Login

आरोही - जीवनाचा संघर्ष ( भाग - 5 )

Aarohi


       आरोही अमित च्या घरी माप ओलांडून आत येते. मावशी तीचा  गृहप्रवेश पण छान  पद्धतीने करते. आरोही शी पण अगदी मुलीसारखं वागत असते. मावशी च्या घरी तिचा एक मुलगा असतो. मावशी चे मिस्टर वारलेले  असतात. आता आरोही - अमित, मावशी आणि तिचा मुलगा सचिन असे हे चौघे जण राहणार होते.

      त्यात सध्या कामावर जाणारे दोघे जण अमित आणि सचिन अशे होते. आरोही आणि मावशी घरी असत. दोघी मिळून गप्पा मारत स्वयंपाक, घरची कामं करत असत.

         अमित चांगला जॉब ला आहे, पंधरावी शिकलेला आहे असं काकी ने घरी सांगितलेल असत. पण सर्व ह्याच्या उलट असत.    लग्न झाल्यावर आरोही जेव्हा पाच  - सहा  दिवसांनी अमित ला बोलते. कि मला अजून शिकायचं  होत, कॉम्पुटर चा कोर्स करायचा होता. माझ्या स्वतः च्या पायावर उभ राहायचं आहे. मला नोकरी करायची आहे तेव्हा अमित बोलतो हो कर सर्व हे पण तुला त्यासाठी आधी  नोकरी करून स्वतः च्या शिक्षणासाठी पैसे साठवावे लागतील. त्यासाठी माझ्या जवळ  जास्त पैसे नाहीत अग मी दहावी चं शिकलेला आहे त्यामुळे माझी नोकरी काही एवढी नीट नाही आहे मी साध्याश्या एका फॅन च्या कंपनी मध्ये हेल्पर आहे.

       आरोही बोलते अहो पण काकी ने सांगितलं होत कि तुम्ही पंधरावी शिकलेले आहात, चांगले नोकरीला आहात, अमित बोलतो अग तुझी काकी खोटं बोलली तुम्हाला......मी आधीच म्हणतं होतो कि मुलगी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे त्यामुळे मला हो बोलणार नाही. पण तुझी काकी चं म्हणाली तीला चालेल कमी शिकलेला नवरा. मी तुझी फसवणूक केली नाही आहे हा. तुझीच काकी ह्या सगळ्या ला जबाबदार आहे.

       आरोही पण विचार करते कि हे सर्व काकी नेच केलं असणार कारण काकी ला मी तशी हि त्या घरात  नकोच होते त्यामुळे जे स्थळ आलं त्याला काकी ने पटकन होकार दिला असणार काहीही मागचा पुढचा विचार न करता.

         आरोही अमित ला बोलते कि अहो माझा  तुमच्यावर काहीच राग नाही आहे मी काकी ला चांगलीच ओळखून आहे हे तीच चं सगळं कारस्थान असणार हे मला माहीत आहे. आरोही विचार करू लागते कि जाऊदेत आता जे झाले ते झाले अमित तसा स्वभावाने बरा आहे. मावशी पण चांगलीच आहे. तिचा मुलगा पण आरोही ला वाहिनी वाहिनी करत असे अगदी, त्यांच्या घरी अगदी खेळीमेळीच्  वातावरण असे.

          आरोही च्या लग्नाला एक महिना होऊन हि ती घरीच होती नोकरी चं काहीच जमत नव्हत, एक - दोन ठिकाणी तिने इंटरव्हिव्ह दिले होते पण अजून कुठूनच काहीच रिप्लाय आला नव्हता . मग मावशी पण म्हणाली कि अग दोन महिन्यानी सचिन पण लग्न आहे त्याच्याच ऑफिस मधल्या एका मुलीवर त्याचं प्रेम आहे..... त्यामुळे तू सध्या लग्नाच्या तयारी साठी घरीच  रहा. नोकरी चं सचिन च्या लग्नानंतर बघशील का. मला तेवढीच तुझी मदत होईल....आरोही मावशीला नाही बोलू शकली नाही. आरोही हो चालेल बोलली.

        पुढचे दोन महिने पटकन गेले, अमित - आरोही ला खूप छान  समजून घेत होता तीला कोणत्याच गोष्टीसाठी दुखवत नव्हता. सगळं छान चालू होत अगदी. सचिन चं लग्न जवळ  आलं होत त्यासाठी मावशी  आणि आरोही जाऊन खरेदी करून आल्या. अमित ने पण आरोही ला सांगितले कि तुझ्या आवडीची तुला पण एक साडी घे, तेव्हा आरोही ला रडू  चं आलं अगदी, ती अमित ला बोलली.. लहानपणा पासून कोणीच माझी पसंती विचारली नाही, काकी ने जे कपडे आणले तेच मी आतापर्यंत वापरले.

        अमित ला पण हे ऐकून खूप वाईट वाटले, तो म्हणाला रडायचे दिवस गेले आता, ह्यापुढे तू रडायचं नाहीस. उदया तुला आवडेल ती साडी घे. सचिन च्या लग्नाचा दिवस जवळ आला. आरोही तशी कामात हुशार असल्यामुळे तिने सर्व हौशीने केले.

        लग्न झाले, सचिन ची बायको घरात आली. ती आरोही शी अगदी कमीच बोलत असे. आरोही ला सुरवातीला वाटल कि नवीन आहे हि घरात म्हणून लाजतेय पण तसं नव्हत, तीला अमित आणि आरोही ज्या घरात राहात होते ते घर मावशीच होत ना त्यामुळे तीला हे दोघे त्यांच्या घरात  नको होते.

        आरोही ला ते तिच्या वागण्यातुन हळू हळू समजून चुकले आणि मग त्यांच्या लग्नानंतर एक महिन्यांनी तिने अमित ला हा विषय सांगितला, तो म्हणाला तू वाईट वाटून घेऊ नकोसं मी लवकर चं कुठेतरी भाड्याने रूम बघतो आपण इथून जाऊ.

       आठ  दिवसांनी अमित ने मी दुसरीकडे राहायला जातोय हे घरी सांगितलं तेव्हा मावशी  खूप रडली तीला खूप वाईट वाटले. मावशी बोलली अरे असं करू नका तुला पगार कमी आहे आरोही पण अजून जॉब ला लागली नाही आहे कसं भागवणार तुम्ही, अमित बोलला कि सध्या तरी माझ्या एका मित्राने मला पैश्याची मदत केली आहे, त्याचं पैशातून मी रूम भाड्याने घेतली आहे. पुढचं पुढे बघू.

       आरोही आणि अमित मावशी च्या घरातून निघाले. नवीन रूम मध्ये आले, एका चाळीत  छोटीशी रूम अमित ने घेतली होती. दोनच रूम होते पण आरोही ला ती रूम आवडली.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत कि आरोही कशी आपल्या संसाराला हातभार  लावते ते....)

0

🎭 Series Post

View all