Login

आरोही - ( जीवनाचा संघर्ष ) ( भाग - 4)

Aarohi


     अशीच मध्ये तीन वर्ष निघून जातात. आरोही पंधरावी होते. आणि मग दुसरीकडे नोकरी शोधू लागते, आरोही आता एकवीस वर्षाची होत आलेली  असते, त्यामुळे काकी तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरवात करते, आरोही मला एवढ्यात लग्न करायचं  नाही असं बोलून बघते. पण काकी पुढे तीच  काहीच चालत नाही. काका तर आरोही च्या विषयात कधीच  आजपर्यंत काहीच बोलला नव्हता.

         आरोही घरातील सगळी कामं करत असे, कधीच  काहीच बोलत नसे, ह्या घरात  आपला खर्च सगळ्यांना जड  चं होतोय, हे तीला आधीपासून चं माहित होते. आजपर्यंत तिने स्वतः ची कधीच हौस मौज  केली नव्हती. ती कंपाऊंडर च्या कामातून मिळालेले पैसे पण घरात देत असे, स्वतः ला काहीच पैसे ठेवत नसे. दवाखाना जवळ चं असल्यामुळे तिला प्रवासाला पैसे लागतचं नव्हते.

        काकी ने एक स्थळ आणलं, आणि हुकूम चं सोडला, कि त्या मुलाला तू पसंद पडलीस तर तिथे मला अजून शिकायचं आहे, नोकरी करायची आहे असं काहीच बोलायचं नाही. ते लोक म्हणतील त्याला हो म्हणायचं, नाहीतर त्या मुलाला बोलशील काकी जबरदस्तीने लग्न लावतेय, मला एवढ्यात लग्न करायचं नाही, असं काही बोललीस तर याद राख, अशी काकी ने धमकी चं दिली होती.

       त्यावेळी आरोहीला लग्नाच्या आनंदापेक्षा ह्या घरातून, काकी च्या जाचातून मी सुटणार ह्याचा आनंद चं जास्त होता.  ती काकी च्या बडबडीला तिच्या सतत ओरडण्याला खूपच कंटाळली  होती. त्यामुळे आरोही पण विचार करू लागली कि कदाचित बाप्पा च्या मनात हेच असेल. नाहीतरी आज ना उदया ह्या घरातून जायचं चं आहे मग लग्न करून चं जावं. असं आरोही मनोमन बोलू लागली.

      आरोही ची गणपती बाप्पा वर खूप श्रद्धा होती. ती नेहमी मनातल्या मनात  बोलत असे कि बाप्पा भविष्यात तरी नक्कीच माझं चांगल करणार. आरोही साठी जगण्यासाठी नवीन संधी देणारी उमेद होती लग्न म्हणजे. आरोही मुलाकडंच्यांना पसंद पडली. आरोही ला सुद्धा मुलगा तसा बरा वाटला. पंधरा  दिवसांनी साखरपुडा आणि एक महिन्याने लग्न करायचं असं ठरलं.

        काकाने अगदी साधेपणाने तीच लग्न उरकायचं ठरवलं , पण आरोही ला त्याचं काहीच वाटल नाही. आपल्या लग्नात आपली कुठलीच हौस मौज  केली जाणार  नाही किंवा काकी करणार नाही हे आरोही जाणून होती.

         काकी कडून बोलताना समजले कि होणारा  नवरा अनाथ आहे, त्याचे आई - वडिल लहानपणी एका अपघातात वारले आहेत त्यामुळे त्याला त्याच्या मावशीने  वाढवलं आहे, पण मावशी खूप चांगली होती, आरोही  ला बघायला आली होती तेव्हा तिच्याबरोबर अगदी मायेने तिच्याशी बोलली होती. तेव्हा आपल्यासारखाच तो ही अनाथ आहे त्यामुळे आपण एक - मेकांना चांगले समजून घेऊ असं आरोही ला मनातल्या मनात वाटून गेलं.

       एकाच परिस्थिती तुन गेलेले - आणि एकमेकांशिवाय दुसरं कोणी नसणारे असे आपण दोघं - जोडीने चांगला संसार करू अशी  आरोही ला जणू खात्री चं पटली होती. 

        काकी ने आरोही ला लग्न आणि साखरपुडया साठी लागणारी साडी पण स्वतः चं जाऊन आणली, कशातच आरोही ची पसंती  विचारली गेली नाही. दोन अजून साड्या आणल्या होत्या लग्नानंतर सासरी निसायला......बाकी काही अशी जास्तीची खरेदी  लग्नासाठी काकी ने केली नाही. आरोही चं मत  कशात चं विचारलं जातं नव्हत.

          आणि साखरपुड्याचा दिवस उजाडला, आरोही साडी मध्ये खूप चं छान  दिसत होती. तिचा होणारा नवरा ( अमित ) नाव होत त्याच, तो पण आरोही ला बघून खुणेने चं बोलला मस्त दिसते आहेस  असं. साखरपुडा काका च्या घरीच अगदी मोजक्या चं माणसात साधेपणाने पार पडला.

        एक महिन्याने लग्न असत, लग्नासाठी काका च्या घरा  जवळच एक छोटासा  हॉल घेण्यात आला, लग्न वैदिक  पद्धतीने करण्यात येणार होत. आणि अखेर लग्नाचा दिवस उजाडला. काकी च्या चेहऱ्यावर आरोही आज जाणार म्हणून दुःख नाही तर आनंद  चं दिसत होता. पण काकीच्या दोन्ही मुलांना वाईट वाटत होते. त्यांनी आरोही ला कायम चं आपल्या लहान बहिणी सारखेच सांभाळले होते.

        लग्न व्यवस्थित पार पडले. लग्न करून आरोही सासरी गेली. आरोही ला खूप छान  वाटत होत, आता हे माझं हक्काचं घर , इथे काकी सारखं मला कोणीच इथून जा, तू आम्हाला नको चं आहेस, असं बोलणार नव्हत. आरोही हा सर्व विचार करून खुश  झाली.

        ( पुढच्या भागात आपण बघणार आहोत आरोही च्या संसाराबद्दल....)

( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे - देवरुख ( रत्नागिरी )

0

🎭 Series Post

View all