरोही तिचे आई - बाबा नोकरी करत असल्यामुळे पाळणाघरात राहात होती. आई  सकाळी ऑफिस ला जाताना तीला पाळना घरात सोडून जातं असे,  पाळणा घरातल्या काकी चं तीला दोन तास बालवाडी मध्ये सोडत असत. संध्याकाळी बाबा ऑफिस मधून येताना तीला घेऊन येत असत. असं आरोही चं रुटीन होत, पण आई गेल्यावर सगळंच विस्कटलं,

        आरोही ला मराठी शाळेत घालण्यात आलं, छोटा  शिशु च्या वर्गात, शाळेच्या पहिल्या दिवशी - सगळ्या मुलांचे आई - बाबा हौशीने त्यांना सोडायला आले होते, सगळे मुलांना बाय - बाय करत होते, पण आरोही  चा काका तीला वर्गात सोडून लगेचच निघून गेला. काही मुलं रडत होती त्यांना आई - बाबा जवळ घेत होते, आरोही ला ते सर्व बघून आपल्या आई - बाबांची खूप आठवत येत होती. तीला खूप रडायला येत होत, पण ती वर्गात जाऊन गुपचूप एका कोपऱ्यात बसली. 

      काका तीला कामावर जाताना शाळेत सोडत असे, आणि मग शाळा सुटताना आणायला काकी येत असे. काकी शाळा  सुटली कि आरोही शी एक ही शब्द न बोलता तिचा हात धरून सरळ चालत सुटत असे. 

      आरोही ला त्या बाल वयात खूप काही कळत नसे, पण खूप वाईट मात्र वाटत असे. सगळी मुलं डब्यात छान  छान  खाऊ  आणतं असत, पण काकी मात्र आरोही ला काका ला जे डब्यासाठी करेल, भाजी - चपाती..तेच रोज आरोही ला देत असे.

      आरोही च्या शिक्षिकेच्या मात्र आरोही चं ते शांत राहणं एकच महिन्यात लक्षात आलं आणि तिने आरोही ला विचारलं, तू जास्त बोलत का नाहीस आणि गप्प का असतेस. आणि तुझी आई तुला भाजी - चपाती चं का देते रोज, तू ते मनापासून खात पण नाहीस, दररोज अर्धा डब्बा तसाच  परत नेतेस. तुझी आई तुला तू जास्त खात नाहीस, डब्बा परत नेतेस म्हणून ओरडत नाही का गं...तेव्हा आरोही म्हणाली मला आई - बाबा दोघं पण नाहीत, त्यामुळे मी काका - काकी कडे राहते. हे ऐकून त्या शिक्षिकेचे डोळे पाणावले.

      त्या दिवसापासून टीचर आरोही शी खूप गप्पा मारू लागल्या, तीला बोलत करू लागल्या. तिचे लाड करू लागल्या. आरोही ला पण कोण तरी आपले  लाड करतय हे बघून छान वाटे.

       आरोही ला वाटल होत कि काका - काकी आपले  लाड करतील पण काकी तीला काका नसताना उठ- सूट टोमणे मारू लागली, हिची आई गेली पळून आणि हीच करायला आम्हाला ठेवलंय  इथे, असं काही बाही बोलत राहात असे. बिचाऱ्या छोटया आरोही ला रडायला येत असे.

        हळू हळू आरोही दुसरीत गेली. शाळेत पंधरा ऑगस्ट जवळ  आला, त्या निम्मिताने मुलांचे प्रोग्राम ठेवण्यात आले, आरोही ला काकी आपल्याला, प्रोग्राम साठी वेगळा ड्रेस घ्यायला नाही बोलणार हे माहित असल्यामुळे ती कोणत्या प्रोग्राम मध्ये भाग चं घेत नसे.

      पण ह्यावेळी टीचर ऐकत नव्हत्या त्या म्हणाल्या मी तूझ्या काकी ला उदया आणायला आली कि विचारते हा, आरोही नको टीचर बोलत असताना पण टीचर ने काकी ला विचारलं चं तर काकी बोलली, हिच्या प्रोग्राम साठी मी कसलाही ड्रेस घेणार नाही, नका घेऊ हिला प्रोग्राम मध्ये त्यापेक्षा. आरोही खूप हिरमूसली.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत काकी पुढे - पुढे आरोही ला अजून काय काय त्रास देते ते..)

( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )

( देवरुख - रत्नागिरी )

( कथा  आवडल्यास जरूर लाईक करा ).

0

🎭 Series Post

View all